00-lp-devi-logoसाडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दसरा हा सण प्रत्येकासाठीच खास असतो. कलाकारांसाठीही दसऱ्याचं विशेष महत्त्व आहे. दसऱ्याच्या आठवणी,  सीमोल्लंघन, दागिना, सोने खरेदी याबद्दलच्या त्यांच्या भावना त्यांनी त्यांच्याच शब्दांत व्यक्त केल्या आहेत.

नथ तर हवीच! – सायली संजीव
दसरा आणि सीमोल्लंघन असं एक समीकरण आहे. एखादं क्षेत्र आपण कधीच अजमावलेलं नसतं किंवा त्याचा गंभीरपणे विचार केलेला नसतो. अशा क्षेत्रात तुम्ही समरसून जाता आणि ते तुमचं सीमोल्लंघन ठरतं. असंच माझ्यासोबतही झालं. मी मूळची नाशिकची. राज्यशास्त्राची विद्याíथनी. मला पॉलिटिकल अ‍ॅनालिस्ट व्हायचं होतं. ते अजूनही व्हायचंय. माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी काही एकांकिका स्पर्धामध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धामध्ये विविध पुरस्कारही मिळाले. वाचिक अभिनयाचंही कौतुक 17-lp-sayali-sanjeevझालं. या दरम्यान या क्षेत्रातील काही अनुभवी लोकांनी मला अभिनय क्षेत्रात येण्याचा सल्ला दिला. एका मालिकेसाठी मी ऑडिशन दिली आणि तिथेच माझी निवडही झाली. ‘काहे दिया परदेस’ ही ती मालिका. या मालिकेमुळे माझं संपूर्ण आयुष्यच बदललं. अभिनयाच्या बाबतीत मी अतिशय पॅशनेट आहे. इथे मला समाधान, आनंद मिळतो. दसऱ्याची दुसरी आनंद देणारी ओळख म्हणजे सोनं, दागिने. मला दागिन्यांची प्रचंड आवड आहे. त्यातही मला नथ खूप आवडते. नथीमुळे स्त्रीचं सौंदर्य आणखी खुलतं. नथ, चमकी, नोझ िरग हे सगळंच मला आवडतं. संपूर्ण शृंगार झाल्यानंतर सगळ्यात शेवटी नथ घातली की चेहरा आणखी सुंदर दिसू लागतो. माझं नाक टोचलेलं नाही. नाकाला काही दुखापत झाली तर ते स्क्रीनवर चांगलं दिसणार नाही म्हणून सध्या मालिका सुरू असल्यामुळे ते आता टोचताही येणार नाही. पण यावर मी एक उपाय शोधला आहे. गौरी या व्यक्तिरेखेतून मी बाहेर आले की नोझ िरग घालते. पारंपरिक वेशभूषेत नथ, अंबाडा, चंद्रकोर हे मला हवंच असतं. तर कधी चमकी घालावीशी वाटली तर एखादी खडय़ाची टिकली लावते. त्यामुळे माझं नाक टोचलं नाही यावर काहीही अडत नाही. पण एक नक्की, मालिका संपल्यानंतर तातडीने करण्याच्या कामांमध्ये पहिलं काम हे नाक टोचण्याचं आहे.

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
Thane Housing Court
ठाणे हाऊसिंग अदालतीत तक्रारदारांना दिलासा, प्रलंबित १२० पैकी ११० तक्रारींवर निर्णय
Pune city leads the country in house sales Pune news
घरांच्या विक्रीत देशात पुण्याची आघाडी! जाणून घ्या शहरातील कोणत्या भागाला सर्वाधिक पसंती…
multi color grapes export demand decline at global level
निर्यातीसाठी रंगीत द्राक्षांना मागणी घटली; जाणून घ्या कारणे काय ?

नव्याचा प्रारंभ – विकास पाटील

15-lp-vikas-patilसाडे तीन मुहूर्तापकी एक असा दसरा शुभ मानला जातो. या दिवशी सोन्याचं महत्त्व खूप आहे. तसंच त्या दिवशी सोन्याची खरेदीही केली जाते. दसऱ्याचं दुसरं महत्त्व म्हणजे नव्या गोष्टींची सुरुवात या दिवसापासून होते. कोणतेही काम करायचे असेल तर दसऱ्याला सुरुवात करू असं मानलं जातं. एखादी वस्तू विकत घ्यायची असेल तरीही या दिवसाला प्राधान्य दिलं जातं. या दिवसाचं महत्त्व यासाठीही आहे की, या दिवशी शुभ कार्यासाठी कोणतीही विशिष्ट वेळ बघितली जात नाही. कारण तो संपूर्ण दिवसच शुभ असतो. यामागे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नसून शास्त्रीय आधार आहे. माझ्या घरी एखादी वस्तू घ्यायची असेल आणि दसरा जवळच आला असेल तर आम्ही त्या दिवसासाठी थांबतो. माझ्यासाठी दसरा खास आहे, कारण या दिवशी माझ्या ज्या कामांना सुरुवात झाली आहे त्या कामांना यश मिळालं आहे. या दिवशी आजूबाजूला उत्साहाचं वातावरण असतं. प्रत्येकामध्ये सकारात्मक ऊर्जा असते. ही ऊर्जा जाणवते. त्या दिवशी त्याचा अनुभवही येतो. या सकारात्मक ऊर्जेची शक्ती इतकी असते की सगळीकडे चतन्याचं, प्रसन्नतेचं वातावरण असतं. प्रत्येकाच्या घरात आणि मनात उत्साह असतो. आमची पिढी प्रत्येक गोष्टीमागचं कारण, माहिती शोधत असते. दसरा या सणामागे शास्त्रीय आधार आहे आणि म्हणूनच या सणाला शुभ मानलं जातं. आमच्या पिढीने पुढच्या पिढीपर्यंत हे शास्त्रीय कारण पोहोचवलं पाहिजे. या सणाचं महत्त्व शास्त्रीयदृष्टय़ा पटवून दिलं पाहिजे. दसऱ्याला सोनं खरेदी करतात. सोने खरेदीची एक खूप जवळची आठवण सांगतो. अभिनय क्षेत्रात मला पहिलं काम मिळाल्यानंतर मी माझ्या आईला एक सोन्याची नथ घेऊन दिली होती. या भेटीचा माझ्या आईला खूप आनंद झाला होता. तिला सोन्याचा दागिना मिळाला म्हणून ती खूश नव्हती तर तिच्या मुलाने स्वत:च्या मेहनतीच्या कमाईतून तिला एक भेट दिली यासाठी तिला आनंद झाला होता. मुलांना दागिन्यांची फारशी आवड नसते. त्यात फारसा रसही नसतो. पण, मला दागिने बघायला आवडतात. त्यांच्या डिझाइनचं निरीक्षण करायला आवडतं. त्याची फारशी माहिती नसली तरी ते बघणं मी एन्जॉय करतो. यंदाच्या दसऱ्याला आई आणि बायकोला एखादा दागिना घ्यायचा विचार आहे.

स्वत:च्या क्षमता तपासणं म्हणजे सीमोल्लंघनच! – अभिजीत खांडकेकर

18-lp-abhijit-khandkekarमला दागिन्यांविषयी विशेष ममत्व नाही. मी अंगठी, चेनसुद्धा फारसं घालत नाही. पण कुटुंबीयांसाठी दागिने घ्यायला मला आवडतं. घरात सोने खरेदी करण्यात माझा हिरिरीने सहभाग असतो. त्यांच्या खरेदीत मला रस असतो. मला दसरा आठवतो तो नाशिकचा भोसला मिलट्री स्कूलमधला. नाशिकमध्ये मी भोसला मिलिटरी स्कूलजवळच राहायचो. तिथली रामाची मूर्ती विशेष आहे. कोदंडधारी राम असं त्याला म्हणतात. एरवी रामाची मूर्ती सीता आणि लक्ष्मण यांच्यासोबत असते. पण, मिलिटरी स्कूलमध्ये धनुष्यबाण घेऊन उभा असलेला राम अशी मूर्ती होती. अशी मूर्ती फार क्वचित बघायला मिळते. ती मूर्ती तिथल्या फायिरग रेंजमधील गोळ्यांच्या पितळी काडतुसापासून बनवली आहे. आम्ही सगळे मित्र चालत त्या मूर्तीचं दर्शन घ्यायला जायचो. तिथला प्रसाद मला आजही आठवतो. दसरा म्हणजे सीमोल्लंघनाचा दिवस. माझ्या लेखी सीमोल्लंघन म्हणजे स्वत:च्या क्षमता तपासणं. प्रत्येकाने स्वत:भोवती एक चौकट आखलेली असते. ती मोडून नवीन काही आजमावू पाहणं म्हणजे सीमोल्लंघन होय. त्या चौकटीबाहेर जाऊन ध्येय गाठणं, त्यासाठी प्रयत्न करणं म्हणजेसुद्धा सीमोल्लंघनच असतं. एखादी गोष्ट एखाद्याला जमत नाही असं वाटतं. पण त्या दिवशी तो समज काही वेळासाठी बाजूला सारून आपापल्या क्षमता तपासत तिथवर पोहोचणं याला महत्त्व आहे. मी बीड, परभणी, अहमदनगर अशा अनेक गावांमधून आलोय. तेव्हा मी असा विचारही केला नव्हता की मी मनोरंजन क्षेत्रात येईन; जिथे इतकी प्रसिद्धी, पसा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाधान आहे. पण त्यावेळी मी ते पाऊल उचललं. प्रयत्न करून बघू असं म्हणतं पुढे आलो. या क्षेत्रात काही होऊ शकलं नाही तर काय होईल अशा सगळ्या शक्यतांचा विचार केला. शक्यतांचा विचार केला की गोष्टी सोप्या होतात. मी त्यावेळी केलेला विचार आणि मोडलेली चौकट हे सीमोल्लंघनच होतं असं मला वाटतं. आता या क्षेत्रात स्थिरावल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते. तुमच्यात जिद्द असली आणि तुमचं ध्येय गाठण्यासाठी तुम्ही  प्रामाणिक प्रयत्न केलात की सगळं शक्य होतं. दसरा या सणाचं यासाठीच खूप महत्त्व आहे.

शाळेतला दसरा आठवणीचा! – प्रिया बापट</strong>

16-lp-priya-bapatआमच्या शाळेतला साजरा केला जाणारा दसरा माझ्या आजही लक्षात आहे. आम्ही सगळी मुलं त्या दिवशी पारंपरिक वेशभूषेत शाळेत जायचो. एकमेकांना आपटय़ाची पानं देऊन सण साजरा करायचो. सरस्वतीपूजनामुळे मन प्रसन्न व्हायचं. दहावी झाल्यानंतरही अनेक वर्ष आम्ही मित्रमत्रिणी शाळेत दसऱ्याच्या दिवशी हमखास भेटायचो. जुन्या आठवणींत रमायचो. दसऱ्याच्या निमित्ताने आम्हा मित्रमत्रिणी आणि शिक्षकांची भेट व्हायची. साधारण आठवी-नववीत असतानाची एक आठवण सांगावीशी वाटते. निसर्गाच्या बाबतीत आम्ही सगळे मित्रमत्रिणी थोडे सतर्क झालो. म्हणजे झाडाची पानं तोडून ते सोनं म्हणून देणं तेव्हा पटेनासं होऊ लागलं. त्यामुळे मी, कुटुंबीय, मित्र परिवार आम्ही सगळ्यांनी आपटय़ांची पानं देणं बंद केलं. त्या वर्षीचा दसरा माझ्या लक्षात आहे. शास्त्र म्हणून एक काडी आणली जाते. पण, सोनं म्हणून आपटय़ाची पानं देणं बंद केलं. राजकीय नेते बनूनच समाजकार्य करता येतं असं नाही तर एक नागरिक म्हणूनही चांगल्या गोष्टींची सुरुवात करता येते. माझं लग्न दसऱ्याला झालं या कारणामुळेही माझ्यासाठी हा सण खूप महत्त्वाचा आणि खास आहे. त्यामुळे आता अनेक जण आम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तारखेने तर देतातच पण दसऱ्याच्या दिवशीसुद्धा देतात. म्हणून दसरा हा माझ्यासाठी अतिशय खास सण आहे. दसरा म्हटलं की सोन्याची, दागिन्यांची खरेदी करणं आलंच. पण मला दागिन्यांची विशेष आवड नाही. दसऱ्याच्या दिवशी सोनं घ्यायलाच हवं असा माझा अट्टहास नसतो. या दिवशी मी सोने खरेदी करेन की नाही माहीत नाही, पण त्या दिवशी मला कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्यासोबत वेळ घालवायला जास्त आवडतं. त्यांच्यासोबत वेळ घालवणं मला अधिक महत्त्वाचं वाटतं. दागिन्यांची विशेष आवड नसली तरी कधी साडी नेसली तर मात्र सगळे दागिने घालायला आवडतात. नऊवारीवर तर ते हवेतच. नटायला आवडतं. जेव्हा नटते तेव्हा मात्र साग्रसंगीत सगळे दागिने मला हवे असतात. त्यातही मला नथ जास्त आकर्षति करते. नोझ िरगपेक्षा पारंपरिक नथच जास्त आवडते. मोती आणि सोन्याने सजवलेली नथ चेहऱ्याला एक वेगळाच लुक देते. नथीमुळे स्त्रीचा चेहरा प्रसन्न दिसतो. तिचं सौंदर्य आणखी खुलतं.
शब्दांकन – चैताली जोशी
response.lokprabha@expressindia.com