एमबीए झालेल्या एका तरुणाला ‘मुस्लीम’ म्हणून नोकरी नाकारली गेल्याची चर्चा समाजमाध्यमांतून गेल्या आठवडय़ात झाली आणि यानिमित्ताने, नोकऱ्यांत भेदभाव होऊ नये हे तत्त्व अनेकांनी मनोमन स्वीकारले. मात्र भेदभावाची आणि त्यामागच्या द्वेषाची भावना समाजात कशी निर्माण होते? त्या द्वेषाला अगदी साध्या दैनंदिन घटनाही कारणीभूत असू शकतात, हे समजून घेऊन उपाययोजनांची चर्चा सुरू व्हावी..

कुणा कंपनीने, झीशान अली अहमद खान या एमबीए झालेल्या तरुणाच्या अर्जाला ‘आम्ही फक्त मुस्लिमेतर उमेदवारांनाच नोकरी देतो’ असे उत्तर दिले. याच्या सोशल मीडियातून व प्रसारमाध्यमांतूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मुंबई पोलिसांनीही या प्रकरणी गुन्हा नोंदविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धर्माच्या नावाखाली नोकरी नाकारणे गैर असल्याचे सांगून ही घटना निंदनीय असल्याचे म्हटले. झीशानसोबतच या कंपनीमध्ये अर्ज करणाऱ्या व कंपनीने नोकरी देऊ केलेल्या झीशानच्या मित्रांनी तर कंपनीची नोकरीची ऑफर धुडकावून कंपनीच्या या धार्मिक भेदभाव करणाऱ्या धोरणाचा निषेध केला. झीशानचे हे मित्र िहदू आहेत हे विशेष! हरिकृष्ण कंपनीने या प्रकरणावर ‘आमच्याकडे ५० नोकर मुस्लीमच तर आहेत’ वगैरे गुळमुळीत खुलासा करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, ‘केवळ मुस्लीम तरुणांकडून’ किंवा ‘फक्त ख्रिश्चन उमेदवारांकडून’ कंपन्यांनी अर्ज मागवल्याच्या घटनादेखील उघड करण्याचे प्रयत्न झाले. परंतु अशा घटना निषेधार्ह आहेत व त्याचे कुणासही समर्थन करता येणार नाही हे स्पष्ट झाले, हे बरे झाले.
देशाच्या नागरिकांमध्ये धर्म, जात, भाषा, वंश यांच्या आधारावर भेदभाव करता येणार नाही हे भारतीय राज्यघटनेमध्येच नमूद केलेले आहे. तरीही, घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली करून भेदभाव केल्याची अनेक उदाहरणे आजूबाजूस दिसतात. अशा भेदभावाच्या आधारे नोकऱ्या नाकारल्या जातात तसेच शाळांमधूनही धार्मिक आधारावर दुजाभाव करून आपल्या मुलांना प्रवेश नाकारला जातो, अशा तक्रारी पालक करीत असतात. भाडय़ाने घरे देणे किंवा सहकारी गृहनिर्माण संस्थांमधून विशिष्ट धर्माच्या वा जातीच्या नागरिकांना सदनिका घेण्यास प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रतिबंध करणे तर नित्याचेच झाले आहे. अशा भेदभावाला समाजातील सुपरिचित मान्यवरांनाही सामोरे जावे लागल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. अलीकडच्या काळामध्ये मुंबईमधल्या टॉवरमधील सदनिका विकत घेण्यास मांसाहारी नागरिकांना मज्जाव केला जात असून विशिष्ट धर्मीयांसाठीच या इमारती राखून ठेवण्यात येत आहेत. उद्योगधंद्यांमध्येही हे भेदभावाचे लोण शिरू लागले आहे. गुजरातमधल्या २००२ सालच्या दंगलींमागे अल्पसंख्याकांना लक्ष्य करून, विशिष्ट उद्योग वा व्यवसायांमधील अल्पसंख्याकांतील विशिष्ट जमातींचे डाचणारे प्राबल्य उद्ध्वस्त करून हे धंदे ताब्यात घेण्याचे अर्थकारण होते, असेही म्हटले जाते.
धर्म, जात, भाषा, वंश यांच्याआधारे केला जाणारा भेदभाव सामाजिक स्वास्थ्याला सुरुंग लावणारा असतो यात कुणाचेच दुमत असणार नाही. परंतु त्याचबरोबर देशातील कोणत्याही नागरिकाच्या व नागरी समूहाच्या मनामध्ये आपल्याबाबतीत भेदभाव करून प्रतिष्ठेचे जीवन जगण्याची संधी नाकारली जात आहे, अशी समजूत होणे हे देशाच्या एकतेच्या पायाला हानी पोहोचविणारे ठरू शकते. भेदभाव करणारे असोत वा ज्यांच्याबाबत भेदभाव होतोय, दोन्हीकडील काही धूर्त राजकारणी नेते भेदभावाच्या घटनांकडे काणाडोळा करतात, तर कधी राजकीय स्वार्थापोटी भेदभावाला खतपाणीही घालतात.
मुस्लिमांबाबत होत असलेल्या भेदभावाच्या घटनांमुळे मुस्लीम तरुणांमध्ये असुरक्षिततेची व बदल्याची भावना वाढीस लागू लागली आहे. ‘मुस्लीम म्हणून असलेली आमची ओळख आमच्याप्रति तिरस्काराला कारणीभूत आहे’ अशी भावना हे तरुण व्यक्त करू लागले आहेत. ही भावना अधिकाधिक तरुणांना नराश्यापोटी गुन्हेगारीकडे वा अतिरेकी कारवायांकडे वळण्यास भाग पाडू शकते. म्हणूनच मुस्लीम तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निदान सरकारी नोकऱ्यांमध्ये तरी आरक्षण द्यावयास हवे. तसेच भेदभावाच्या घटनांवर जरब बसेल अशी कारवाई करावयास हवी.
परंतु, मुस्लीम समाजानेही आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. भारतीय राज्यघटनेवर विश्वास असणाऱ्या व धर्माध वा जातीय विचारांपासून अंतर बाळगणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्येही भेदभाव करण्याची वृत्ती जोपासली जाऊ लागली आहे याची कारणे कोणती हाही विचार यानिमित्ताने होण्यास हरकत नसावी.
दैनंदिन जीवनातील क्षुल्लक वाटणाऱ्या घटनांमधूनच एकमेकांप्रति तिरस्काराची भावना निर्माण होत असते. किरकोळ घटनांमधून शिवीगाळी करून हातघाईवर येणे, कायद्याबद्दल तुच्छता बाळगणे, कर्तव्यपालन करणाऱ्या सरकारी नोकरांवर दहशत निर्माण करणे, सार्वजनिक जागांवर अतिक्रमण व अस्वच्छता निर्माण करणे या व अशा अनेक कारणांमुळे, पीडित बहुसंख्याकांच्या मनांत द्वेषाची भावना खदखदू लागते. मुंबईच्या रस्त्यांवरून अनेकदा वाहतुकीमध्ये भरधाव वेगाने मोटरसायकली वा गाडय़ा पळवणे हा डोक्यावर गोल टोप्या घातलेल्या अनेक तरुणांचा आवडता छंद आहे याचे प्रत्यंतर वांद्रे सी-िलक, कार्टर रोड वा महमद अली रोडवरील उड्डाणपुलावर हटकून येते. या इतरांसाठी धोकादायक प्रकारास एखाद्याने हरकत घेतल्यास त्याला जबर मारहाण केल्याची उदाहरणे आहेत. धार्मिक सणांच्या दिवशी रस्त्यावर व रेल्वे स्थानकांवर तरुणांचा उन्माद पराकोटीला पोहोचत असतो. या विशिष्ट दिवशी विनाकारण सार्वजनिक व खासगी मालमत्तेची नासधूस केल्याची नोंद पोलिसांकडे आहे. राहत्या ठिकाणी इमारतीतील सार्वजनिक वापराच्या जागा बळजबरीने ताब्यात घेऊन अन्य रहिवाशांना धाकदपटशा दाखवून तेथे येण्यास रोखण्यात येते. अन्य रहिवाशांचा विरोध असतानाही अशा जागांचा वापर प्राण्यांच्या बेकायदा कत्तलीसाठी केला जातो. या प्रसंगांमध्ये सामान्य माणसापुढे हात चोळत बसण्याशिवाय उपाय नसतो. अशा अनेक घटनांना जबाबदार असलेले तरुण कोणत्याही धर्माचे असतील, तरी ‘टपोरी’ हीच त्यांची ओळख. परंतु बऱ्याच टपोरी तरुणांची ‘मुस्लीम’ म्हणून असलेली ओळख ही एका समाजाच्या तिरस्कारास पात्र ठरते. उदाहरणार्थ, मुंबईतील आझाद मदान दंगलींसारख्या घटनांमधून तर मुस्लीम तरुणांच्या विरोधात जनमत तयार होते. इतिहासातून तसेच टीव्हीवरून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून पाहावयास उपलब्ध झालेल्या जगभरातील घटनांतून समोर येणाऱ्या मुस्लिमांच्या आक्रमक व क्रूर प्रतिमांना साजेसेच वर्तन आपल्या आजूबाजूस घडताना पाहणाऱ्या सामान्य माणसामध्येही मुस्लिमांबद्दल द्वेषाची भावना निर्माण होते.
काही माथेफिरूंच्या, अन्य धर्मीयांना, विशेषत: बहुसंख्याकांना दुखावणाऱ्या या वर्तनाचे परिणाम ‘झीशानसारख्या’ – म्हणजे उच्च शिक्षणाच्या माध्यमातून आपली व आपल्या समाजाची वेगळी ओळख बनवू पाहणाऱ्या- तरुणांना भोगावे लागतात. एखाद्या झीशानमुळे अशा घटनेला वाचा फुटते, परंतु सहसा अशा घटना दुर्लक्षितच राहतात, कारण बहुतेक अशा भेदभावाच्या घटनांचे ना कुणी साक्षीदार असतात ना कुठलेही पुरावे! अंतिमत: मुख्य प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्या व मुस्लीम समाजाची नवी ओळख बनू पाहणाऱ्या तरुणांची कुतरओढ होत राहते. याचे भान मुस्लीम समाजातील धुरीणांना येणे व त्यांनी या समस्येच्या मुळाशी जाऊन त्यावर उतारा शोधणे आवश्यक आहे. मदरशांमधून कट्टर धार्मिकतेचे शिक्षण देताना शिक्षणाचे उद्दिष्ट सुसंस्कृत माणूस घडविणे हे असल्याने, भावी पिढय़ांवर समाजामध्ये कसे वागावे, नागरिकशास्त्र म्हणजे काय, सभ्यतेच्या वर्तणुकीचे नियम कोणते, याचे संस्कारही करावे लागतील. आजवर या कामी अपयशी ठरलेल्या मुस्लीम समाजातील नेत्यांना, बुद्धिवंतांना व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. अन्यथा, मुस्लीम ही ओळख असलेले अगणित ‘झीशान’ तिरस्काराचे व वेगवेगळ्या प्रकारच्या भेदभावाचे बळी ठरत राहतील, मुस्लीम असण्याची सजा देण्यास शिवशिवणारे हात मजबूत होत राहतील व भेदभावविरहित भारतासाठी प्रयत्नशील राहणाऱ्यांची कुचंबणा होत राहील.

delhi farmer protest marathi news, trolley times newspaper marathi news, trolley times newspaper delhi farmers protest marathi news
ना ऑफिस, ना प्रेस… ट्रॅक्टरमधून निघणारं जगावेगळं वृत्तपत्र…
Ajit Pawar and rohit pawar
अजित पवारांना कुटुंबात एकटं पाडलं जातंय का?, रोहित पवार म्हणाले, “साहेबांनी बांधलेल्या घरातून…”
supreme court declared aam aadmi party candidate winner for chandigarh mayor post
अन्वयार्थ : भाजपने काय साधले ?
alexei navalny marathi news, alexei navalny death marathi news, russian opposition leader alexei navalny marathi news
अकस्मात मृत्यू की राजकीय हत्या? पुतिनविरोधक अलेक्सी नवाल्नी यांना संपवण्याचे कारण काय? जगभर त्यांच्या लोकप्रियतेचे रहस्य काय?

लेखक राजकीय विश्लेषक व सामाजिक कार्यकत्रे आहेत. ईमेल : ajitsawant11@ yahoo.com