गेल्या रविवारी जाहीर केल्यानुसार जलनीतीचे मधुकोशही नवी साप्ताहिक लेखमाला आजपासून सुरू करीत आहोत. ही लेखमाला ज्यांना भूजलहा विषय समजून घेत स्थानिक पातळीवर नियोजन आणि अंमलबजावणी करण्याची इच्छा आहे, अशा सर्वासाठी असेल. शास्त्रोक्त पद्धतीने सर्वसमावेशक प्रयत्न करून पाण्याशी निगडित समस्यांचं शाश्वत निराकरण करण्यासाठी एक छोटं पाऊल, ‘आनंदवनउचलत आहे.

उन्हाळा जवळ आला की आठवते ते पाणी.. तळपत्या उन्हात डोक्यावर पाण्याचे हंडे, कळशा घेऊन वणवण फिरणाऱ्या बायका, जंगलात पाण्याअभावी मृत्युमुखी पडलेले प्राणी आदी फोटो वर्तमानपत्रांमध्ये दिसले की पाणी प्रश्नाची दाहकता जाणवते. जीवन असलेलं हे पाणी कधी कधी लोकांच्या डोळ्यांतून पाणी काढायला मागेपुढे पाहत नाही. हे विदारक चित्र पाहून आपण हळहळ व्यक्त करणे, शासनाला, ग्लोबल वॉर्मिगला दोष देणे किंवा अलीकडे पाऊसच कमी पडतो अशी आपल्या मनाची समजूत घालून घेणे, याहून फारसे काही वेगळे करताना दिसत नाही. म्हणूनच आपल्याला १९५० सालापासून पाणी क्षेत्रात झालेले बदल, हरितक्रांतीचा झालेला परिणाम आणि आम्ही जी ‘जलनीती’ म्हणतोय ते म्हणजे नेमकं काय हे लक्षात घ्यायची गरज आहे.

Loksatta sanvidhan bhan Constitution Fundamental rights equal protection
संविधानभान: जनमते मानुस होत सब..
What Is Sugar Made Of Milk Honey Table Sugar
साखर हे पांढरं विष? दूध, मध, साध्या साखरेत नेमकं असतं काय? १० दिवस साखर खाल्ली नाही तर कसं बदलेल शरीर?
idli or dosa batter is never over-fermented
World Idli Day : इडली स्वादिष्ट व्हावी म्हणून पीठ जास्त दिवस आंबवता का? ही सवय आताच थांबवा….
Makeup tips for people with oily skin during summer
Summer Makeup Tips: उन्हाळ्यात मेकअप कसा करावा? असा करा स्वेट प्रूफ मेकअप

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, भाक्रा नांगल या धरणाचे उद्घाटन करताना म्हणाले, kk Dams are known as temples of modern India.ll जड उद्योगधंदे, शेती, पोलाद प्रकल्प,ऊर्जा प्रकल्प आणि शास्त्रीय संशोधन केंद्र यांची सुरुवात स्वतंत्र भारतात व्हावी असे पंडित नेहरूंचे स्वप्न होते, मोठी धरणे बांधणे हे याच स्वप्नपूर्तीतील पहिले पाऊल होते. घरगुती वापर, सिंचन आणि औद्योगिक वापरासाठी मुबलक प्रमाणावर पाणी उपलब्ध असावे, यासाठी मोठी धरणे बांधणे ही विचारधारा मूळ धरू लागली.

१९५१ मध्ये, भारतातील केवळ १७% जमीन सिंचनाखाली होती, त्यातील बहुतांश शेती पूर्णत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती. यामुळेच शेतीतून निघणारे उत्पन्न कमी होते. शेतीतील उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून १९६०-७०च्या दशकाच्या सुरुवातीला, हरितक्रांतीची सुरुवात मेक्सिकोचे नोबेल पुरस्कार विजेते नॉर्मन बोरलॉग आणि भारताचे डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. सिंचनाच्या पाण्यासाठी धरणे, विहिरी, हातपंप घेता यावेत यासाठी बऱ्याच शासकीय योजनासुद्धा या काळात सुरू झाल्या होत्या. हरित क्रांतीमध्ये शेतकऱ्यांना HYV (High Yield Variety) म्हणजेच जास्त उत्पादन देणारी बियाणे देण्यात आली. हरितक्रांतीमुळे धनधान्यात झालेली वाढ लक्षणीय होती. मात्र हरितक्रांतीचे जसे फायदे झाले तसे काही तोटेही झाले. जुन्या बियाण्यांच्या तुलनेत, ऌश् बियाण्यांना जास्त प्रमाणात पोषक द्रव्ये लागत आणि कीड लागण्याचे प्रमाणही जास्त होते. त्यामुळे या बियाण्यांसमवेत आवश्यक खते आणि कीटकनाशकेसुद्धा देण्यात आली. घन स्वरूपातील पोषकद्रव्ये ही बियाणे शोषून घेऊ शकत नसल्यामुळे पर्यायाने पाण्याचा वापर वाढला. सर्वाना मुबलक प्रमाणात अन्नधान्याचा पुरवठा व्हावा, शेतीचे उत्पन्न वाढावे, शेतकरी समृद्ध व्हावा या चांगल्या विचारांनी सुरू झालेली हरितक्रांती काही नवीन प्रश्न घेऊन आली.

सन २०००च्या दशकातील दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, जमिनीची नापीकता, आटलेल्या विहिरी आणि त्याबरोबरच १९६० पासून वाढीस लागलेला भूजल उपसा या सगळ्या समस्या खालील तक्ता पाहिल्यास लक्षात येतील.

या तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे बियाणे, खते-कीटकनाशके आणि पाण्याची करावी लागणारी सोय यामुळे शेतकऱ्यांचा दरडोई खर्च वाढत चाललेला आहे. खतांच्या अतिवापराने जमिनीची वाढलेली नापीकता, कापूस-ऊस-सोयाबीन यासारख्या नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा वाढणारा ओढा, लहरी पावसामुळे विहिरी, बोअरवेल्स यांची वाढलेली संख्या, याचा भूजलसाठय़ांवर होणारा दुष्परिणाम, पर्यायाने कोरडय़ा पडलेल्या विहिरी, शेतकऱ्यांमध्ये वाढलेला कर्जबाजारीपणा आणि या सगळ्या दुरवस्थेमुळे होणाऱ्या आत्महत्या हे दुष्टचक्र आजचे विदारक वास्तव आहे. ही परिस्थिती काही आकडेवारीचा आधार घेऊन जर आपण बघितली तर याचे गांभीर्य आपल्या जास्त लक्षात येईल.

पृथ्वीतलावरील एकूण पाण्याचा जर विचार केला, तर ९७% समुद्राचं पाणी, २% बर्फाच्या रूपातील पाणी आणि केवळ १% पाणी वापरास योग्य पाणी असे त्याचे विभाजन आहे. या एक टक्का उपलब्ध पाण्यातील, ९८% पाणी भूजलाच्या स्वरूपात आहे. सन २०१३-२०१४ मध्ये वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, जगात भूजलावर अवलंबित्व असलेला भारत हा पहिल्या क्रमांकावरचा देश आहे. दुर्दैवाने, आपण या बाबतीत आपली आघाडी जपली आहे. जगाचा वार्षिक भूजल उपसा ९८२ अब्ज घनमीटर आहे, त्यापैकी आशिया खंडाचा भूजल उपसा ५१४ अब्ज घनमीटर आणि भारताचा २४६ अब्ज घनमीटर म्हणजे जगाच्या २५% आणि आशिया खंडाच्या ५०% इतका प्रचंड आहे!

भारतातील एखाद्या खेडेगावाची पाण्याची वार्षिक मागणी नमुन्यादाखल खालील आलेखातून समजावून घेऊयात. यावरून असं लक्षात येते की, ‘पिण्यासाठी पाणी’ ही मनुष्याची मूलभूत गरज एकूण वार्षिक मागणीच्या एक टक्क्याहूनही कमी आहे. असं असूनही पिण्याच्या पाण्याची निकड पूर्ण करण्यात आपले प्रयत्न उन्हाळ्यात फोल ठरतात. खेडेगावांबरोबरच, बेभरवशी आणि अपुऱ्या पाणीपुरवठय़ामुळे शहरांच्या भूजल निर्भरतेचा आलेखसुद्धा वाढीस लागला आहे. वरील आकडेवारी आणि भूजलाचा अमर्याद उपसा व अनियंत्रित वापर लक्षात घेतला, तर नजीकच्या २० वर्षांत भारतातले ६०% भूजल साठे धोक्याची परिसीमा ओलांडतील अशी चिन्हे दिसत आहेत.

untitled-1

संपर्क क्रमांक :  ७४४७४ ३९९०१, ९९२२५ ५०००६

– अमृता गुरव

amruta.gurav@gmail.com