दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा! याच उक्तीप्रमाणे घरासमोर तुम्ही काढलेली सुंदर रांगोळी आमच्याकडे शेअर करा आणि आपला हा आनंद विश्वरूपी करा. या दिवाळीत ‘लोकसत्ता’च्या ‘माझी रांगोळी’ संकल्पनेत सहभागी होऊन, घरासमोर काढलेल्या सुंदर रांगोळीचे फोटो loksatta.express@gmail.com या ई-मेलवर २५ ऑक्टोबरपर्यंत आमच्याकडे पाठवा. सबजेक्टमध्ये ‘माझी रांगोळी!’ लिहिण्यास विसरू नका.
मेलमध्ये आपले नाव आणि स्थळाचे नाव अवश्य लिहा. निवडक फोटोंचा अल्बम ‘लोकसत्ता डॉट कॉम’वर प्रसिद्ध केला जाईल. त्याचप्रमाणे या अल्बमची लिंक ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजवरही शेअर केली जाईल. याशिवाय तुम्ही पाठविलेल्या फोटोंपैकी सर्वोत्कृष्ट फोटोला ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजवर कव्हर फोटो होण्याची संधी मिळेल.