कधी मध्यमावरून पंचमाकडे झेपावलेले स्वर, तर कधी एका मात्रेवरून समेवर झेपावणारी तान.. कधी हळुवारपणे सहज आलेली केदार रागातील एखादी चीज, तर कधी वातावरण प्रसन्न करत आळवलेले यमनचे स्वर.. कधी संगीतातील एखादी अवघड गोष्ट सोपी करून सांगितल्यावर मिळालेली दाद, तर कधी एखाद्या खुमासदार मार्मिक टोल्यानंतर श्रोत्यांमध्ये उसळलेला हशा.. प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर संकुलातील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या लघू नाटय़गृहात पं. सत्यशील देशपांडे यांच्याशी लोकसत्ता गप्पाचांगल्याच रंगल्या. केसरी टुर्ससहप्रायोजक असलेल्या या मैफलीचा आस्वाद घेण्यासाठी साहित्य, संगीत, चित्रपट, नाटय़ अशा विविध क्षेत्रांमधील मान्यवर एकत्र आले. स्वरनिष्ठांची ही मांदियाळी पं. सत्यशील देशपांडे यांच्या गप्पांनी अक्षरश: मंत्रमुग्ध झाली. लोकसत्ताचे साहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांच्या साथीने सुरू झालेल्या या गप्पा उत्तरोत्तर रंगत गेल्या..

कलावंत समजण्यास मदत होते

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
46 lakhs in the bungalow and house of the corrupt Tehsildar
नोटांचे ढीग पाहून एसीबी अधिकारीही चक्रावले; लाचखोर तहसीलदाराच्या बंगला व घरात ४६ लाखाचे घबाड, कॅश मोजायला…
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

सर्जनशील कलावंतांना आणि साहित्यिकांना एका व्यासपीठावर आणून त्यांच्याशी अनौपचारिक स्वरूपात गप्पा मारण्याचा योग घडवून आणणे हे खूप मोठे काम आहे. अशा स्वरूपाच्या गप्पांतून त्या कलावंतांच्या क्षेत्राविषयी तर कळतेच, मात्र त्याच्या कलेकडे तो कलावंत कसा पाहतो, हे समजण्यास मदत होते. शब्दाला संगीताच्या दृष्टीने प्रवाही करणे हे पं. सत्यशील देशपांडे यांचे वैशिष्टय़ आहे.

अमरेंद्र धनेश्वर, ज्येष्ठ संगीत समीक्षक आणि ग्वाल्हेर घराण्याचे गायक

 

समृद्ध करणारा अनुभव

पं. सत्यशील देशपांडे यांनी शब्दांच्या आणि सुरांच्या सुंदर मिलाफाने सजवलेल्या मैफलीचे आपण साक्षीदार असणे, हे मी माझे भाग्य समजते. हा संपूर्ण अनुभव समृद्ध करणारा होता. पुढील अनेक वर्षे ही मैफल माझ्या मनात रेंगाळेल.

फैय्याज शेख, ज्येष्ठ अभिनेत्री आणि गायिका

 

संगीत ही आत्म्याची भाषा

शास्त्रीय संगीत म्हणजे केवळ शास्त्राचे झेंडे नाचवणे नाही. संगीत ही आत्म्याची भाषा आहे. संगीताला भिडणे महत्त्वाचे असते. मग ते कोणत्याही परंपरेचे गाणे असो. पं. सत्यशील देशपांडे यांनी गप्पांतून तेच सांगितले. त्यांच्या गाण्याने गाणेपण टिकविताना किती अलिप्ततेने गायले जाऊ शकते, हे जाणवले.

राजा काळे, ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक

 

शास्त्रीय संगीत विसरणे कठीण

‘लोकसत्ता गप्पा’ उपक्रमामुळे केवळ कलावंताच्या कलेविषयी नव्हे, तर त्या व्यक्तीविषयी जवळून जाणून घेता येते. त्याचे कलेबद्दलचे आकलन आणि ज्ञान समजून घेण्यास मदत होते. शास्त्रीय संगीताला विसरून पुढे जाता येणार नाही. शास्त्रीय संगीताचा प्रवाह सुरू राहण्यास अशा उपक्रमामुळे भर पडेल.

वसंतराव आजगावकर, ज्येष्ठ संगीतकार आणि गायक

 

संगीतातही आवाजाचा वापर

खरं तर मी संगीताचा दर्दी नाही. मी ‘व्हॉइस कल्चर’चा विद्यार्थी आहे. त्यामुळे आवाजाचा वापर संगीतात कसा केला जातो, याचा एक वेगळा विचार ऐकायला मिळाला. यापूर्वी कुमारजींची मैफल ऐकली होती, पण त्यांच्या सहवासात असलेल्या गायकाने/ शिष्याने ते गाणे उलगडून सांगणे, त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेणे हा वेगळाच आनंद होता.

अजित भुरे, नाटय़निर्माता आणि दिग्दर्शक

 

कलेतील उत्कट क्षण

शास्त्रीय संगीत हा विशाल समुद्रासारखा विषय आहे. पं. सत्यशील देशपांडे यांनी तो सोप्या शब्दांत उलगडून सांगितला. तो भारावून टाकणारा अनुभव होता. या स्वरगप्पांमुळे कलेतील उत्कट क्षण अनुभवता आला.

अमृता सुभाष, अभिनेत्री कलावंत समजून घेता आला

 

पं. सत्यशील देशपांडे यांनी आपल्या अनोख्या शैलीतून भारताच्या कानाकोपऱ्यातील संगीताची सुरेल सफर घडवली. या उपक्रमामुळे एखाद्या कलावंताला समजून घेणे सोपे जाते. कलावंतासोबत एकत्र गप्पा मारण्याची संधी मिळाली.

पुष्पा पागधरे, ज्येष्ठ पाश्र्वगायिका

 

गाणे समजले’!.

ज्यांना गाण्याचे तंत्र किंवा शास्त्रोक्त पद्धत कळत नाही, परंतु गाण्यात रस आहे, अशा व्यक्तींना गाण्यातील सौंदर्यस्थळे सोप्या पद्धतीने कोणी सांगणार असेल तर गाण्याचे तंत्र न समजणाऱ्या व्यक्तीलाही गाणे समजल्यासारखे वाटते. माझेही तसेच झाले. त्यामुळे मी गाण्याचा अधिक आस्वाद घेऊ शकलो. पं. सत्यशील देशपांडे हे शास्त्रीय संगीतातील/ गाण्यातील अधिकारी व्यक्ती आहेत. त्यांच्याकडून गाण्याविषयी, शब्दांच्या सौंदर्याविषयी ऐकता आले हा अनुभव समृद्ध करणारा होता.

अतुल परचुरे, अभिनेता सांगीतिक सफर

 

संगीत ऐकताना जेवढे समृद्ध वाटते, तेवढे त्यावर बोललेले वाटत नाही, परंतु पं. सत्यशील देशपांडे यांच्या सूर आणि शब्दांच्या सुंदर मिलाफाने सजलेल्या या स्वरगप्पा आणि मैफलीमुळे सांगीतिक सफर घडली. भारताच्या कानाकोपऱ्यातील संगीताविषयी जाणून घेता आले. मन आणि बुद्धी तृप्त झाली.

अशोक हांडे, निर्माते

 

मराठी बाणाकार्यक्रम अभ्यासाचा भाग

पं. सत्यशील देशपांडे यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तींकडून त्यांच्या कलेविषयीचा आणि आयुष्याविषयीचा दृष्टिकोन ऐकायला मिळणे, हे माझ्यासारख्या तरुण कलावंतासाठी अभ्यासाचा भाग होता. कुमारजींकडून संगीताचे शिक्षण घेतल्यानंतरही स्वत:च्या लयीने गायचे आणि ओळख निर्माण करायची, हा सगळा अनुभव खूप छान होता.

हृषीकेश जोशी, अभिनेता

 

सुखद अनुभव..

पं. सत्यशील देशपांडे यांच्याशी गप्पा हा नेहमीच आयुष्यातील सुखद भाग.  अगदी ख्याल गायकी असो किंवा उपशास्त्रीय संगीत असो. या दोन्हींबाबत नुसते ज्ञान नाही तर त्यामागे त्यांचा एक अभ्यास आहे. कुठलेही संगीत तपासून पाहत असताना त्यामागची महत्त्वाची गोष्ट भावनिक नाही तर वैचारिक

बैठक असते हे सत्यशील यांचे वैशिष्टय़ राहिले आहे.

डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ दिग्दर्शक

 

जगण्यातील महत्त्व

संगीताचे जगण्यातील महत्त्व पं. सत्यशील देशपांडे यांनी उलगडून सांगितले. हा अनुभव श्रीमंत करणारा होता. कुठल्याही कलेत तुम्ही तुमची जागा निर्माण करणे महत्त्वाचे असते, हा विचार भावला.

अविनाश नारकर, अभिनेता

 

गप्पा.. समृद्ध करणाऱ्या

खरं तर गप्पा मनाचा विरंगुळा व्हावा म्हणून मारल्या जातात, परंतु एका प्रतिभावंत कलावंतासोबतच्या गप्पा मारणे हा अनुभव समृद्ध करणार होता. संगीतातले मला अजिबात कळत नाही, पण पं. सत्यशील देशपांडे यांनी शास्त्रीय संगीत हा विषय सहज आणि सोप्या भाषेत समजावून सांगितला.

ऐश्वर्या नारकर, अभिनेत्री

 

स्वरगप्पात आमचाही खारीचा वाटा

‘लोकसत्ता’ सातत्याने उत्तमोत्तम कार्यक्रम आणि उपक्रम राबवीत असते. एक जबाबदार आणि अग्रेसर वृत्तपत्र म्हणून ‘लोकसत्ता’ची ओळख आहे. ‘स्वरगप्पा’तून पं. सत्यशील देशपांडे यांना ऐकता आले. हा अनुभव श्रीमंत करणार होता. या उपक्रमासाठी ‘केसरी टुर्स’ने खारीचा वाटा उचलला याचा आनंद आहे.

केसरी पाटील, केसरी टुर्स

 

Untitled-14

अनोखी मानवंदना ; पं. सत्यशील देशपांडे यांनी या स्वरगप्पा वेगळ्याच उंचीवर नेल्या. उपस्थित मान्यवरांनी मग असे उभे राहून त्यांची  प्रतिभा आणि स्वरसाधनेला सलाम केला..

 

Untitled-15

स्वरगप्पांचा ठेवा अनमोल खरा.. केसरी टुर्सचे केसरी पाटील, सुनीता पाटील आणि ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल गप्पांची मजा लुटताना..

 

Satyasheel-Deshpande

Untitled-17