‘लोकसत्ता सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमात गेल्या पाच वर्षांच्या काळात सहभागी करून घेतलेल्या ५१ संस्थांच्या प्रतिनिधींचा स्नेहमेळावा मंगळवारी दादर येथील स्वा. सावरकर स्मारक येथे झाला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते या वर्षीच्या दहा संस्थांना दानयज्ञात प्राप्त झालेले धनादेश सुपूर्द करण्यात आले.

एखाद्या उपक्रमाची पायाउभारणी करताना त्यातील मुख्य उद्दिष्टांसोबतच कधीकधी नकळतपणे इतरही अनेक गोष्टी साध्य होतात. सुरुवातीला त्याची कल्पनाही नसते, मात्र अवचितपणे या गोष्टी सामोरया येतात आणि दामदुपटीने उत्साह वाढतो. सर्वकाय्रेषु सर्वदा उपक्रमाच्या स्न्ोहमेळाव्यात नेमके हेच घडले.. या उपक्रमातून आíथक मदतीचा हात मिळालेल्या ५१ सामाजिक संस्थांचा स्न्ोहमेळावा नुकताच दादर येथील स्वा. सावरकर स्मारकात पार पडला. मदतीसोबतच लोकांमध्ये आपुलकीची जाणीव असल्याचे, समाज आपल्या मागे ठामपणे उभा असल्याचे व त्यापुढे जात असेच उपक्रम त्यांच्या परिसरात सुरू करणारया युवकांचे अनुभव संस्थेंच्या प्रतिनिधींनी मांडले तेव्हा सर्वकाय्रेषु सर्वदा उपक्रमासोबतच महाराष्ट्राच्या सामाजिक बांधिलकीलाही कृतज्ञतेही पोच मिळाली.
पाच वर्षांपूर्वी सर्वकाय्रेषु सर्वदा या उपक्रमाची सुरूवात झाली तेव्हा सामाजिक संस्थांना आíथक मदत देण्याचा हेतू होता. त्यासोबतच आपल्या आजुबाजूलाच वावरणारया, निरपेक्षभावनेने समाजाला सतत भरभरून देत असलेल्या व्यक्ती व संस्थांप्रती कृतज्ञताभाव व्यक्त करण्याचीही कल्पना त्यामागे होती. २०११ पासून गणेशोत्सवाच्या काळात दररोज प्रसिद्ध होत असलेल्या या संस्थांच्या कार्याची माहिती व लोकसत्तावरील दृढ विश्वास यामुळे या संस्थांना भरभरून आíथक मदत तर मिळालीच पण त्यासोबत आणखीही बरेच काही घडले. स्वा. सावरकर स्मारक येथे ‘सर्वकाय्रेषु सर्वदा’च्या स्न्ोहमेळाव्यात सहभागी झालेल्या सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींच्या मनोगतातून हे अविस्मरणीय क्षण ‘लोकसत्ता’ला लाभले.. यावर्षी सावित्रीबाई फुले एकात्म समाज संस्थेची माहिती प्रसिद्ध झाली. त्यावेळी या संस्थेचे डॉ. प्रसन्न पाटील हे रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र बातमी प्रसिद्ध झाली आणि सकाळपासून कृतज्ञता व्यक्त करणारयांचे फोन सुरू झाले. त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे आम्हालाही आमच्या गावात अशाप्रकारे काम करायचे आहे, असे सांगून अनेकांनी या प्रकल्पाची माहिती घेतली.. एकीकडे आíथक मदत सुरू झाली असतानाच दुसरीकडे राज्यातील अनेक भागात जलसाक्षरतेची मोहीम सुरू होण्याची चिन्हे दिसताहेत. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत’ या िवदांच्या काव्यपंक्तीचा अनुभव प्रसन्न पाटील यांनी घेतला. बीड येथे पालीगावाबाहेर एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी काम करणाऱ्या दत्ता बारगजे यांचा अनुभवही रोमांच आणणारा.. बाबा आमटे यांच्या कुष्ठरोग्यांसंबधीच्या कामातून प्रेरणा घेत . यांनी काम सुरू केले खरे, पण गावकऱ्यांच्या विरोधामुळे त्यांना दूर डोंगरावर मुलांसोबत राहावे लागत होते. लोकसत्तातील माहिती वाचून एका श्रीमंत व्यक्तीने त्यांना फोन केला. थेट हेलिकॉप्टरमधून संस्था पाहायला गेलेल्या या व्यक्तीने त्यानंतर २३ लाख रुपये खर्च करून संस्थेला शाळेची इमारत बांधून दिली. पुणे येथे कर्करोगावरील आयुर्वेद संशोधन संस्थेचे काम पाहणारया डॉ. सुहास सरदेशमुख यांनी अनेक वष्रे लोकसत्तेतून निर्माण झालेल्या वाचकांच्या स्न्ोहबंधाबद्दल गहीवरून कृतज्ञता व्यक्त केली. आíथक मदतीसोबतच लोकांमधील विश्वास व त्यातून संशोधनासाठी लागणारे प्रोत्साहन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. ‘घरकुल’च्या विद्याताई फडके यांचा अनुभवही असाच.. २०१२ मध्ये संस्थेची माहिती प्रसिद्ध झाल्यावर धनादेशासोबतच कृतज्ञता, आपलेपणा व्यक्त करणारी पत्रेही संस्थेला आली. गतिमंद मुलींसाठी काम करताना काही वेळा अत्यंत दाहक अनुभव येत असताना आपुलकीची ही पत्रे आणि समाजाने घेतलेली दखल मोलाची होती, असे विद्याताई म्हणाल्या. माहिती प्रसिद्ध झाल्यावर काही दिवसात आíथक मदत मिळतेच पण त्यानंतरही संस्थेला भेट देऊन नियमितपणे मदत करणारेही असतात. एवढेच नव्हे तर गेल्या वर्षी काही कारणाने मदत करता आली नाही याविषयी हळहळ व्यक्त करून दुसऱ्या वर्षी आवर्जून मदत पाठवणारयांचे अनुभवही बहुसंख्य संस्थाचालकांकडे आहेत. दान ही जशी घेणाऱ्याची गरज असते तशी ती देणाऱ्याचीही गरज असते. ‘सर्वकाय्रेषु सर्वदा’च्या दानयज्ञातून समाजातील या दोन घटकांमधील दुवा ठरण्याच्या ‘लोकसत्ता’च्या आनंदात या अनुभवांनी भरच घातली आहे.

सर्वकाय्रेषु सर्वदा हा केवळ दानयज्ञ नाही तर तो सामाजिक भानयज्ञ आहे. आपल्या आजुबाजूला काम करत असलेल्या संस्थांची निवड करून त्यांना लोकसत्ताने समाजासमोर आणले आहे. माणसांचा आवाज ज्यांना ऐकू येतो, जिथे माणुसकीचा संवाद साधला जातो त्या संस्थांमधून काम करणारी ही सर्व माणसे या उपक्रमाच्या निमित्ताने एकत्र जमली आहेत. इथे सर्व माणसांना एकमेकांशी जोडण्याचे काम सुरू आहे. यालाच सहिष्णुता म्हणतात. या उपक्रमातून संस्थांना मिळालेल्या निधीचा योग्य वापर व्हावा आणि महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांची संस्था वाढत जावी हीच सदिच्छा. – विक्रम गोखले, ज्येष्ठ अभिनेते

निवासाचा प्रश्न सुटेल
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत आम्ही काम सुरू केले. आमच्या संस्थेत सध्या मतिमंद, अंध, अपंग असे एकूण २२ जण आहेत. काहीजण आमच्या संस्थेत येऊन पूर्ण बरे झाले. त्यांना त्यांचे नातेवाईक पुन्हा घरी घेऊन गेले. अजूनही आम्हाला धड निवारा नाही. सर्वजण झोपडीत राहतो. ‘लोकसत्ता’मुळे मिळालेली मदत मोलाची असून त्यातून संस्थेच्या निवासाचा प्रश्न सुटेल.
प्रज्ञा राऊत, श्रीकृष्ण शांतिनिकेतन, नागपूर (संपर्क : ९९७०४२५९४५)

हुरूप वाढला
मोठय़ा शहरांमध्ये सर्रास गायनाच्या मैफली होत असतात. ग्रामीण भागात मात्र अभिजात संगीत सोहळे फारसे होत नाहीत. आमची संस्था आयोजित करीत असलेला औंध संगीत महोत्सव मात्र वेगळा ठरतो. दरवर्षी देशभरातील नामांकित कलावंत या महोत्सवात आपली कला सादर करतात. ग्रामीण भागात शास्त्रीय संगीताचा प्रचार होण्यास आमचा हा उपक्रम मोलाचा ठरला आहे. ‘लोकसत्ता’ने दानयज्ञासाठी संस्थेची निवड करून आमचा हुरूप वाढविला आहे. वाचकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आभार.
अपूर्वा गोखले, शिवानंद
स्वामी संगीत संस्था, डोंबिवली
(संपर्क : ०२५१-२४५२८८६६)

रस्त्यावरच्या माणसांना न्याय
आमची संस्था निराधार वृद्ध, महिला तसेच अपंगांना आधार देते. मतिमंद आणि मनोरुग्ण महिलांवर खूप अत्याचार होत आहेत. समस्या खूप मोठी आहे. ज्यांना कुणीही नाही, त्यांना आधार देण्याचे काम आमची संस्था करते. ‘लोकसत्ता’ने ‘सर्वकार्येषु’मध्ये आमच्या या कार्याची दखल घेऊन एकप्रकारे रस्त्यावरील माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
संदीप परब, जीवन आनंद संहिता आश्रम, कुडाळ, सिंधुदुर्ग (संपर्क : ९८२०२३२७६५, ९९६७३३७६८९)

जुन्या ग्रंथांचे डिजिटाजेशन मार्गी
ग्रंथालयात असलेले अमूल्य ग्रंथसंग्रह कालपरत्वे जीर्ण होत आले असून त्यांचे डिजिटाजेशन करणे अत्यावश्यक आहे. सध्या आम्ही पहिल्या टप्प्यात एक लाख ग्रंथांचे डिजिटाजेशनचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी एजन्सीही नेमण्यात आली आहे. जुन्या, ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाच्या असलेल्या वर्तमानपत्रांची १८ लाख पाने आहेत. शासनानेही या कार्यासाठी निधी दिला आहे. त्यामुळे हे महत्त्वाचे काम आता मार्गी लागले आहे. ‘सर्वकार्येषु’मुळे निधी संकलन होण्यात मदत होईलच, शिवाय त्यानिमित्ताने लाखो वाचकांपर्यंत एशियाटिकची महती ठळकपणे पोहोचली. संस्थेकडचा अमूल्य ग्रंथसंग्रह जतन करण्यात त्याचा खूपच उपयोग होणार आहे.
शरद काळे, एशियाटिक लायब्ररी,
मुंबई (संपर्क : ०२२-२६६०९५६)

आधार मोलाचा
खरे तर स्वत:च्या पोरकेपणातून अनाथालय सुरू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा आपण किती मोठे शिवधनुष्य उचलतोय, याची कल्पना नव्हती. गेले एक तप प्रतिकूलतेशी झगडत कुणीही नसलेल्या मुलांना आधार देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. अगदी २०११ पर्यंत आमच्या मुलांना तूरडाळ माहिती नव्हती. एकच भाजी, त्याबरोबर भात-भाकरी खात होतो. या बारा वर्षांत मुलांची संख्या ५० झाली. त्यांच्या गरजा वाढल्या. गेली चार वर्षे पावसाने दडी मारली आहे. आमचा सारा प्रदेश दुष्काळाच्या छायेत आहे. जमाखर्चाची कशीबशी तोंडमिळवणी करत आला दिवस ढकलावा लागतोय. अशा परिस्थितीत ‘लोकसत्ता’ने ‘सर्वकार्येषु’च्या माध्यमातून दिलेला आधार मोलाचा आहे. अतिशय प्रेमाने, निरलसपणे ‘लोकसत्ता’च्या वाचकांनी दिलेल्या मदतीबद्दल मन:पूर्वक आभार. जमल्यास प्रत्यक्ष आमचा प्रकल्प पाहायला जरूर या.
संतोष गर्जे, सहारा अनाथालय,
बीड (संपर्क : ०२४४७-२६२२६६)

समर्थ विचारांचे जतन मार्गी लागेल
देशभरातील १८०० मठांमधील आध्यात्मिक विचारांचे संकलन करण्याच्या उद्देशाने नऊ दशकांपूर्वी या संस्थेची स्थापना झाली. संस्थेकडे अनेक दुर्मीळ दस्तऐवज असले तरी आता शताब्दीकडे वाटचाल करीत असताना त्यातील अनेक कागदपत्रे जीर्ण झाली आहेत. त्यांचे तातडीने डिजिटायजेशन करणे आवश्यक आहे. संस्थेकडे एकूण चार लाख कागदपत्रे आहेत. त्यापैकी दोन लाख कागदपत्रांचे डिजिटायजेशन पूर्ण झाले आहे. दोन लाख कागदपत्रे अद्याप बाकी आहेत. समर्थ रामदासांच्या विचारांनी राष्ट्र उभारणीस प्रेरणा मिळावी, हा संस्था स्थापन करण्यामागचा हेतू डिजिटायजेशनमुळे मार्गी लागेल. अजूनही काही बाडांचे वाचन होणे बाकी आहे. ‘लोकसत्ता’च्या दानयज्ञामुळे या महत्त्वाच्या प्रकल्पाला आता गती येईल.
शरद कुबेर, समर्थ वाङ्देवता मंदिर,
धुळे (संपर्क : ०२५६२- २३६२८७)

आदिवासींचा पाणीप्रश्न सोडविणार
अन्न, वस्त्र आणि निवारा यांबरोबरच आता वीज हीसुद्धा अत्यंत आवश्यक बाब आहे. अजूनही मुंबई-ठाण्यापासून काही किलोमीटर अंतरावरील आदिवासी पाडे अंधारात आहेत. आम्ही सौर ऊर्जेच्या माध्यमातून आदिवासी पाडय़ांवरील युगानुयुगे साचून राहिलेला अंधार दूर करण्याचा निश्चय केला आहे. केवळ प्रकाशच नव्हे तर सौरपंपाद्वारे त्यांना पिण्याचे पाणीही उपलब्ध करून देत आहोत. त्यामुळे त्यांची वणवण थांबली आहे. आतापर्यंत ३२ पाडय़ांना आम्ही सौपपंपाद्वारे पाणी दिले. त्यामुळे १६ हजार महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबली. शुद्ध पाणी मिळाल्याने रोगराई आटोक्यात येऊन या भागातील रहिवाशांचे आरोग्यमान सुधारले. येत्या तीन वर्षांत विविध पाडय़ांमध्ये शंभर सौरपंप बसविले जाणार आहेत. ‘लोकसत्ता’ने त्यांच्या दानयज्ञात संस्थेच्या कार्याची ओळख करून दिल्याने आमचा हुरूप वाढला आहे. या भागातील पाणीसमस्या पूर्णपणे संपविल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही आम्ही देतो.
सुनंदा पटवर्धन, सचिव, प्रगती प्रतिष्ठान, जव्हार, जिल्हा-पालघर (संपर्क : ०२५०/२२३१४०, ९२७१५१३३९१)

अंधारातले काम उजेडात आणले
कुणीही जन्मत:च चांगला किंवा वाईट नसतो. मात्र तरीही दुर्दैवाने आपल्याकडे फासेपारधी, डोंबारी लोकांना चोर, गुन्हेगार ठरविले गेले. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून हा समाज कायम दूर राहिला. मात्र ‘आनंदवन’च्या श्रमसंस्कार शिबिरातील ‘मानसिकता बदलली की जग बदलते’ या शिकवणीच्या प्रभावातून काम सुरू केले. सुरुवातीला चार मुले होती. आता १८० मुले आहेत. ‘सर्वकार्येषु’च्या माध्यमातून अंधारातले काम उजेडात आणल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे आभार.
अनंत झेंडे, महामानव बाबा आमटे विकास संस्था, श्रीगोंदे, अहमदनगर. (संपर्क : ०२४८७ – २२००२०, ९४०४९७६८३३)

गरजूंना लाभ होईल
कर्करोगावरील आधुनिक उपचारांचे दुष्परिणाम आयुर्वेदाच्या माध्यमातून कमी करण्याच्या हेतूने आम्ही १९५४ मध्ये संस्थेच्या माध्यमातून कार्य सुरू केले. हजारो रुग्णांनी या उपचारांचा लाभ घेतला आहे. आतापर्यंतच्या साडेआठ हजार रुग्णांची नोंद आम्ही ठेवली आहे. आता या उपचारांना मान्यता मिळू लागली आहे. ‘टाटा’ समूहाने आम्हाला साठ खाटांचे रुग्णालय दिले आहे. ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून संस्थेचे कार्य लाखो वाचकांपर्यंत पोहोचले. त्यातून मदत मिळेलच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे अनेक गरजूंना त्याचा लाभ घेता येईल.
वैद्य सदानंद सरदेशमुख, भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट, वाघोली, पुणे (संपर्क : ०२०-६७३४६०००, ०२२-२४१३०८६६)

जल सारक्षरतेचा प्रसार करणार
दारिद्रय़ आणि दुष्काळ या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम आम्ही करतो. त्यासाठी विविध उपक्रम, योजना राबवितो. परिसरातील १०२ गावांमध्ये आम्ही आतापर्यंत विविध प्रकारचे ३८ प्रकल्प राबविले आहेत. पाणी ही मुख्य समस्या आहे. त्यासाठी जलसाक्षरतेचा प्रसार करणे आवश्यक आहे. अनेक नादुरुस्त बंधारे दुरुस्त करायचे आहेत. अशा वेळी ‘लोकसत्ता’ने ‘सर्वकार्येषु’द्वारे दिलेली कौतुकाची थाप मोलाची आहे. आमच्या भागातील प्रत्येक गाव आम्हाला जलसाक्षर करायचे आहे.
डॉ. प्रसन्न पाटील, सावित्रीबाई फुले
महिला एकात्म समाज मंडळ, औरंगाबाद (संपर्क : ०२४०-२३३११९५)
जानेवारीपासून आनंदवन समाजभान अभियान
‘सर्वकार्येषु’च्या पहिल्या पर्वात ‘लोकसत्ता’ने आमचा समावेश केला, त्याबद्दल खूप आनंद आणि अभिमान वाटतो. स्वातंत्र्यानंतर लगेचच म्हणजे १९४९ मध्ये बाबा आमटे यांनी आनंदवन स्थापन केले. आता आमची तिसरी पिढी संस्थेत कार्य करीत आहे. सद्य:स्थितीत माध्यमांचा कोलाहल सुरू असताना खऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणण्याचे मोलाचे कार्य ‘सर्वकार्येषु’च्या माध्यमातून ‘लोकसत्ता’ करीत आहे. आम्हीसुद्धा येत्या जानेवारी महिन्यापासून आनंदवन समाजभान अभियान राबवीत असून त्या माध्यमातून राज्यातील सर्व सामाजिक संस्थांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. गेल्या पाच वर्षांतील ‘सर्वकार्येषु’तील लेखांचे संकलन त्यासाठी पूरक ठरेल. ल्लकौस्तुभ आमटे, आनंदवन

चांगली माणसे जोडली गेली
मानसिक विकलांग मुली आणि महिलांसाठी कायमस्वरूपी निवासी व्यवस्था सुरू करणे हे अतिशय आव्हानात्मक आहे. सध्या आमच्या संस्थेत ४५ प्रौढ महिला आणि मुली आहेत. सर्वसाधारणपणे अशा मुलींच्या पालकांना आपल्यानंतर काय, असा प्रश्न सतावीत असतो. ‘घरकुल’ने त्यांचा तो प्रश्न सोडविला आहे. ‘लोकसत्ता’च्या दानयज्ञामुळे संस्थेला मोलाची आर्थिक मदत मिळालीच, पण त्याशिवाय महत्त्वाचे म्हणजे चांगली माणसे कायमची संस्थेशी जोडली गेली.
विद्याताई फडके, घरकुल, नाशिक

विरोध करणारे मदत करू लागले
पारधी समाजातील मुलांसाठी पारंपरिक कौशल्यांवर आधारित शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला, तेव्हा सुरुवातीला खूप विरोध झाला. प्रवाहाविरुद्ध काम करताना अनेकदा निराशेचे क्षण येतात, मात्र कौतुक करणारेही भेटतात. मदत करतात. ‘लोकसत्ता’चा उपक्रम त्यापैकीच एक. आता विरोध करणारेही मदत करू लागले आहेत. संस्थेमध्ये ३५० मुले आहेत. आमचे विद्यार्थी लवकरच स्कूटर तयार करणार आहेत.
गिरीश प्रभुणे, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम, चिंचवड, पुणे
देण्यासाठी प्रेरणा मिळाली
‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु’ उपक्रमामुळे आपणही समाजासाठी काही तरी मदत करू शकतो, याची जाणीव झाली. त्याबद्दल आभार. आमच्यासारख्या अनेकांना मदत करण्याची इच्छा असते, मात्र ती कुणाला करावी हे ठाऊक नसते. ‘लोकसत्ता’ने त्यासाठी पुढाकार घेतल्याने आता आमचे काम सोपे झाले आहे.
डॉ. ललिता पटवर्धन, देणगीदार-वाचक

‘सर्वकार्येषु सर्वदा’ या ठिकाणी उपलब्ध

मुंबई : आयडियल बुक डेपो, दादर
डोंबिवली : मॅजेस्टिक बुक डेपो
ठाणे : व्ही. के. एजन्सी
पुणे : डायमंड बुक डेपो, रसिक साहित्य, मॅजेस्टिक
कोल्हापूर : अक्षर दालन, मेहता बुक सेंटर, बुक द वर्ल्ड, किताब कॉर्नर
नाशिक : ज्योती बुक सेल्स, अनमोल पुस्तकालय, नाशिक रोड
जळगांव : प्रशांत बुक सेलर्स, अथर्व प्रकाशन
नागपूर : पिंपळापुरे अँड बुक सेलर्स, अनिल बुक डेपो, पॉप्युलर बुक हाऊस
अमरावती : बजाज बुक सेलर्स
कराड : मयुरेश बुक एजन्सी
सांगली : प्रसाद वितरण (ग्रंथदालन)
याशिवाय राज्यभरातील सर्व शहरांमध्ये पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध