१ मे १९६० रोजी नगर जिल्हा ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाची स्थापना झाली. या वस्तुसंग्रहालयात ऐतिहासिक कागदपत्रे, विविध घराण्यांची ऐतिहासिक दप्तरे आहेत. ही संख्या काही हजारांत आहे. ही कागदपत्रे व वस्तूंचे जतन, ऐतिहासिक संशोधन, इतिहासतज्ज्ञांच्या सभा घेणे, त्रमासिक-नियतकालिकाचे प्रकाशन, इतिहास संशोधकांना साहित्य पुरवणेअशी कामे वस्तुसंग्रहालयामार्फत सुरू आहेत. योग्य व्यवस्थेअभावी बरीचशी कागदपत्रे फडक्यात गुंडाळून ठेवण्याशिवाय पर्याय नाही. असे हजारो गाठोडेयेथे आहेत..

न गर शहराला मोठा इतिहास आहे. शहराच्या स्थापनेला तब्बल ५२५ वर्षे झाली, मात्र परिसरातील भिंगार शहरात (ब्रिटिश काळापासूनची लष्करी वसाहत) प्राचीन काळापासून वस्ती होती, याचे उल्लेख इसवी सनपूर्व काळापासून सापडतात. आंध्रभृत्य, चालुक्य, राष्ट्रकुट, यादव आदी घराण्यांची नगर शहरावर सत्ता होती. तरीही नगरचा इतिहास म्हणजे निजामशाहीचा इतिहास असेच समजले जाते.  २८ मे १४९० रोजी अहमदशहाने अहमदनगर शहराची स्थापना केली होती.

mumbai ramabai ambedkar nagar zopu marathi news
रमाबाई आंबेडकर नगर पुर्नविकास : ‘झोपु’चे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात, पुढील आठवड्यात १६८४ रहिवाशांची प्रारूप यादी प्रसिद्ध करणार
History made by Raj Bhagat He became first young man from Vasai to clear competitive examination
राज भगतने रचला इतिहास! वसईतून स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण होणारा पहिला तरूण ठरला
Buddhism, Renovation of Buddhist Stupa at Karnataka
२५०० वर्ष जुन्या मौर्यकालीन बौद्ध स्तूपाचे पुनरुज्जीवन; का महत्त्वाचे आहे हे स्थळ?
what is ring of fire
यूपीएससी सूत्र : भूकंपप्रवण क्षेत्र असलेले ‘रिंग ऑफ फायर’ अन् कचाथीवू बेटाचा वादग्रस्त इतिहास, वाचा सविस्तर…

या सगळ्या इतिहासाचे संवर्धन करण्यासाठी सरदार बाबासाहेब मिरीकर यांनी सन १९५४ मध्ये नगर शहरात इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली. अहमदनगर जिल्हा ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय हा त्याचाच पुढचा टप्पा. १ मे १९६० ला त्याची स्थापना झाली. या वस्तुसंग्रहालयात प्रामुख्याने नगर शहर व जिल्ह्य़ातील वस्तूंचा संग्रह आहे. शिवाय अन्य ऐतिहासिक कागदपत्रे, विविध घराण्यांची ऐतिहासिक दप्तरे आहेत. ही संख्या काही हजारांत आहे. ही कागदपत्रे व वस्तूंचे जतन, ऐतिहासिक संशोधन, इतिहासतज्ज्ञांच्या सभा घेणे, त्रमासिक-नियतकालिकाचे प्रकाशन, इतिहास संशोधकांना साहित्य पुरवणे, व्याख्यानमाला, अशी कामे वस्तुसंग्रहालयामार्फत सुरू आहेत. ती कशी सुरू ठेवली जातात, हे मात्र न विचारलेले बरे. त्याचे कारण स्थापनेपासूनच जडलेले अठरा विश्वे दारिद्रय़! योग्य व्यवस्थेअभावी बरीचशी कागदपत्रे फडक्यात गुंडाळून ठेवण्याशिवाय पर्याय नाही. असे हजारो ‘गाठोडे’ येथे आहेत.

‘अलिबाबाच्या गुहे’त अठरा विशे दारिद्रय़!

संस्थेच्या घटनेनुसार जिल्हाधिकारी हे या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत, मात्र हा पूर्णपणे स्वतंत्र ट्रस्ट आहे. संस्थेला राज्य अथवा केंद्र सरकारचे कोणतेही अनुदान मिळत नाही. शिवाय जिल्हाधिकारी हे पदसिद्ध असले तरी तेही संस्थेला नियमित अनुदान व तत्सम काही देऊ शकत नाहीत. पूर्वी नगरपालिकेकडून संस्थेला वार्षिक एक लाख रुपये मिळत होते. बारा-पंधरा वर्षांपूर्वी शहरात महानगरपालिका स्थापन झाली, मात्र हे अनुदान बंद होऊन आता जमाना झाला. १ मे १९६० ला एका खोलीत सुरू झालेले अहमदनगर जिल्हा वस्तुसंग्रहालय गेल्या ४० वर्षांपासून मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील एका कोपऱ्यात प्रशस्त जागेत स्थित आहे.

या वस्तुसंग्रहालयात असंख्य महत्त्वाच्या वस्तू आहेत. मोडी, फार्सी, अरेबिक व संस्कृत अशा विविध भाषांमधील तब्बल दहा हजारांपेक्षाही अधिक कागदपत्रे, दस्ताऐवज संस्थेकडे आहे. इतिहासविषयक जुन्या व दुर्मीळ पुस्तकांचा मोठा संग्रह, अतिशय जुन्या पोथ्या संस्थेत आहे. सन १७५० मध्ये सूर्यभट्ट यांनी लिहिलेली वैशिष्टय़पूर्ण पोथी यात अधिक महत्त्वाची आहे. ही पोथी डावीकडून वाचली तर कृष्णकथा आहे आणि उजवीकडून वाचली की रामकथा होते. अजूनही ती चांगल्या स्थितीत आहे. रघुनाथ निळकंठ यांची सन १७७५ मध्ये तयार करण्यात आलेली तब्बल २०० फूट लांबीची जन्मपत्रिका वस्तुसंग्रहालयात आहे. पेशवाईचा अस्त झाल्यानंतरच म्हणजे सन १८२२ मध्ये खऱ्या अर्थाने ब्रिटिशांचा पूर्ण हिंदुस्थानवर अंमल सुरू झाला. तत्पूर्वी सन १८१६ मध्ये ब्रिटिशांनी तेव्हाच्या अखंड हिंदुस्थानचा नकाशा लंडनमध्ये छापला होता. त्याची अस्सल प्रत या वस्तुसंग्रहालयात पाहायला मिळते.

पुरातत्त्व (अश्मयुग, ताम्रपाषाणयुग, सातवाहन युगातील वस्तू), चित्रकला (जुनी दुर्मीळ चित्रे, पानाफुलांपासून तयार केलेल्या रंगांतील चित्रे), हस्तलिखित (जुन्या पोथ्या, पेशवेकालीन मोडी लिपीतील पत्रे, शिलालेख, ताम्रपट), शस्त्रे (पेशवेकालीन तलवारी, ढाली, बंदुका, दांडपट्टे), नकाशे (जुन्या काळातील मुद्रित नकाशे), अर्वाचीन (विविध वस्तू), काष्ठ (विविध लाकडी वस्तू), शिल्प (बाराव्या शतकापासूनच्या विविध मूर्ती), गणपती दालन (विविध प्रकारचे गणपती) आणि छायाचित्रे (नगर शहरातील निजामशाहीच्या काळातील इमारतींची छायाचित्रे), अशा दहा विभागांत या वस्तुसंग्रहालयाची रचना करण्यात आली आहे.

दिवंगत इतिहासप्रेमी तथा ज्येष्ठ अभ्यासक सुरेश जोशी यांचे नाव या वस्तुसंग्रहालयाला अगदी नैसर्गिकरीत्या जोडले गेले आहे. वस्तुसंग्रहालयाच्या उभारणीसाठी त्यांनी उभे आयुष्य वेचले. अतिशय प्रतिकूल स्थितीत वस्तुसंग्रहालयाचे कार्यकारी विश्वस्त म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी काम केले. वेळप्रसंगी घरादाराकडे दुर्लक्ष करून त्यांनी वस्तुसंग्रहालयाचा प्रपंच नेटाने चालवला. त्यांच्याच काळात या खजिन्याचा ओघ येथे होत राहिला. संस्थेच्या आर्थिक दारिद्रय़ाची झळ त्यांना, त्यांच्यामुळे त्यांच्या कटुंबालाही सर्वार्थाने बसली, मात्र या आघाडीवरही मात करीत त्यांनी संग्रहालय समृद्ध केले. प्रापंचिक ओढाताणीतही जोशी यांनी वस्तुसंग्रहालयाची श्रीमंती मात्र वाढवतच नेली.

जोशी यांच्यानंतर गेल्या काही वर्षांपासून डॉ. रवींद्र साताळकर यांनी कार्यकारी विश्वस्त म्हणून वस्तुसंग्रहालयाची जबाबदारी सांभाळली आहे. वैद्यकीय व्यवसाय सांभाळतानाच इतिहासप्रेमी आणि कलासक्त व्यक्तिमत्त्व म्हणूनच ते सांस्कृतिक कार्यात दीर्घकाळ सक्रिय आहेत. वस्तुसंग्रहालयाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर निधीची उपलब्धता हाच त्यांच्यासमोरही मोठा प्रश्न आहे. त्यातही ते यथाशक्ती योगदान देत आहेत. मात्र हे काही एकटय़ा-दुकटय़ाचे काम नाही. त्यालाही मर्यादा आहेतच. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळेच इमारतीचे नूतनीकरण मार्गी लागले. मात्र दैनंदिन खर्च, इतिहासाशी निगडित भविष्यातील विविध प्रकल्प आणि मुख्यत्वे देखभाल या सगळ्या गोष्टींसाठी संस्थेला शाश्वत उत्पन्नाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. प्रा. संतोष यादव यांनी नोकरी सांभाळून वस्तुसंग्रहालयाच्या अभिरक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. ते व डॉ. साताळकर हे दोघेही नाममात्र एक रुपया मानधनावर कार्यरत आहेत. यादव यांच्या प्रयत्नातून संस्थेने अलीकडेच मोडी टू देवनागरी आणि देवनागरी टू मोडी रूपांतराचे सॉफ्टवेअर विकसित केले असून इंटेल कंपनीने त्याची दखल घेतली आहे.

आर्थिक चणचण ही वस्तुसंग्रहालयाच्या पाचवीला पुजली आहे. गेली वर्षांनुवर्षे अडीच कर्मचारी काम करतात. त्यांचाही पगार म्हणाल तर, जेमतेम चार आकडी. तो देणाऱ्याला लाज वाटावी, अशीच स्थिती. जोशी यांच्याच प्रयत्नातून संस्थेमध्ये इतिहास संशोधन केंद्र स्थापन झाले होते. त्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता होती. सुरुवातीचा काही काळ हे केंद्र चांगले चाललेही. मात्र आर्थिक स्रोत नसल्याने कालांतराने ते बंद पडले. हे केंद्र बंद पडले याचाच अर्थ संशोधन कार्य थांबले! निधीअभावीच संस्थेची जिन्सीवाले व्याख्यानमाला, नियतकालिक, त्रमासिकही बंद पडले. पुणे येथील केळकर संग्रहालयाच्या धर्तीवर अहमदनगर ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयासही नियमितपणे सरकारी अर्थसाहाय्य मिळावे, असा प्रस्ताव फार पूर्वीच राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. मात्र याबाबत सरकारी धोरणच ठरलेले नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव धूळ खात पडला आहे. वस्तुसंग्रहालयाच्या वाटचालीत काही जिल्हाधिकाऱ्यांनी मोठे योगदान दिले. एका खोलीतील हे वस्तुसंग्रहालय अनिलकुमार लखिना यांनीच सध्याच्या प्रशस्त जागेत आणले. विजयकुमार यांनी सदाशिव अमरापूरकर यांच्या मदतीने गोविंदा-जॉनी लिव्हर यांची संगीतरजनी आयोजित करून संस्थेच्या दैनंदिन खर्चाची तजवीज केली. उमाकांत दांगट यांनी शिर्डी संस्थानकडून मदत मिळवून दिली. सध्याचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी पुढाकार घेतल्यामुळे वस्तुसंग्रहालयाच्या इमारतीचे मोठे आणि आकर्षक नूतनीकरण सुरू आहे.

संस्थेपर्यंत कसे जाल?

अहमदनगर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणीच संस्था असल्याने फारशी शोधाशोध करावी लागत नाही. राज्यभरातून एसटी बस नगरमध्ये येतात. रेल्वेमार्गानेही अहमदनगर जोडले गेले आहे.

धनादेश या नावाने पाठवा..

हिस्टॉरिकल म्युझियम, अहमदनगर (Historical Museum, Ahmednagar)

(कलम ८०जी (५) नुसार देणग्या करसवलतीस पात्र आहेत)

 

धनादेश येथे पाठवा.. : एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे लोकसत्तात प्रसिद्ध केली जातील.

  • मुंबई कार्यालय : लोकसत्ता, संपादकीय विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०५३६
  • महापे कार्यालय : संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००
  • ठाणे कार्यालय : संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे. ०२२-२५३८५१३२
  • पुणे कार्यालय : संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४. ०२०-६७२४११२५
  • नाशिक कार्यालय : संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१. ०२५३-२३१०४४४
  • नागपूर कार्यालय : संपादकीय विभाग, प्लॉट नं. १९, ग्रेट नागरोड, उंटखाना, नागपूर – ४४०००९, ०७१२ झ्र् २७०६९२३
  • औरंगाबाद कार्यालय : संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी, औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४६३०३, २३४८३०३
  • नगर कार्यालय : संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/२४५१९०७
  • दिल्ली कार्यालय : संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा – २०१३० उत्तर प्रदेश. ०११- २०६६५१५००

 

सक्षम मनुष्यबळाची गरज

वस्तुसंग्रहालयापेक्षा संशोधन केंद्र म्हणून नगरमधील या ऐतिहासिक संस्थेचे महत्त्व अधिक आहे. सक्षम मनुष्यबळाअभावी उपलब्ध हजारो कागदपत्रांचा अभ्यास व संशोधन गरजेचे आहे. त्यासाठी येथे कायमस्वरूपी संशोधकांची गरज आहे. तशी पदे येथे भरावी लागतील, अर्थातच त्यासाठी निधीचीच नितांत आवश्यकता आहे. अन्य कामांसाठी पुरेसे मनुष्यबळही गरजेचे आहे.

जिल्हा ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय अहमदनगर

संस्थेच्या इमारत नूतनीकरणानंतर वाढणारे वीज बिल, देखभाल खर्च तसेच इतर गोष्टींसाठी लागणारा खर्च  असे अनेक  प्रश्न संस्थेसमोर ‘आ’ वासून उभे आहेत. त्यासाठी लोकाश्रयाची गरज आहे.

  • प्राचीन अश्मयुगीन मानवी संस्कृतीचे दीड लाख वर्षांपूर्वीचे अवशेष वस्तुसंग्रहालयात उपलब्ध आहेत.
  • जामखेड तालुक्यातील खडर्य़ाच्या लढाईत वापरलेली पंचधातूची तोफ येथे आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराजांची सिसोदिया घराण्यापासूनची वंशावळ (बारा फूट लांबी), छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील अस्सल चित्रे येथे पाहायला मिळतात.