समाज बदलण्याची इच्छा असलेल्या बुद्धिमान तरुणांसाठी भारतीय सनदी सेवा हे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. नीट नियोजन केलं तर या सेवांमध्ये जाणं अशक्य नाही.

विद्यमान शासकीय व्यवस्थेविषयी मनात असंतोष खदखदत असेल, साधी साधी कामे सरकारी कार्यालयातून पूर्ण करून घेताना होणारा त्रास जर खटकत असेल, भारताची राष्ट्रीय धोरणे तयार करण्याची, प्रशासन गतिमान करण्याची आणि धोरणांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची तुमची इच्छा असेल तर भारतीय सनदी सेवा तुमची वाट पाहात आहे.

dubai five year multiple entry visa
विश्लेषण : दुबईने भारतीय पर्यटकांना पाच वर्षांसाठी ‘मल्टीपल एंट्री व्हिजा’ देण्याची घोषणा का केली? याचा भारतीयांना कसा फायदा होईल?
Narendra Modi opinion that textile industry is important in developed India
‘विकसित भारता’त वस्त्रोद्योग महत्त्वाचा – मोदी
loksatta. pune, Anniversary, Special article, mental health, society by psychiatrist and actor Dr. mohan agashe
वर्धापनदिन विशेष : सक्षम मानसिक आरोग्यासाठी
India will be the third largest economy in the world by 2027 says Jefferies
ह्युंदाईच काय, ॲमेझॉन, सॅमसंगला भारतीय बाजारात सूचिबद्धतेचे आकर्षण… बाजार भांडवलात २०३० पर्यंत दुपटीहून अधिक वाढीचा आशावाद व्यक्त करणारा अहवाल 

सनदी सेवा कशासाठी?

उत्तम वेतन, सामाजिक प्रतिष्ठा, आपल्या कौशल्यांना-क्षमतांना आव्हाने, अंगभूत गुणांना वाव, स्थर्य, अधिकार, देश व समाजसेवेची संधी आणि एकाच वेळी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करण्याची सोय.

पात्रता :

  • देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
  • वयोमान २१ वष्रे पूर्ण
  • विद्यापीठीय परीक्षेतील टक्केवारी वा शैक्षणिक अपयशे, ग्रेड यांचा पात्रतेशी संबंध नाही.

परीक्षेचे आयोजन

भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा या केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जातात. परीक्षेची अधिसूचना जाहीर करणे, अभ्यासक्रम निश्चित करणे, भरतीची प्रक्रिया ठरवणे, भरतीसाठी उमेदवारांची संख्या निश्चित करणे, परीक्षेचे सर्व टप्पे सुरळीत पार पाडणे आदी सर्व बाबी आयोगाच्या अखत्यारीत येतात.

नेमक्या कोणकोणत्या सेवांमध्ये जाता येते?

भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय पोलीस सेवा (आयपीएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), भारतीय महसूल सेवा (आयआरएस), भारतीय वित्त व लेखा सेवा (आयएअ‍ॅण्डएएस), भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (आयआरटीएस), भारतीय माहिती सेवा (आयआयएस), सर्व केंद्रशासित प्रदेशांच्या सेवा, भारतीय संरक्षण लेखा सेवा (आयडीएस) अशा विविध २६ सेवा.

परीक्षा पद्धती :

या परीक्षा तीन टप्प्यांमध्ये होतात – पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. पूर्वपरीक्षा ही माहितीची, मुख्य परीक्षा ही ज्ञानाची तर मुलाखत ही व्यक्तिमत्त्वाची चाचणी असते. स्वाभाविकच पूर्वपरीक्षा ही बहुपर्यायी पद्धतीची, मुख्य परीक्षा लेखी आणि दीघरेत्तरी स्वरूपाची परीक्षा असते.

प्रत्यक्ष परीक्षेचे गुणांकन :

पूर्वपरीक्षा – ४०० गुण

(सामान्य ज्ञान २०० गुण, १०० प्रश्न, प्रति प्रश्न २ गुण)

(सीसॅट २०० गुण, ८० प्रश्न, प्रति प्रश्न २.५ गुण)

यात एक गंमत अशी असते की, आपण जे प्रश्न अचूक सोडवू त्याबद्दल आपल्याला पूर्ण गुण मिळतातच, पण जर आपले उत्तर चुकले तर आपण मिळवलेल्या एकूण गुणांतून ०.६६ गुण (सीसॅटच्या पेपरमध्ये ०.८३ गुण ) वजा केले जातात.

मुख्य परीक्षेचे १७५० गुण

सामान्य ज्ञानाचे चार पेपर, निबंधाचा एक पेपर आणि वैकल्पिक विषयाचे दोन पेपर (सर्व पेपर प्रत्येकी २५० गुणांचे)

त्याशिवाय भारतीय भाषांचे दोन अनिवार्य पेपर असतात. यापकी एक असतो इंग्रजीचा तर दुसरा असतो कोणत्याही एका भारतीय भाषेचा, म्हणजेच आपल्यापुरता मराठीचा. हे पेपर प्रत्येकी ३०० गुणांचे असतात. यामध्ये उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. मात्र अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना या पेपरमधील गुण धरले जात नाहीत.

सामान्य ज्ञानामध्ये इतिहास, राज्यघटना, भारताचा भूगोल, जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताचे स्थान, भारतीय परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय राजकारण, विज्ञान तंत्रज्ञान, चालू घडामोडी, पर्यावरण आदींचा समावेश असतो. तसेच एक प्रश्नपत्रिका ही योग्यायोग्यता, निर्णयक्षमता, नतिक कार्य, प्रत्यक्ष एखादी परिस्थिती हाताळण्याची कौशल्ये आदी बाबींची तपासणी करणारी असते.

वैकल्पिक विषयाची निवड आपण करायची असते. त्यासाठी  कला, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि वाणिज्य अशा विविध शाखांमधील विविध विषयांचे पर्याय उपलब्ध असतात.

सामान्यपणे तीन तासांमध्ये पाच हजार शब्दांचे लेखन करण्याचे आव्हान असते. तर आयोगाच्या वेळापत्रकाचा विचार करता, दररोज असे दोन पेपर सोडवावयाचे असतात. तात्पर्य एका दिवसात, सहा तासांमध्ये किमान ९ ते १० हजार शब्द लिहिण्याचे आव्हान असते. हे एव्हढय़ासाठीच नमूद केले, कारण सध्या संगणकीय टंकलेखनाच्या जमान्यात आपली लेखनाची सवय आणि गती हरवत चालली आहे. तेव्हा या परीक्षांमध्ये ही गती उत्तम असणे हे आव्हान आहे.

मुलाखत ही २७५ गुणांची असते

मुख्य परीक्षेचे १७५० गुण आणि मुलाखतीचे २७५ गुण यांच्या एकत्रित २०२५ गुणांपकी मिळालेल्या गुणांवरून अंतिम यादी तयार केली जाते.

ज्याप्रमाणे रिक्त पदे असतील त्यानुसार गुणानुक्रमे पहिल्या तितक्या व्यक्ती निवडल्या जातात. कुठच्याही टप्प्यावर अपयश आले तरी सुरुवात पहिल्यापासूनच करावी लागते, त्या अर्थाने हे लेव्हल प्लेइंग फील्ड आहे.

पूर्वतयारी :

स्पर्धा परीक्षांचे आव्हान लक्षात घेता अगदी शालेय किंवा महाविद्यालयीन स्तरापासून आपल्याला तयारी करता येऊ शकेल.

  • मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांवर प्रभुत्व
  • वेगवान वाचन व अवांतर वाचनाची सवय
  • काळ-काम-वेग-व्याज-क्षेत्रफळे, समीकरणे, तर्कशास्त्र यांसारखी गणिते वेगाने सोडविण्याचा सराव
  • मूलभूत शालेय विषयांमधील संकल्पना समजून घेणे
  • चालू घडामोडींविषयी स्वतची मते तयार करणे
  • लेखनाचा सराव
  • नियमित वृत्तपत्र वाचन करणे – त्यातही विशेष लेख, अग्रलेख वाचणे-ते समजावून घेणे
  • जिल्हाधिकारी कार्यालये, पोलीस कार्यालये, मंत्रालय आदी ठिकाणी भेटी देणे, तिथे येणाऱ्या लोकांशी संवाद साधणे
  • विधिमंडळाचे कामकाज कसे चालते ते पाहणे
  • काही प्रशासकीय अधिकाऱ्यांशी त्यांच्या कामाच्या पद्धतीविषयी, त्यांच्या कामाच्या आवाक्याविषयी गप्पा मारणे
  • ऐतिहासिक वास्तू – वस्तुसंग्रहालये यांना भेटी देणे, त्यांचा इतिहास समजावून घेणे
  • विविध प्रयोगशील सामाजिक संस्थांना – सामाजिक प्रकल्पांना भेटी देणे, उदा. हेमलकसा येथील प्रकल्प, शोधग्राम, विज्ञानाश्रमपूर्वतयारीसाठी उपयुक्त पुस्तके व उपक्रम :
  • एनसीईआरटीची इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतची सर्व विषयांची पुस्तके,
  • अविनाश धर्माधिकारी यांचे ‘नवा विजयपथ’,
  • रत्नाकर गायकवाड यांनी लिहिलेले व यशदा प्रकाशनने प्रसिद्ध केलेले ‘विकास प्रशासनाच्या विविध प्रयोगांचे अनुभवकथन’, लक्ष्मीकांत देशमुख लिखित ‘बखर भारतीय प्रशासनाची व प्रशासननामा, ज्ञानेश्वर मुळ्ये लिखित ‘माती, पंख आणि आभाळ’ तसेच नोकरशाहीचे रंग आणि अरुण शौरी लिखित ‘गव्हर्नन्स’ (लाल फिती कारभार म्हणजे काय आणि तो कसा टाळावा यासाठी)
  • त्याव्यतिरिक्त काही महत्त्वाची यूट्य़ूबवरील ध्वनिचित्रफिती, संकेतस्थळे आणि नियतकालिके यांचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे.

ध्वनिचित्रफिती :

भारताचे आजी व माजी परराष्ट्र सचिव यांची भारतीय परराष्ट्र धोरणाविषयीची भाषणे, रिझव्‍‌र्ह बँकेच्या आजी-माजी गव्हर्नरांनी भारतीय तसेच जागतिक अर्थव्यवस्थेविषयी केलेली विविध भाषणे, अनअ‍ॅकॅडमी या यूटय़ूब वाहिनीवरील ध्वनिचित्रफिती, संविधान या राज्यसभा या वाहिनीवर तयार करण्यात आलेल्या मालिकेचे १० भाग, सिंहासन या एबीपी माझावरील मालिकेचे सर्व भाग, बीबीसी व दूरदर्शनने भारतीय स्वातंत्र्यलढय़ाविषयी तयार केलेले माहितीपट, नामांकित व्यक्तींची-अभ्यासकांची विविध चालू घडामोडींवरील व्याख्याने

नियमित लोकसभा, राज्यसभा व डीडी न्यूज या वाहिन्या पाहण्याची सवय

संकेतस्थळे :

http://www.pib.nic.in

UPSC IAS EXAM PREPARATION – INSIGHTS ON INDIA HOMEPAGE


http://www.arthapedia.in
http://www.quora.com
http://www.britannica.com

नियतकालिके :

सिव्हिल सíव्हसेस क्रॉनिकल, योजना, कुरुक्षेत्र, वर्ल्ड फोकस, इकॉनॉमिस्ट – द वर्ल्ड इन मालिका

वयोमर्यादा आणि परीक्षेसाठी प्रयत्न

  • खुल्या संवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ३२ वष्रे व एकूण जास्तीतजास्त सहा वेळा परीक्षा देण्याची मुभा.
  • अन्य मागासवर्गीयांसाठी कमाल वयोमर्यादा ३५ वष्रे आणि एकूण जास्तीतजास्त नऊ प्रयत्न.
  • अनुसूचित जाती आणि जमातींसाठी कमाल वयोमर्यादा ३७ वष्रे असून त्यांच्या अटेम्प्टवर मर्यादा नाहीत.

परीक्षेचे वेळापत्रक

सामान्यपणे फेब्रुवारी ते मार्च महिन्यादरम्यान ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ या वृत्तपत्रात या परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली जाते. त्यानंतर जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी पूर्वपरीक्षा होते. या परीक्षेचा निकाल साधारणपणे सप्टेंबपर्यंत लागतो. आणि मुख्य परीक्षा डिसेंबर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी सुरू होते. त्यानंतर या परीक्षेचा निकाल लागून मार्च-एप्रिलमध्ये मुलाखती घेतल्या जातात. मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला जातो. अर्थात काही वेळा प्रशासकीय कारणास्तव या वेळापत्रकात बदल केले जाऊ शकतात.

अभ्यास करण्याविषयी

या परीक्षांचा अभ्यास घरच्या घरी निश्चित करता येतो. मात्र अभ्यासाची दिशा, काय वाचावे – काय टाळावे, अभ्यासाची खोली (डेप्थ), आवाका, उत्तर लेखनाची पद्धत, सराव चाचण्या आदी बाबी लक्षात घेता या परीक्षांच्या अद्ययावततेची कल्पना असणारी एक तरी माहीतगार व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध असावी. अन् ती नसेल तर मात्र एखादा क्लास लावण्यास हरकत नाही. सध्या ऑनलाइन पद्धतीनेही बरेच मार्गदर्शन उपलब्ध झाले आहे. महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे मुंबईत सीएसटीजवळ तसेच औरंगाबाद, नागपूर येथे राज्य प्रशासकीय प्रशिक्षण संस्था आहे. तेथे मोफत मार्गदर्शन करण्यात येते. निवासाची सोयही उपलब्ध असते. मात्र त्यासाठी दरवर्षी प्रवेशपरीक्षा घेतली जाते. या दोन्ही प्रकारच्या परीक्षांच्या जाहिराती वेळोवेळी राज्यातील अग्रगण्य वृत्तपत्रांत देण्यात येतात.

परीक्षेचे माध्यम

सर्व परीक्षांसाठीच्या प्रश्नपत्रिका या िहदी व इंग्रजी माध्यमातून उपलब्ध असतात. मात्र मुख्य परीक्षा व मुलाखत ही भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या २४ भारतीय भाषांपकी कोणत्याही भाषेत लिहिता व देता येते. अगदी मराठीतही.

राज्यसेवा परीक्षा किंवा एमपीएससी

केंद्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या परीक्षेप्रमाणेच राज्यांमध्येही अशाच अधिकारी पदाच्या परीक्षा घेतल्या जातात. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, साहाय्यक पोलीस आयुक्त, तहसीलदार, मंत्रालयातील कक्ष अधिकारी, सहकार तालुका उपनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, विभागीय सहनिबंधक, महाराष्ट्र राज्य वित्त व लेखा सेवा, साहाय्यक विक्रीकर आयुक्त, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी या व अशा विविध पदांसाठी राज्य लोकसेवा आयोग परीक्षा घेतो. केंद्रीय परीक्षांच्या तुलनेत या परीक्षेचा केंद्रिबदू महाराष्ट्र राज्य व भारत इतका मर्यादित असतो. तर आयएएससाठी हाच केंद्रिबदू भारत व जग असा असतो.

परीक्षा पद्धती :

राज्यसेवा परीक्षेतही पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असाच क्रम असतो. मात्र येथे पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्ही परीक्षा बहुपर्यायी पद्धतीच्या असतात. पूर्वपरीक्षेत दोन प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतात. प्रत्येकी २०० गुण आणि दोन तास. येथेही आयएएसच्या परीक्षेप्रमाणेच उत्तर चुकल्यास मिळविलेल्या गुणांपकी गुण वजा होतात.

सामान्य ज्ञानाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये चालू घडामोडी, भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाने) व भारताची स्वातंत्र्य चळवळ, महाराष्ट्र-भारत आणि जगाचा भूगोल, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शासन पद्धती, राज्यघटना, आíथक जगातील घडामोडी, अर्थव्यवस्था, पर्यावरण, परिसंस्था आणि वातावरणीय बदल आदींविषयी प्रश्न विचारले जातात. २०० गुणांसाठी एकूण १०० प्रश्न असतात. त्यामुळे वेळ पुरेसा असतो आणि प्रश्नपत्रिका वाचून सहज पूर्ण होऊ शकते.

कलपरीक्षण चाचणीमध्ये आकलन, उताऱ्यावरील प्रश्न, बुद्धिमापन चाचणी, गणिते, आकडेमोड, नकाशा किंवा आलेखावरील प्रश्न, निर्णयक्षमता तपासणारे प्रश्न अशा अनेक बाबींचा समावेश असतो. येथे ८० प्रश्न असतात. मात्र उतारे बऱ्यापकी क्लिष्ट असल्यामुळे वाचनासाठी वेळ पुरत नाही. त्यामुळे उमेदवारांनी परीक्षा देताना या बाबी लक्षात ठेवून वाचन वेग वाढविण्याचा सराव करावा.

या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर मुख्य परीक्षा असते. येथे प्रत्येकी १५० गुणांचे सामान्य ज्ञानाचे चार पेपर असतात. पहिला इतिहास व भूगोल. दुसरा भारतीय राज्यघटना व भारतीय राजकारण. तिसरा मानव संसाधन विकास व मानवी हक्क, तर चौथा अर्थव्यवस्था, नियोजन, कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान. सर्व प्रश्नपत्रिका १५० प्रश्नांच्या व दोन तास वेळेत सोडविण्याच्या असतात. त्याच्या बरोबरीनेच अनिवार्य इंग्रजी व मराठी भाषेचे पेपर असतात. दोन्ही भाषांचे पेपर प्रत्येकी १०० गुणांचे प्रत्येकी तीन तासांचे व दीघरेत्तरी स्वरूपाचे असतात. या सर्व विषयांचा अभ्यासक्रम राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) संकेतस्थळावर उपलब्ध आहे. एकूण मुख्य परीक्षा ८०० गुणांची असते.

त्यानंतर मुलाखत ही १०० गुणांची असते. मुख्य परीक्षा व मुलाखत यांच्या एकत्रित गुणांमधून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते. सर्व प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी माध्यमातून असतात. राज्य लोकसेवा आयोगातर्फे परीक्षेनंतर काही दिवसांतच आदर्श उत्तरतालिका जाहीर करण्यात येते. त्यामध्ये उमेदवारांच्या काही सूचना असल्यास त्यावर विचार करून काही दिवसांनी अंतिम उत्तरे प्रसिद्ध केली जातात. शिवाय प्रत्यक्ष परीक्षेदरम्यान आपल्याला आपल्याच उत्तरपत्रिकेची कार्बन प्रत मिळते. त्यामुळे आयोगाने जाहीर केलेली उत्तरे, पुढील टप्प्यासाठी निर्धारित केलेली पात्रता गुणसंख्या आणि आपले गुण यांच्यात तफावत आल्यास आपल्याला पारदर्शी पद्धतीने खातरजमा करता येते. ही सुविधा केंद्रीय लोकसेवा आयोग देत नाही.
स्वरूप पंडित – response.lokprabha@expressindia.com