‘‘वेलकम.. वेलकम.. पोटात कावळे ओरडतायत ना? हो म्हणून तर माझ्याकडे यायला पाय वळले. या बसा बसा; पण तेवढी खुर्ची बघून बसा म्हणजे झालं! कारण काही उचापतकारांनी त्यावर उभं राहून काम करून ठेवलंय. अहो, असे खिसे चाचपू नका, पेटीएम आहे मॅनेजरकडे आणि आज रोख अन् उद्या उधार असं जरी लिहिलं असलं ना तरी नेहमीच्या पंटर लोकांसाठी सवलत देतो बरं का; पण हे केवळ आपल्यातलं सिक्रेट हं! कॉलेजच्या दोस्त लोकांनी सुचवलेल्या डिश असतील ना? त्यांची ऑर्डर काय ते देऊन या. त्याचं काय आहे ना, सेल्फ सíव्हस आहे आमच्याकडे. तशी या कॉलेजच्या पोटपूजेची व्यवस्था माझ्याकडे आहे, हे एव्हाना तुम्हाला कळलंच असेल. ओळखलंत ना मला? अहो, मी तुमचं लाडकं कॅन्टीन!

अगदी कटिंग चहा- मॅगीपासून ते चिकन बिर्याणीपर्यंत सगळं इथं मिळतं आणि कुणीही यावं, कितीही वेळ बसावं, हवा तसा दंगा करावा, कुणी बोलणारं इथे नसतं. आता यांचंच बघा ना, हे काही जण कायमच इथे पडीक असतात. त्यांचा अटेंडन्स वर्गात नाही तर माझ्या इथेच घेतला जातो इतक्या नित्यनियमाने ते रोज येऊन हजेरी लावतात आणि ७५ टक्क्य़ांपेक्षा अटेंडन्स कमी म्हणून बोलणी खातात. जणू हे टेबल मी त्यांच्याच नावावर केलेलं आहे; पण काहीही म्हणा, यांच्यासारख्यांमुळे मला कायम जाग असते. अगदी परीक्षेच्या काळात स्कॉलर लोकांनी वाचनालय आणि स्टडी रूमला जवळ केलेलं असलं तरी हे काही माझी साथ सोडत नाहीत. यांची जणू इथेच पंढरी आहे.

a young boy denied entry to bank of India branch for wearing shorts video goes viral
Nagpur Video: हा कोणता नियम! शॉर्ट पॅन्टमुळे बँकेत No Entry; नागपूरच्या तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल..
LSG Coach justing langer reaction on Signing Rohit sharma in mega auction
IPL 2024: रोहित शर्माला मेगा लिलावात लखनौ खरेदी करणार? कोच जस्टिन लँगरची भन्नाट प्रतिक्रिया, VIDEO व्हायरल
kid making sandwich for grandpa viral video
गोंडस चिमुकल्या शेफने बनविले आजोबांसाठी सॅण्डविच! व्हायरल Video पाहून तुम्हीही कराल कौतुक…
preventive chemotherapy
कोण घेतंय ‘ही’ केमोथेरपी? ठरणार का ती कर्करुग्णांसाठी वरदान? तज्ज्ञ काय सांगतात?

हा मुलींचा घोळका बघताय ना, यातली एखाददुसरी कुणी तरी डबा आणत नाही; पण बाकी सगळ्यांचे टप्परवेअर की काय, त्याचे डबे असतात आणि त्यातले वेगवेगळे पदार्थ एकमेकींना वाटणं आणि त्याचे किस्से सांगणं चालूच असतं. गप्पांचं तर काय सांगू? खाणं राहिलं बाजूला यांचं बोलणंच संपत नाही; पण घंटा झाली की या शिस्तीत इथून कल्टी मारतात.

ते तिथे दिसतंय ना ते कामसू लोकांचं टेबल, चार्जिग पॉइंट जवळच! कुणाचा मोबाइल नाही तर कुणाचा लॅपटॉप इथे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत असतो. कितीदा सांगून, ओरडून झालं, पण तेवढय़ापुरता काढून मग पुन्हा जैसे थे! काय एवढं काम इथे येऊन करत असतात त्यांनाच ठाऊक.

ते कलाकारांचं मंडळ! एक तर हे रिहर्सल हॉलमध्ये दिसणार नाहीत तर इथे! यातला तो गिटार घेऊन बसलेला गायक एक दिवस मोठा संगीतकार होणार असं प्रत्येकाला वाटतं. तो आणि त्याचं मंडळ फावल्या वेळेत इथे ताल धरत असतं. काही समाजसुधारकदेखील येऊन बसतात. कॉलेजच्या निवडणुका, तात्त्विक वाद, समाजसेवा याबद्दलच्या मीटिंग घ्यायला त्यांना हीच जागा सापडते, कारण एक तर चार जास्त लोकांना ज्ञान देता येतं आणि दुसऱ्या ठिकाणी मीटिंग ठेवली तर ती चुकवून सगळे इथेच बसलेले सापडतात.

कुणाचा वाढदिवस असेल तेव्हा कॉन्ट्रिब्युशन काढून आणलेला केक असला की मग तो फ्रिजमध्ये आणून ठेवणं, त्यासाठी मग मॅनेजरला मस्का मारणं, मग कल्ला करून सरप्राइज देणं, एका टेबलावर केक कापला जात असताना सगळ्यांनी हॅपी बर्थडे गाणं हा माहोल बघून बरं वाटतं. एक उत्साहच असतो सगळ्यांमध्ये. यासोबतच चिडवाचिडवी, भांडण-समजावणं, एकमेकांना भरवणं, टेबलाखाली हळूच तिचा हात पकडणं या आणि अशा अनेक क्षणांचा मी साक्षी आहे.

काहींना मात्र मी त्या डॉमिनोज, मॅकडी, बर्गर आणि सीसीडी तत्सम कॅफे इतका स्टेट्स देणारं वाटत नाही. म्हणजे माझ्याबद्दल त्यांना चेकइन की काय म्हणतात ते टाकावंसं वाटत नाही ना! त्याची खंत वगैरे नाही हां.. त्यांची ही कारणं ते स्टेस टाकण्यापुरती असतात, कारण त्याचं सगळ्यांना मी अनेकदा इथे ताव मारताना नि खाऊन बोटं चाटताना पाहिलंय.

इतक्या वर्षांत अनेक गोष्टी बदलल्या आहेत. आवडीनिवडी बदलल्या तसा मेनूदेखील वाढला, बदलला. वडापावसोबत बर्गरदेखील मुलांच्या ऑर्डरमध्ये आलाय; पण ते वडापाव विसरले नाहीयेत. सेजवान आणि हाक्का नूडल्सच्या चवीसोबत दालखिचडीपण त्यांना तितकीच हवीहवीशी वाटते याचा आनंद वाटतो.

या नवयुवकांच्या आयुष्यात मी एक हक्काची जागा म्हणून स्थान मिळवलंय याचा मला खरंच आनंद वाटतो. चला, चला.. घंटा वाजली.. मी येतो आता. अजून गर्दी होईल. तुम्ही बसा निवांत.. पोटभर खा.. आणि परत नक्की या.
कोमल आचरेकर – response.lokprabha@expressindia.com