आज आपण जीपीआरएसच्या माध्यमातून नकाशे सहज समजून घेत असलो तरी हे शास्त्र पूर्वापारपासून अत्यंत परिश्रमपूर्वक विकसित करण्यात आले आहे. आज या क्षेत्रात करिअरच्या संधी अधिक व्यापक झाल्या आहेत.

नकाशाशास्त्र हे एक खूप जुनी परंपरा असलेले शास्त्र आहे. मानव चित्रलिपीतून व्यक्त होऊ लागला, त्याचप्रमाणे नकाशातून तो जग प्रवासाची मांडणीदेखील करू लागला. स्कॅन्डेनेव्हियन्स हे आद्य नकाशाकार म्हणून ओळखले जातात. युरोप खंडातील अनेक देशांमधून निघालेल्या सागरी मोहिमा त्या वेळच्या दर्यावर्दीनी नकाशाबद्ध केलेल्या होत्या. काळानुरूप या शास्त्रात अनेक बदल होत गेले आहेत. आज हे शास्त्र खूपच प्रगत झाले असून यात अद्ययावत तंत्राचा उपयोग केला जात आहे.

loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : श्रमिक ऊर्जा भांडवलाइतकीच महत्त्वाची
anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
successfully test fired advanced missile Agni Prime from APJ Abdul Kalam Island
‘अग्नी-प्राइम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नकाशा तयार करण्याच्या शास्त्राला नकाशाशास्त्र (काटरेग्राफिक सायन्स) असे म्हणतात. तर नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तींना नकाशातज्ज्ञ (काटरेग्राफर) म्हणून ओळखले जाते. सध्याच्या माहिती तंत्रज्ञान युगात नकाशाशास्त्रात करिअर करणे हे एक महत्त्वाचे करिअर होऊ शकते. पर्यटनासारखा आनंद देणारा छंद नकाशाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळेच भारतामध्ये आलेले परदेशी पर्यटक नेहमी हातात नकाशा घेऊन विविध स्थळांना भेटी देताना दिसतात.

नकाशा म्हणजे नेमके काय याचा पृथ्वीच्या संदर्भाने विचार केला तर पृथ्वी किंवा तिच्या कोणत्याही पृष्ठभागाचे तंतोतंत केलेले वर्णन म्हणजे नकाशा. म्हणजेच परिसरात जे दिसते, जसे दिसते तसे कागदावर मांडण्याचे शास्त्र होय. नकाशा करण्यासाठी कलात्मक बाबींचा वापर होतो उदा. कॅलीग्राफी, सांकेतिक चिन्हे व खुणा तसेच तांत्रिक बाबींचाही वापर करावा लागतो उदा सर्वेक्षण, ट्रिग्नोमेट्री, प्रोजेक्शन इत्यादी. हे नकाशाशास्त्र अनेक शतकांच्या अभ्यासातून विकसित झाले आहे आणि होत आहे. आजकाल जीपीएस तंत्राचा वापर तुम्ही-आम्ही अगदी सहजतेने करत असतो. खाजगी टॅक्सीवाले तर जीपीएस हे अ‍ॅप वापरूनच व्यवसाय करतात; परंतु या अ‍ॅपमध्ये असलेला नकाशा विशेष मेहनत घेऊन तयार करावा लागतो, हे अनेकांना माहीत नसेल!

10-career-map

या शास्त्राचा उपयोग कोणाला? एका वाक्यात सांगायचे तर तुम्हा आम्हा सर्वानाच! असे म्हणतात की अनेक लिखित पानांचा ऐवज एका नकाशात असतो म्हणजेच नकाशा वाचन करून माहितीचे लिखाण केल्यास खरोखरच अनेक पाने लिहिता येतात. या शास्त्राचा सर्वात जास्त वापर संरक्षण दल, भूगोल शास्त्रज्ञ (जिऑग्राफर), भूगर्भ शास्त्रज्ञ  (जिऑलॉजिस्ट), पुरातत्त्व अभ्यासक (आर्किऑलॉजिस्ट), वास्तुरचनाकार  (आर्किटेक्ट),  इत्यादींना होतो. त्याशिवाय पर्यटन सेवा देणाऱ्या संस्था, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसिंचन विभाग, जनगणना कार्यालय, निवडणूक आयोग, इत्यादींना ही असतो.

आपण सर्वानीच शालेय जीवनात भूगोल, इतिहास, इत्यादी विषयांचा अभ्यास करताना नकाशे अभ्यासले आहेत. शालेय जीवनात शिक्षकाने नकाशांचा जर योग्य प्रकारे परिचय करून दिला असेल, तर मात्र नकाशे आपल्याला आवडायला लागतात. अन्यथा ते विषयाच्या रूक्ष भाग बनतात. परंतु नकाशा हे सर्वानाच उपयुक्त ठरणारे महत्त्वाचे साधन आहे हे मात्र आता सिद्ध झाले आहे. गुगल मॅप, विकिमॅपिया इत्यादी अ‍ॅपद्वारे स्मार्ट फोनच्या माध्यमातून नकाशा आता अनेकांच्या खिशात जाऊन बसला आहे!

या शास्त्राची व्याप्ती किती?

विसाव्या शतकाच्या अखेरीस संगणक युग सुरू झाले. तोपर्यंत या शास्त्राची व्याप्ती त्रिमितीय प्रदेशाचे सर्वेक्षण करून, द्विमितीय कागदावर तंत्रशुद्ध व कलात्मक पद्धतीने मांडणे इतपतच होती. अर्थात त्या काळात ही व्याप्ती तशी मोठीच होती कारण हे म्हणजेच ‘पृथ्वीला मानवाने आपल्या कवेत घेण्यासारखे आहे!’ १९६० नंतर संगणक युग, आंतरजाल, माहिती संप्रेषण अशा एकामागोमाग एक मोठय़ा क्रांती झाल्या आणि त्यामुळे या शास्त्राची व्याप्तीदेखील वाढली.

संगणक, माहिती संप्रेषण, अवकाश विज्ञान आणि सुदूर संवेदन यांमुळे नकाशास्त्रात भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस), भौगोलिक स्थाननिश्चिती प्रणाली (जीपीएस), सुदूर संवेदन (रिमोट सेन्सिंग) इत्यादी नवीन शाखा जोडल्या गेल्या आहेत. उपरोक्त तंत्राच्या आधारे करावयाच्या कामात, नकाशे तयार करणे, त्यांचे विश्लेषण करणे व त्यांचा वापर करणे असे अनेक उपप्रकार यांमध्ये येतात.

कृत्रिम उपग्रहाद्वारे प्रदेशाची (आता पृथ्वी ही मर्यादा राहिलेली नाही.) सर्वप्रकाराची माहिती आपल्याला अचूकपणे तात्काळ मिळवता येते. उदा. वनव्याप्त क्षेत्र, विशिष्ट पिकाखालील जमीन, धरणाच्या फुगवण्याचे एकूण क्षेत्रफळ, लष्करी हालचाली, अगदी तुम्ही राहता ती इमारतदेखील पाहता येते. या मिळवलेल्या माहितीचा वापर करून आता आवश्यकतेनुसार विविध प्रमाणांवरील अचूक नकाशे संगणकाद्वारेच तयार करता येतात. या विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन भारतासह अनेक राष्ट्रांनी त्यांचे कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडलेले आहेत. हे उपग्रह अहोरात्र माहिती जमा करून पृथ्वीवरील त्यांच्या मुख्य केंद्राकडे पाठवत असतात. भारताने तर काटरेसॅट नावाचा कृत्रिम उपग्रह मालिका अवकाशात सोडण्यास सुरुवात केली आहे. या मालिकेतील काटरेसेट- टू डी हा कृत्रिम उपग्रह अलीकडेच सोडण्यात आलेला आहे.

शिक्षण कुठे मिळते?

या विषयाचे शिक्षण हे पदव्युत्तर स्तरापुढेच भारतात उपलब्ध आहे. महाराष्ट्रात विविध विद्यापीठांत हा विषय शिकवला जातो. त्यासाठी भूगोल, भूशास्त्र किंवा विज्ञान विषयाची किमान पदवी आवश्यक असते. जसे, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ तसेच सी डॅक, मिटकॉन या ठिकाणी ही याचे विशेष प्रशिक्षण देणारे कोस्रेस आहेत. विद्यापीठातील भूगोल, भू-शास्त्र, पर्यावरण शास्त्र या विभागातून  हे शिक्षण दिले जाते.

भारताची नकाशा तयार करणारी शिर्षसंस्था भारतीय सर्वेक्षण विभाग ही जगातील एक अग्रगण्य संस्था असून १९६७ सालापासून ही संस्था नकाशाशास्त्र विषयक काम करते. या संस्थेमार्फत देखील खालील प्रशिक्षण कार्यक्रम डेहराडून व हैदराबाद येथे घेतले जातात. यासाठी किमान पदवी आवश्यक असते.

Cartographic Digital Mapping G.I.S
Photogrammetry & remote sensing
Cadastral survey & Information System

भारतात गुजरात, कोलकता, चेन्नई, बंगळूरु, दिल्ली, राजस्थान इत्यादी राज्यांमध्ये देखील अनेक विद्यापीठात या विषयाचे शिक्षण उपलब्ध आहे.

उपयोग कोठे व कसा?

या विषयातून शिक्षण घेतल्यास पुढिल ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध असतात.

  • भारतीय सर्वेक्षण विभाग (SOI)
  • नॅशनल अ‍ॅटलास अ‍ॅण्ड थिमॅटिक मॅिपग ऑर्गनायझेशन
  • कोलकाता (NATMO),
  • इंडियन सॅटेलाइट अ‍ॅण्ड रिमोट सन्िंसग ऑगनायझेशन (ISRO),
  • नकाशे तयार करणारे खासगी प्रकाशक जसे ऑक्सफर्ड युनिव्हसिटी प्रेस, केंब्रिज इत्यादी. भारतीय भूगर्भशास्त्र विभाग, भारतीय जनगणना कार्यालय, जलसिंचन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा सरकारी संस्था हा या विषयाच्या तज्ज्ञ मंडळीची गरज असते.
  • विविध शैक्षणिक संस्था जिथे हा विषय शिकवला जातो.
  • शिवाय शिक्षण पूर्ण झाल्यास नोकरी करण्यापेक्षा नकाशे तयार करून देणारी स्वत:ची संस्थाही स्थापन करता येते व स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय उभारता येतो.

भारतासारख्या नवशिक्षित देशात या विषयाचे महत्त्व भविष्यात वाढणार आहे, हे नक्की!
रवि जाधव – response.lokprabha@expressindia.com