फायनान्स हे आजच्या काळातले महत्त्वाचे क्षेत्र. त्यात सीएफपी म्हणजेच सर्टिफाइड फायनान्शिअल प्लानर हा अभ्यासक्रम या क्षेत्राची आवड असणाऱ्यांसाठी करिअरचे महत्त्वाचे दालन उघडून देणारा आहे.

‘करिअर’ निर्णय हा आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा निर्णय! संपूर्ण जीवनाची दिशा ठरवणारा हा निर्णय घेताना बरेच पालक, विद्यार्थी संभ्रमात पडताना दिसतात. बदललेल्या आधुनिक जगात शैक्षणिक वाटा मोकळ्या झाल्या असताना पसा, प्रतिष्ठा आणि ज्ञान वृिद्धगत करणारे, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक मान्यता असणारे अभिनव अभ्यासक्रम आज उपलब्ध आहेत. बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर केवळ विज्ञान, वाणिज्य – कला – व्यवस्थापन शाखांची पदवी परीक्षा उत्तीर्ण होण्यापेक्षा व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमाद्वारे आज स्थिर करिअर संधीची दालने उमेदवारांसमोर उघडलेली आहेत..

loksatta kutuhal french computer scientist dr yann andre lecun deep learning and the future of ai zws 70
कुतूहल : यान आंद्रे लकून : डीप लर्निंगचे गॉडफादर
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन
Saima ubaid First female powerlifter from Kashmir
सायमा ओबेद… कश्मिरमधील पहिली महिला पॉवरलिफ्टर
Some results still pending post graduate law students regretting
मुंबई : काही निकाल अद्यापही रखडलेले, पदव्युत्तर विधि शाखेच्या विद्यार्थ्यांना मनःस्ताप

सर्टफिाइड फायनान्शिअल प्लानर म्हणजेच सीएफपी असाच एक अभिनव अभ्यासक्रम आपण सविस्तर जाणून घेऊ. सर्टफिाइड फायनान्शिअल प्लानर हा अभ्यासक्रम जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या ‘वैयक्तिक अर्थकारण’ या विषयातील उच्चतम मान्यताप्राप्त अभ्यासक्रम आहे. ही आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र परीक्षा फायनान्शिअल प्लानिंग स्टॅण्डर्डस बोर्ड ऑफ इंडिया (एफपीएसबी इंडिया) या संस्थेमार्फत घेतली जाते. अत्युच्च दर्जाचे मानांकन प्राप्त प्रमाणपत्र परीक्षा पास झालेल्या उमेदवारास जागतिक आíथक संस्थेमार्फत २२ देशांतील करिअर संधीची दालने उघडली जातात. जागतिक बाजारात एक लाखांपर्यंत व्यावसायिक सीएफपी प्रमाणपत्र परीक्षापात्र आहेत. भारतात या व्यावसायिकांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहेत. मोठय़ा प्रमाणात वित्तीय संस्था, भारतीय बँका, इन्शुरन्स कंपन्या, शेअर्स ब्रोकिंग व्यवसाय उद्योगक्षेत्रात आज सीएफपी पात्र उमेदवारांची गरज आहे. आयआरडीए, सेबी, पीएफआरडीए यासारखी नियामक मंडळे ग्राहकांस उत्कृष्ट दर्जाची सेवा मिळवण्यासाठी सीएफपी व्यावसायिकांनाच प्राधान्य द्यावे, असे वारंवार बजावत आहेत. तसेच एफपीएसबी बोर्डाच्या चार्टर्ड सदस्य संस्थांनीही सीएफपीपात्र उमेदवारास नेमणुकांमध्ये विशेष प्राधान्य देण्याची हमी दिली आहे.

सीएफपीपात्र उमेदवारांस प्रायव्हेट बॅकिंग, वेल्थ मॅनेजमेंट, लाइफ इन्शुरन्स, इनव्हेस्टमेंट कन्सल्टन्सी, फायनान्शिअल अ‍ॅडव्हायझरी सव्‍‌र्हिसेस, फंड मॅनेजमेंट, प्रॉडक्ट डिझायनिंग, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, प्रॉडक्ट सेल्स, मार्केटिंग अशा व्यापक प्रमाणात संधी उपलब्ध आहेत.

सीएफपी अभ्यासक्रमाची पात्रता :

बारावी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना खालील चार परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते.

  • रिस्क अ‍ॅनॅलिसिस अ‍ॅण्ड इन्शुरन्स प्लानिंग (एक्झाम वन)
  • रिटायरमेंट प्लानिंग अ‍ॅण्ड एम्प्लॉई बेनेफिट  (एक्झाम टू)
  • इनव्हेस्टमेंट प्लानिंग  (एक्झाम थ्री)
  •  टॅक्स प्लानिंग अ‍ॅण्ड इस्टेट प्लानिंग (एक्झाम फोर)

    वरील परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सर्वात महत्त्वाची पाचवी परीक्षा

  • अ‍ॅडव्हान्स्ड फायनान्शिअल प्लानिंग (एक्झाम फाइव्ह) उत्तीर्ण व्हावी लागते.
  • अनुभवाची अर्हता – केवळ परीक्षा उत्तीर्ण होणे अपेक्षित नसून त्याचबरोबर अनुभव अपेक्षित आहे. पाच वष्रे आधी किंवा नंतर आíथक व्यवसायांतील अनुभव बारावी पास विद्यार्थ्यांस अपेक्षित आहे. पदवीधर उमेदवारास किमान तीन वष्रे अनुभव असणे आवश्यक आहे.
  • सीए / इंटरमिडिएट लेव्हल सीएफए (यूएस), आयसीडब्ल्यूए, सीएआयआयबी सीएस / एलएलबी पीएच. डी, एमफिल, पोस्ट ग्रॅज्युएट, असोसिएट / फेलोशिप असलेले आयुर्वमिा, सर्वसाधारण विमा व्यावसायिक हेदेखील सदर प्रमाणपत्र केवळ एक्झाम फाइव्ह देऊन मिळवू शकतात.

13-career-financeएफपीएसबी इंडियाद्वारे अभ्यासक्रम पूर्ण केलेले मानांकित तज्ज्ञ व्यावसायिक केवळ अभ्यासक्रमाद्वारे उच्च श्रेणीतील व्यावसायिक अर्हता मिळवत नाही तर परीक्षा, अनुभव आणि आचारसंहितेच्या निकषांवरही मान्यता मिळवलेले असतात.
एफपीएसबी इंडिया कोड ऑफ कंडक्ट (आचारसंहिता)

आंतरराष्ट्रीय फायनान्शिअल प्लानिंग बॉडी यूएसए म्हणजेच एफपीएसबी लिमिटेड या अमेरिकास्थित जागतिक संस्थेच्या आदर्श तत्त्वांच्या निकषांवर आधारित असल्याने हा अभ्यासक्रम उमेदवारास आंतरराष्ट्रीय दर्जाची मान्यता मिळवून देतो.

सीएफपी पात्रताधारक उमेदवारास व्यवसाय व नोकरीच्या भारतात व भारताबाहेर उत्तम संधी उपलब्ध आहेत. अशा अभिनव त्याचबरोबर वेगाने वाढत्या क्षेत्रात मराठी विद्यार्थ्यांनी अवश्य संधी साधावी.
(अधिक माहितीसाठी संकेतस्थळ WWW.Fpsbindia.org)
भक्ती रसाळ – response.lokprabha@expressindia.com