कुटुंबातच आपण मुलामुलींत भेदभाव करतो. एखादा पुरुष संवेदनशील असेल तर त्याला आमचा समाज वेगळेच नाव देतो. ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे. मुलींवर बुरख्यासारखे बंधन न टाकता मुलांइतकेच महत्त्व देऊन तिला शिकण्यास प्रवृत्त करायला पाहिजे आणि स्वातंत्र्यही दिले पाहिजे..
सर्व जाती-धर्मातील महिलांवर होणारी हिसा जवळपास एकसारखी असते. मुस्लीम महिलांची थोडी भिन्न या कारणाने असते की, सनातनी, रूढीवादी, कट्टरपंथी मानसिकतेतून धर्माची अनेक बंधने स्त्रियांवर लादली जातात. महिलांवर होणारी ही हिसा शारीरिक असते, मानसिक असते, लैंगिक असते, आíथक असते, धार्मिक, सामाजिक आणि शासकीय असते. ही िहसा घरातून ते कामाच्या ठिकाणी, घराबाहेर समाजामध्ये दिसून येते.
काहींना असे वाटते की, ही हिसा फक्त आíथकदृष्टय़ा मागासलेल्या अशिक्षित झोपडपट्टीच्या लोकांपर्यंतच मर्यादित आहे, परंतु असे नाही. उच्चशिक्षित, आíथकदृष्टय़ा संपन्न घरांमध्येही िहसा असते. फक्त हिसेचा प्रकार बदलतो. अशा घरांमध्ये जरी काही वेळेला शारीरिक हिसा होत नसेल, परंतु मानसिक िहसा होत असते. शारीरिक हिसा म्हणजे थापड, लाथाबुक्क्याने, काठीने, चाबकाने मारून केली जाणारी िहसा होय. मानसिक हिसा म्हणजे टोमणे मारणे, प्रियजनांशी बोलू न देणे, एकटे पाडणे, संशय घेणे, स्वातंत्र्यावर बंधन टाकणे इत्यादी. टाकून बोलणे, शिव्या देणे ही शाब्दिक हिसा. आíथक हिसेमध्ये पसे खर्च करण्यास अंकुश लावणे, खर्चासाठी पसे न देणे किंवा कमी देणे, कमावलेले पसे घेऊन टाकणे, नोकरी किंवा काम करण्यास मज्जाव करणे हे होय.
लैंगिक िहसेमध्ये महिलेच्या इच्छेविरुद्ध वा अनेक वेळा संमती मिळवून शारीरिक संबंध स्थापित केले जाते. आमच्या समाजात पतीद्वारे लैंगिक िहसाच नसते असे मानले जाते. म्हणून पती या नात्याने तो कधीही पत्नीवर आपला अधिकार गाजवतो. विनयभंग त्याचप्रमाणे मुली किंवा महिलांची छेडछाड, महिलांच्या लैंगिकतेवर बंधने लादणे हेही लैंगिक िहसेमध्ये समाविष्ट होईल. धार्मिक िहसेमध्ये धर्माच्या आधारावर केली जाणारी हिसा. जसे स्त्रीला अपवित्र मानणे, पतिव्रता व चांगली स्त्री कशी असणार याबद्दलचे नियम, प्रथा परंपरा लादणे. मनुस्मृतीमध्ये म्हटले आहे की, ‘‘पिता रक्षति कौमारे, भरता रक्षति यौवने, स्थविरे पुत्रा रक्षन्ति न स्त्रि स्वातंत्रं अर्हति.’’ अर्थात पिता कौमार्य अवस्थेत रक्षण करेल, भाऊ यौवनात व म्हातारपणी पुत्र अशा प्रकारे स्त्रियांना स्वातंत्र्य नाही. मनुस्मृतीतील हे विचार बाबासाहेब आंबेडकरांनी २९ नोव्हेंबरला जाळले. तेव्हापासून स्त्रीवादी चळवळी हा दिवस स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा करतात. धर्माचा आधार घेत वटसावित्री, करवा चौथ, देवदासीसारख्या प्रथा पाळल्या जातात. पतीसाठी स्त्रीने नटूनथटून, डोक्यावर पदर किंवा बुरखा घ्यावा असे अपेक्षित असते. अनेक दंतकथांचा आधार घेत स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली जातात. मंदिरामध्ये किंवा दग्र्यामध्ये प्रवेश नाकारला जातो. मुस्लीम समाजामध्ये इस्लामच्या नावावर मुस्लीम पर्सनल लॉचा आधार घेऊन महिलांवर अनेक प्रकारचे नियंत्रण लादले जाऊन िहसा केली जाते.
महिलांना कुठलाही- शिक्षणाचा, निर्णय घेण्याचा, नोकरी करण्याचा, आपल्या मर्जीने लग्न करण्याचा, दत्तक घेण्याचा आणि मृत्युपत्रानुसार संपत्ती मिळण्याचा, इच्छेविरुद्ध तलाक व तलाकनंतर मुलांचा ताबा घेण्याचा अधिकारच नाकारला जातो. मुस्लीम स्त्रियांना बुरख्यामध्ये बंदिस्त जीवन जगावे लागते. इतकेच काय बायकोने आई-वडिलांशी किंवा आणखी कोणाशी बोलू नये म्हणून मोबाइलदेखील जवळ ठेवू दिला जात नाही. अनेक वेळा आई-वडिलांपेक्षा भाऊच जास्त बहिणीला नियंत्रित करीत असतो. पगंबरांच्या काळात मुस्लीम महिला नमाज पढायला मशिदीत जायच्या. कुराणाच्या काही आयतीत याचा स्पष्ट उल्लेख आहे. पण आज मुस्लीम महिला मशिदीत नमाज पढताना आढळत नाहीत. चांगली स्त्री कशी असेल? तिने नीतिमत्ता जोपासावी, ती सहनशील असावी, याबाबतील धर्माचे कायदे व नियम सर्वच धर्मात आहेत. त्याचप्रमाणे स्त्रीविरोधी फतवेही काढले जातात. धर्माचा आधार घेऊन, अंधश्रद्धा पसरवून बुवा-बाबांद्वारे स्त्रियांचे शोषणही केले जाते.
सामाजिक िहसेमध्ये समाजाने निर्माण केलेल्या प्रथा-परंपरा आहेत, ज्या स्त्रियांवर भेदभाव करणाऱ्या, मानवाधिकाराचे उल्लंघन करणाऱ्या व अन्याय करणाऱ्या आहेत. घराण्याच्या प्रतिष्ठेच्या नावाखाली अनेक मुली िहसा सहन करीत लाचारीचे जीवन जगतात किंवा काही ठिकाणी आपल्या पसंतीने लग्न केल्यास मृत्यूलाही सामोऱ्या जातात. पूर्वीच्या काळी िहदू धर्मात सती प्रथा, बालविवाह, केशवपन या प्रथा होत्या. स्वामी विवेकानंद, महर्षी धोंडो केशव कर्वे, शाहू महाराज, जोतिबा फुले यांसारख्या समाजसुधारकांनी त्या प्रथा बंद केल्या. आज जरी या प्रथा अस्तित्वात नसल्या तरी हुंडा प्रथा सुरू झालेली दिसते. ज्यामुळे देशात अनेक हुंडाबळीची प्रकरणे घडतात.
समाजाने स्त्री-पुरुष भेदभाव करून असमानता निर्माण केली. समाजाने निर्माण केलेल्या अनेक अन्याय्य रूढी-परंपरा मुस्लीम धर्माव्यतिरिक्त वेगवेगळ्या धर्मामध्ये आढळतात. वंश चालवणारा मुलगा असतो असे ग्राह्य़ धरून एक स्त्रीच महिलेवर िहसा करताना दिसते. यातूनच गर्भजल परीक्षण करून स्त्रीभ्रूणहत्येचा मोठा सामाजिक प्रश्न पुढे आलेला आहे. ‘‘पतीने मारले तर काय झाले, असे सांगून उदाहरण दिले जाते की बघा, आमच्या बहिणीने किती सहन केले, त्या मावशीने किती सहन केले आणि आजकालच्या पोरी उठल्यासुटल्या चालल्या पोलीस स्टेशनला..’’ याचा अर्थ स्त्रियांनी सहन करावे, हिसेला विरोध करू नये असेच आहे. उत्तर न देणारी, सहन करणारी, शांत राहणारी, सुसंस्कारी असते आणि िहसेला विरोध करणारी, प्रश्न विचारणारी, वाईट असते ही मानसिकता समाजामध्ये दिसून येते. इतकेच काय पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा स्त्री तक्रार करायला जाते तेव्हा पोलिसांची भूमिका स्त्रियांच्या बाजूने नसतेच. महिलांची तक्रार लिहून घेण्याऐवजी ते पुरुषांना मदत करतात. खुलेआम पोलीस म्हणतात, काय झाले नवऱ्याने दोन थापडय़ा मारल्या तर? त्याचप्रमाणे स्त्री उपभोगाची वस्तू म्हणून बघितली जाते. जाती व्यवस्थेंतर्गत विशिष्ट समाज खालच्या जातीतील स्त्रियांवर हिसा करतो. मग तो बलात्कार किंवा इतर प्रकारची लैंगिक िहसा असेल.. ही झाली सामाजिक िहसा. शासनाकडूनही महिलांवर हिसा होते. महिलांसाठीच्या वेगवेगळ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, संविधानाने उल्लेखिलेले स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांवर आधारित स्त्री-पुरुष भेदभाव न राहता स्त्रियांचे अधिकार त्यांना मिळायला हवे. त्यांच्याकरिता पुरुषांची ओरड न राहता आरक्षण असावे. अनेक वर्षांपूर्वी स्त्रियांना मतदानाचा, शिक्षणाचा अधिकार नव्हता. मोठा संघर्ष करून तो मिळविला गेला. कायदा व्यवस्था न्याय प्रणालीत स्त्रियांना अनेक वेळा न्याय मिळत नाही. कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नाही.
कुटुंबातच आपण मुलामुलींत भेदभाव करतो. मुलींना खेळायला भांडी देतो, तर मुलांना बंदूक दिली जाते. घरातल्या कामात तो जरी मदत करायला तयार असेल तरी समाज ते करू देत नाही. त्याने मर्द बनावे असे सांगितले जाते. समाजासमोर मर्द कसा असावा? तर मोठय़ा मिशा, कडक आवाज, रागावणारा, मारणारा, मुलींना छेडणारा अशी प्रतिमा निर्माण केली जाते. पण जर एखादा पुरुष हळुवार बोलणारा, भावुक, संवेदनशील, घरातील कामात मदत करणारा असेल तर त्याला आमचा समाज वेगळेच नाव देतो. ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे.
ही मानसिकता पुरुषप्रधान आहे. या मानसिकतेत परिवर्तन घरातूनच व्हायला हवे. लिगभेद असमानतेविषयीचे संस्कार बालपणापासून द्यावेत. बलात्कारी घरातूनच निर्माण होणार नाही याबद्दल प्रशिक्षण द्यावयास हवे. या नियमांना तोडणे आवश्यक आहे. प्रत्येक घरातूनच सुरुवात व्हायला हवी. मुलींप्रमाणे मुलांवरही बंधने टाकली पाहिजेत. आम्ही मुलीला कमी लेखणे बंद केले पाहिजे. स्त्री-पुरुष समानता स्थापित केली पाहिजे. मुलींवर बुरख्यासारखे बंधन न टाकता मुलांइतकेच महत्त्व, मान देऊन तिला शिकण्यास प्रवृत्त करायला पाहिजे, स्वातंत्र्य दिले पाहिजे..

रुबिना पटेल
लेखिका मुस्लीम समाजातील सुधारणावादी कार्यकर्त्यां आहेत. त्यांचा ई-मेल rubinaptl@gmail.com