राजकारणाचे गुन्हेगारीकरण हा नेहमीच चर्चेतील विषय. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून गुन्हेगारीकरणाच्या विरोधात सूर आळवला जातो. पण नेतेमंडळींच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक असतो. महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्यांना संधी दिली आहे. याबरोबरच निवडणुका जिंकण्यासाठी आयाराम-गयाराम मोठय़ा प्रमाणात झाले. रातोरात स्थानिक नेत्यांनी पक्ष बदलले. निष्ठा, विचार हे सारे गुंडाळून ठेवण्यात आले. निवडणुकीतील ही एकंदरच गुंड-गर्दी आणि आयाराम-गयाराम यांचा हा आढावा. आपण मतदानास जाताना आपल्यासमोर कोणते पर्याय आहेत, याची जाणीव व्हावी यासाठी..

मुंबई

Doordarshan logo, saffron logo,
दूरदर्शनचा भगवा लोगो… रंगांना राजकारणात एवढं महत्त्व का?
mou signed politics marathi news, ravikant tupkar marathi news
आता राजकारणातही उघड सामंजस्य करार! शेतकरी संघटनेचे ‘एमओयू’नंतर रविकांत तुपकर यांना पाठबळ
Manmohan Singh journey from economic reform face to accidental PM analysis by Neerja Chowdhury
आर्थिक सुधारणांचा शिल्पकार ते ‘अपघाती पंतप्रधान’; निवृत्तीनंतर मनमोहन सिंगांना इतिहास न्याय देईल?
shivpal yadav
समाजवादी पक्षातील उमेदवारांच्या फेरबदलामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम; बदायूमधून कोणाला मिळणार उमेदवारी?

शिवसेना

  • ’राजेंद्र सूर्यवंशी (प्रभाग क्र. १८४) – खंडणीसाठी धमकावणे, सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी हल्ला करणे, फसवणूक, फसवणुकीच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे तयार करणे, त्यांचा वापर करणे.
  • ’राजन पाध्ये (प्रभाग क्र. ५८) – सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी हल्ला करणे, एखाद्याच्या घरात घुसखोरी करणे, घातक शस्त्राने हल्ला
  • ’अमेय घोले (प्रभाग क्र. १७८) – खंडणी, कागदपत्रे बनावट आहेत हे माहीत असूनही ती जवळ बाळगणे व ती खरी असल्याचे भासवण्याचा इरादा बाळगणे, हल्ल्यासाठी घरात घुसणे, लष्करी जवानाची थट्टा करणे.
  • ’सचिन गायकवाड (प्रभाग क्र. १३३) – विनयभंग, मारहाण
  • ’अरविंद शिसटकर (प्रभाग क्र. १६१) – खंडणी, घातक शस्त्राने दुखापत
  • ’उमेश माने (प्रभाग क्र. ११५) – हत्येचा प्रयत्न, घातक शस्त्रांचा वापर करून गंभीर दुखापत करणे
  • अरविंद राणे (प्रभाग क्र. २२७) – न्यायालयातील रेकॉर्ड बनावट

 

भाजप

  • ’विक्रम चोगले (प्रभाग क्र. १२) – दरोडा, घुसखोरी, मारहाण
  • ’नीला राठोड (प्रभाग क्र. ६) – दरोडा, जबरी चोरीदरम्यान गंभीर दुखापत
  • ’ज्योती अळवणी (प्रभाग क्र. ८५) – भाजपचे आमदार पराग अळवणी यांच्या पत्नी ज्योती यांच्यावर एकूण तीन गुन्हे. त्यातील दोन कलमे गंभीर. यात घातक शस्त्रांनी मारहाणीचा समावेश.
  • ’दिनेश तथा बब्लू पांचाळ (प्रभाग क्र. १४१) – शिवसेनेचे नगरसेवक होते. तिकीट न मिळाल्याने भाजपमध्ये गेले. हत्येचा प्रयत्न यासह एकूण तीन गुन्ह्यांची नोंद
  • ’विद्यार्थी सिंग (प्रभाग क्र. १३) – विनयभंग
  • ’मंगेश सांगळे (प्रभाग क्र. ११८) – मनसेचे माजी आमदार व आता भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात. एकूण तीन गुन्हे. त्यापैकी सरकारी कामात अडथळा हा गंभीर गुन्हा

 

काँग्रेस

  • ’पुष्पा भोळे (प्रभाग क्र. ७४) – फसवणूक, फसवणुकासाठी बनावट कागदपत्रे तयार करणे
  • ’मजीत मोहम्मद हनीफ शेख (प्रभाग क्र. १४५) – घातक शस्त्रांनी गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्रांनी हल्ला करणे, चोरी आणि चोरीचा मुद्देमाल स्वीकारणे

 

राष्ट्रवादी

  • ’बाबू बटटेली (प्रभाग क्र. १६४) – बनावट कागदपत्रे तयार करणे, सरकारी अधिकाऱ्याचा किंवा बॅंक कर्मचाऱ्याचा फौजदारी विश्वासघात करणे, खोटा पुरावा तयार करणे
  • ’विशाल दुराफे (प्रभाग क्र. १७२) – हत्या, हत्येसाठी अपहरण, अपहरण, निष्काळजीपणे वाहन चालवणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि सामाजिक शांतता भंग करण्यासाठी तेढ निर्माण करणे
  • ’आरिफ अब्दुलसलाम सय्यद (प्रभाग क्र. १७९) – घुसखोरी, घातक शस्त्रांनी दुखापत, चोरी
  • ’इलासबी मुजावर (प्रभाग क्र. १४३) – विनयभंग, मारहाणीत गंभीर दुखापत
  • ’अजय दत्ताराम विचारे (प्रभाग क्र. ५८) – दरोडा, घुसखोरी
  • ’नंदकुमार वैती (प्रभाग क्र. १०६) – खंडणी
  • ’कप्तान मलिक (प्रभाग क्र. १७०) – विनयभंगासह एकूण तीन गुन्हे. त्यातील दोन कलमे गंभीर स्वरूपाची

 

मनसे

  • ’घनश्याम परब (प्रभाग क्र. ५१) – विनयभंग, खंडणीसाठी धमकावणे, हल्ला करून गंभीर जखमी करणे, हल्ल्यासाठी एखाद्याच्या घरात घुसखोरी करणे, घातक शस्त्राने हल्ला करणे
  • ’राजेश हेगडे (प्रभाग क्र. १७३) – खंडणी, खंडणीसाठी धमक्या असे दोन गंभीर गुन्हे
  • ’संदेश गायकवाड (प्रभाग क्र. ८७) – विनयभंग, गंभीर मारहाण
  • ’राजेश केणी (प्रभाग क्र. १७२) – हत्येचा प्रयत्न, विनयभंगाचा गुन्हा

 

अन्य व अपक्ष

  • ’बीना रामकुबेर सिंग – अपक्ष (प्रभाग क्र. ४९) – हत्येसाठी अपहरण, खंडणी
  • ’राकेश अरोरा – अपक्ष (प्रभाग क्र. ८५) – दरोडा, विनयभंग, घातक शस्त्रांनी हल्ला
  • ’अशोक खरात – लोकजनशक्ती पार्टी (प्रभाग क्र. ११५) – पूर्वाश्रमीचे टोळीदादा. भांडुपमधल्या टोळीयुद्धात सक्रिय सहभाग. मोक्कासह दोन गुन्हे दाखल. त्यातील चार कलमे गंभीर स्वरूपाची. खंडणीसाठी धमक्या, दरोडा, घातक शस्त्रांनी गंभीर दुखापत अशा स्वरूपाचे गुन्हे
  • ’दिनेश दिलीप शेलार – अपक्ष (प्रभाग क्र. १२७) – घातक शस्त्रांनी हल्ला, महिलेला अपमानास्पद वागणूक
  • ’चंगेज मुलतानी – अपक्ष (प्रभाग क्र. ६२) – पॉस्को कायद्यानुसार बलात्कार, विषारी द्रव्य पाजून दुखापत करणे आणि फसवणूक
  • ’नीलेश भोसले – अपक्ष (प्रभाग क्र. १४६) – हत्येचा प्रयत्न, मारहाण
  • ’प्रकाश पवार – अपक्ष (प्रभाग क्र. १९७) – फसवणूक
  • ’पॉल राफेल नरपरंबीरल – अपक्ष (प्रभाग क्र. १८५) – अपहरण, जबरी चोरीचे दोन गुन्हे

 

 

ठाणे

शिवसेना

  • ’गुरमुखसिंग स्यान (प्रभाग क्र. १६ क) – बनावट नाणे तयार करणे, दरोडा
  • ’माणिक पाटील (प्रभाग क्र. १६ ड) – खुनाचा प्रयत्न
  • ’दीपक वेतकर (प्रभाग क्र. १८ अ) – घातक हत्यारांनी दुखापत पोहचवणे, जबरी चोरी
  • ’गणेश कांबळे (प्रभाग क्र. ९ अ) – खुनाचा प्रयत्न, हत्यारांनी दुखापत पोहचवणे, जबरी चोरी

भाजप

  • ’नीलेश रामचंद्र पाटील (प्रभाग क्र. ६ ब) – खुनाचा प्रयत्न, दरोडा, मृत्यू किंवा जबर दुखापत घडवून आणण्याच्या प्रयत्नांसह जबरी दरोडा
  • ’संतोष शेलार (प्रभाग क्र. ६ ड) – खून, खुनाचा प्रयत्न, दंगा करणे, दुखापत पोहचविणे
  • ’रत्नप्रभा पाटील (प्रभाग क्र. १० ब) – खुनाचा प्रयत्न
  • ’रजनीश त्रिपाठी (प्रभाग क्र. १६ क) – चोरी, दंगा, विनयभंग
  • ’मुकेश मोकाशी (प्रभाग क्र. – अ) – अपहरण

काँग्रेस

  • ’विक्रांत भीमसेन चव्हाण (प्रभाग क्र. ७ ड) – आत्महत्येस प्रवृत्त करणे

राष्ट्रवादी

  • ’रामआशीष राजबली यादव (प्रभाग क्र. ४ ड) – घातक हत्यारांनी जबर दुखापत पोहोचवणे, खुनाचा प्रयत्न करणे
  • ’नजीब मुल्ला (प्रभाग क्र. १० अ) – फसवणूक करणे, मालमत्तेचा अप्रामाणिक अपहार, मूल्यवान रोखा, मृत्युपत्र इत्यादीचे बनावटीकरण, आत्महत्येस प्रवृत्त करणे
  • ’हनुमंत जगदाळे (प्रभाग क्र. ६ ड) – आत्महत्येस प्रवृत्त करणे

मनसे

  • ’शेख जलीम अहमद अब्दुल (प्रभाग क्र. १० अ) – खुनाचा प्रयत्न, दंगल शमविणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ला करणे
  • ’अखिलेश यादव (प्रभाग क्र. १६ क) – चोरीच्या मालमत्तेचा व्यवहार करणे

अपक्ष

  • ’सुधाकर चव्हाण (प्रभाग क्र. ५ ड) – आत्महत्येस प्रवृत्त करणे, फसवणूक

 

उल्हासनगर

शिवसेना

  • ’राजेंद्रसिंग भुल्लर (प्रभाग क्र. ३) – हत्येचा प्रयत्न, मारहाण
  • ’चंद्रशेखर यादव (प्रभाग क्र. १४) – हत्येचा प्रयत्न
  • ’सुमीत सोनकांबळे (प्रभाग क्र. १३) – हाणामारी, गंभीर दुखापत, शांतताभंग करणे, धमकी देणे.
  • ’लीलाबाई आशाण (प्रभाग क्र. १४) – बेकायदा जमाव जमवणे, दंगल घडवून आणणे, मारहाण करणे
  • ’प्रकाश गुरनानी (प्रभाग क्र. १७) – फसवणूक.
  • ’चांदवानी ठाकूर (प्रभाग क्र. १७) – शांतताभंग करणे, मारहाण करणे, दरोडा

भाजप

  • ’देवराम ठुबे (प्रभाग क्र. ४) – हत्येचा प्रयत्न
  • ’महेश सुखरामानी (प्रभाग क्र. ६) – बनावट कागदपत्रे तयार करणे, दंगलीत सहभाग, शिक्षामाफीच्या शर्तीचा भंग
  • ’कपिल अडसूळ (प्रभाग क्र. ४) – मारहाण, गंभीर दुखापत
  • ’अशोक ऊर्फ सोनू छाप्रू (प्रभाग क्र. ५) – लाच घेणे, अश्लील पुस्तकांची विक्री
  • ’सचिन भानुशाली (प्रभाग क्र. १७) – मारहाण, शांतता भंग करणे.
  • ’किशोर बनवारी (प्रभाग क्र. १९) – लोकसेवकाच्या कामात अडथळा, विनयभंग.
  • ’मीना सोंडे (प्रभाग क्र. १९) – शांतताभंग करणे
  • ’किशोरसिंग जग्यासी (प्रभाग क्र. १६) – शांतताभंग करणे
  • ’मनोज साली – भाजप पुरस्कृत (प्रभाग क्र. ९) – हत्येचा प्रयत्न, मारहाण, गंभीर दुखापत, शांतताभंग करणे, सरकारी कामात अडथळा, बेकायदा जमाव जमवणे

काँग्रेस

  • ’अस्लम शेख (प्रभाग क्र. २०) – हत्येचा प्रयत्न

राष्ट्रवादी

  • ’चंद्रमणी सासणे (प्रभाग क्र. ७) – मारहाण, गंभीर दुखापत
  • ’भारत राजवानी (प्रभाग क्र. १७) – शांतताभंग करणे, सरकारी कामात अडथळा
  • ’जानु मानकर (प्रभाग क्र. २०) – लोकसेवकाच्या कामात अडथळा, मारहाण, शांतताभंग करणे, धमकी

मनसे

  • ’सचिन कदम (प्रभाग क्र.१४) – लोकसेवकाला मारहाण, दंगल, शांतताभंग करणे, सशस्त्र दंगल.
  • साई पक्ष, अन्य व अपक्ष
  • ’मोहन रामराख्यानी – साई पक्ष (प्रभाग क्र. ८) – दंगल घडवणे, धमकी देणे, फसवणूक करणे
  • ’आनंद निकम – साई पक्ष (प्रभाग क्र. २) – गंभीर दुखापत, मारहाण
  • ’नरेंद्र साळवे – साई पक्ष (प्रभाग क्र. १४) – मारहाण आणि अपहरण.
  • ’सुभाष मनसुलकर – साई पक्ष (प्रभाग क्र. १४) – बलात्कार, धमकी देणे, मारहाण
  • ’सुभाष दोंदे – बसप (प्रभाग क्र. ७) – महिलेचे अपहरण
  • ’ब्रेशराव सोडाबत्तणी – अपक्ष (प्रभाग क्र. ८) – मारहाण
  • ’भानजी मोरे – रिपाइं (प्रभाग क्र. ४) – गंभीर दुखापत आणि मारहाण
  • लता बिऱ्हाडे- अपक्ष (प्रभाग क्र. ४) – मारहाण, गंभीर दुखापत
  • ’वाल्मिक वाघ – अपक्ष (प्रभाग क्र. १८) – मारहाण, अपहरण, शांतताभंग करणे
  • ’गोपीनाथ कडू – अपक्ष (प्रभाग क्र. १६) – जबरी चोरी करताना दुखापत, चोरी.
  • ’गणेश सावंत – अपक्ष (प्रभाग क्र. १६) – अपहरण

 

पुणे

भाजप

  • ’उमेश चव्हाण (प्रभाग क्र. १७, रास्ता पेठ-रविवार पेठ) – दुहेरी खून खटल्यात निर्दोष मुक्तता, पण मनसे नगरसेविका रुपाली पाटील यांच्या भावावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल.
  • ’विनय कदम (प्रभाग क्र. ३८-राजीव गांधी उद्यान,बालाजीनगर) – दुहेरी खून खटल्यात आरोपी, पण प्रमुख साक्षीदार उलटल्याने निर्दोष मुक्तता. कात्रज भागात कदम कुटुंबयांची दहशत.
  • ’सुनील कांबळे (प्रभाग क्र. ??) – समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे बंधू. खून खटल्यात आरोपी
  • ’दिनेश धाडवे (प्रभाग क्र. ??) – राष्ट्रवादीतून अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश. टोळीयुद्धात सहभागी. कुख्यात गुंड बाबा बोडके टोळीतून गुन्हेगारी कारवाया. खून खटल्यातून निर्दोष मुक्तता, पण दहशत कायम.

राष्ट्रवादी

  • ’वनराज आंदेकर (प्रभाग क्र. १७) – वडील सूर्यकांत ऊर्फ बंडूअण्णा यांची मध्य भागात दहशत. वनराज याच्याविरुद्ध काही वर्षांपूर्वी तडिपारीची कारवाई

 

 

नाशिक

राष्ट्रवादी

  • ’गौरव गोवर्धने – खुनाच्या गुन्ह्य़ातून पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता. हाणामारीचा वेगळा गुन्हा दाखल.
  • ’चंद्रकांत सडे – एकूण चार गुन्हे. खून, जिवे मारण्याचा प्रयत्न, धमकावणी आदी.

मनसे

  • ’योगेश शेवरे – खून, दरोडा, हाणामारी, दंगल

अन्य व अपक्ष

  • ’पवन पवार (भाजपवासी, पण अपक्ष उमेदवारी) – सर्वाधिक नऊ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल. त्यात पोलीस कर्मचाऱ्याची हत्या, खंडणी, दमदाटी, घातक शस्त्र बाळगणे, पोलिसांशी अरेरावी आदींचा समावेश.
  • ’प्रकाश लोंढे (रिपाइं, आठवले गट) – रिपाइंचे माजी शहराध्यक्ष. नऊ गुन्हे दाखल. त्यातील आठ गुन्ह्य़ांतून निर्दोष मुक्तता. न्यायालयाच्या आवारात पोलिसाला शिवीगाळ, शासकीय कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी एक गुन्हा आहे. लोंढे यांच्या नावाने पी. एल. ग्रुप सक्रिय आहे. लोंढे यांचा मुलगा भूषण तो गट चालवितो. त्याच्यावरही हत्या, प्राणघातक हल्ला व दमदाटी या स्वरूपाचे गुन्हे दाखल

नागपूर

भाजप

  • ’प्रवीण दटके, विद्यमान महापौर – शासकीय कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण, तोडफोड
  • ’संदीप जोशी – शासकीय कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण, तोडफोड
  • ’शरद पडोळे – मारहाण करणे, बेकायदा जमाव एकत्र करणे
  • ’प्रदीप पोहणे – मारहाण करणे, धमकावणे
  • ’रवींद्र भोयर – धमकावणे, घरात शिरून आर्थिक नुकसान करणे
  • ’दयाशंकर तिवारी – फसवणूक, विश्वासघात आणि देशाविरुद्ध युद्ध पुकारणे
  • ’नरेंद्र ऊर्फ बाल्या बोरकर – अ‍ॅट्रॉसिटी, धार्मिक भावना भडकावणे
  • ’नागेश गोविंदराव सहारे – खंडणी वसुली

 

कॉंग्रेस

  • ’हरीश मोहन ग्वालबंशी – मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे
  • ’अनिल रविशंकर पांडे – फसवणूक करणे
  • ’धरमपाल देवराव पाटील – फसवणूक करणे
  • ’किशोर गजभिये – फसवणूक करणे, मारहाण आणि विनयभंगाचे गुन्हे
  • ’अनिल महादेव वाघमारे – मारहाण करणे, धमकावणे
  • ’प्रशांत रामराव धवड – बंदी बनवून ठेवणे
  • ’पुरुषोत्तम नागोराव हजारे – खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे आणि एकदा तडीपार
  • ’तोयसिफ अब्दुल वहीद अहमद – मारहाण करणे, विनयभंग, जिवे मारण्याची धमकी देणे, खुनाचा प्रयत्न करणे

शिवसेना

  • ’अल्का दलाल – शासकीय कामात अडथळा निर्माण करणे
  • ’अनिल माधवराव धावडे – खंडणी मागणे, हत्या करणे यासह एकूण ११ गंभीर गुन्हे

 

राष्ट्रवादी

  • जगदीश ग्वालबंशी – फसवणूक व विश्वासघात करणे

 

वर्धा

भाजप

  • ’विलास कांबळे, विद्यमान जि. प. उपाध्यक्ष – सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण, कामात अडथळा, शारीरिक इजा, जिवे मारण्याची धमकी व जिवे मारण्याचा प्रयत्न.
  • ’मिलिंद भेंडे – बलात्कार, महिलेच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करणे, अश्लिल शिवीगाळ, मारहाणीत सहआरोपी.

काँग्रेस

  • ’विलास दौड – जीवे मारण्याचा प्रयत्न.

 

 

अकोला

  • ’आझाद खान (काँग्रेस)- मारहाण, धमकी देणे, दहशत पसरविणे
  • ’नसीर खान (राष्ट्रवादी काँग्रेस) – खून प्रकरणातील आरोपी

अमरावती

  • ’शेख जफर शेख जब्बार, विद्यमान उपमहापौर (काँग्रेस) – खंडणी, अपहरण, हत्त्येचा प्रयत्न यासारख्या अनेक गंभीर गुन्ह्य़ांची नोंद

 

 

चंद्रपूर

  • ’विनोद अहिरकर (काँग्रेस) – अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा
  • ’बंडोपंत मल्लेलवार (अपक्ष)- नक्षलवाद्यांना शस्त्रपुरवठा करणे
  • ’सैनू गोटा (ग्रामसभेचे उमेदवार) – पोलिसांच्या कामात अडथळा आणने, बदनामी करणे
  • ’श्रीमती पराते (ग्रामसभेचे उमेदवार)- पोलिसांच्या कामात अडथळा आणणे, बदनामी करणे

 

 

कोकण

कोकणात गुन्हेगारांना स्थान नाही

’माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे शिवसेनेमध्ये असताना, १९९० ते १९९९ या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात राजकारणावर गुंडगिरीचा प्रभाव बऱ्यापैकी होता. पण काळाच्या ओघात आणि विशेषत:, महात्मा गांधींचे नाव घेत चालणाऱ्या सोनिया-राहुलच्या काँग्रेसमध्ये राणे आल्यानंतर परिस्थितीत बराच फरक पडला आहे. या निवडणुकीत तर राणे ???? काँग्रेससह कोणत्याही राजकीय पक्षाने गंभीर गुन्हे नोंदलेल्या एकाही कार्यकर्त्यांला उमेदवारी दिलेली नाही. हे अनेकांना धक्कादायक वाटले तरी वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर गावपातळीवरील पक्षांतरांचे प्रकार वगळले तर तालुका किंवा पातळीवर नोंद घ्यावी अशी पक्षांतरे या जिल्ह्य़ात झालेली नाहीत. गंभीर गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेले उमेदवार रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्याच पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात नाहीत.

 

रायगड

भाजप

  • ’संजय जांभळे – वडखळ, पेण – ३५३, ३३२, ५०४, ५०६, १००, १८८, १४३, १४४, १४९  अशा कलमांतर्गत तब्बल १४ गुन्हे दाखल. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक गुन्हे दाखल असणारे ते एकमेव उमेदवार.
  • शेकाप, अन्य
  • ’आस्वाद पाटील – खारगाव, रोहा (शेकाप) – ३५३, ३५२, ३३२, १८६ आणि ३४ या कलमांतर्गत गुन्हे
  • ’दिलीप भोईर – मापगाव, ३९५, ३०७, १४७, १४४, १४८ या कलमांतर्गत गुन्हे

 

( संदर्भ : एडीआर – महाराष्ट्र इलेक्शन वॉचडॉग)