23 October 2017

News Flash

Womens Day 2017 : जावे त्याच्या वंशा तेव्हाची

विमेन्स डे निमित्त स्त्रियांच्या भावविश्वाची, व्यथेची सफर घडवून आणणारी ही मालिका जागतिक स्तरावर पोहचली

अभिजीत पानसे | Updated: March 8, 2017 5:12 PM

यशराज फिल्म्सने या ‘गोल’ला पाठिंबा दर्शवत ग्लोबल गोल्स या संस्थेसोबत मिळून चार भागांची ‘मेन्स वर्ल्ड’ या वेब सीरिजची निर्मिती केली आहे.

पलीकडील बाजूचे गवत नेहमीच हिरवे वाटते, ही आपली मानसिकता आहे.
पण ‘जावे त्याच्या वंशा कळे तेव्हा’. व्यक्तीला, जनसमूहाला, समाजाला किंवा स्त्री आणि पुरुष यांनाही स्वत:चे आयुष्य, प्राप्त परिस्थितीबद्दल कधीतरी वैषम्य वाटतंच आणि इतरांचं आयुष्य सोपं असतं असं वाटतं. त्याबद्दल असूया वाटते. आणि कधी तरी हा विचार मनात येतोच की ही स्थिती, हा समाज, हे जग जसे आहे असे नसून ‘तसे’ असते तर, जर मी त्यांच्याजागी असतो वा असती तर..
हे जग पुरुषप्रधान आहे, इथे पुरुषाचं वर्चस्व असतं. स्त्रीची पिळवणूक होते. एकटय़ा स्त्रीला जगण्यात नेहमी अडचणी येतात. हा सर्वसामान्य स्त्रीचा दृष्टिकोन, मानसिकता असते.
पुरुषांना वाटतं या पुरुषप्रधान जगात स्त्रियांना जास्त सवलती मिळतात, स्त्रियांना जास्त मदत, पािठबा मिळतो. सर्व जबाबदारी पुरुषांनाच घ्यावी लागते. मनात या तक्रारी निर्माण होत राहतात.
पण जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. संबंधित व्यक्ती, वा समूहाच्या बुटांमध्ये स्वत: पाय टाकून बघितल्याशिवाय त्या त्या व्यक्ती, व्यक्ती समूहाच्या अडचणी, जाबाबदारी, व्यथा समजू शकत नाही. कारण पलीकडचे गवत नेहमीच हिरवे दिसते. पण जर पलीकडे जाऊन ते गवत खरंच ‘हिरवं ’आहे का बघता आलं तर! तेव्हा सत्य कळू शकेल.
आणि ते कळल्यावर तरी आपली मानसिकता बदलेल का, यावर वाय फिल्म्सची ‘मेन्स वर्ल्ड’ ही वेब सीरिज जबरदस्त प्रभावशाली भाष्य करते. पुरुष आणि स्त्री यांच्यातील लैंगिक भेदभावावर यापूर्वीही काही चित्रपट येऊन गेलेत.
पण त्या सर्वाचा भर हा विनोद निर्मिती आणि मनोरंजन यावरच होता. त्या कलाकृतींना दिलेली ट्रीटमेंट ही वरवरचीच होती. पण ‘मेन्स वर्ल्ड’ ही वेब सीरिज उच्च दर्जाची आहे. विनोदी आवरण आहे पण खोल विचार आहे. विचार करायला लावणारी आहे.
किरण नावाचा एक तरुण मुलगा जो स्त्रियांना मिळणाऱ्या सवलती, कामाच्या जागी मिळणारी मदत, सवलत या एकसुरी विचार, अर्धवट पूर्वग्रहदूषित दृष्टीमुळे तो त्रस्त होऊन एक दिवस दारूच्या नशेत मनापासून देवाला प्रार्थना करतो की हे जग यातील परंपरा, पद्धती, विचार प्रक्रिया पूर्णपणे उलट होऊ दे. त्यानुसार तथाकथित पुरुषप्रधान जगात स्त्रियांना मिळणारी खास वागणूक बदलून हे जग स्त्री-प्रधान व्हावं आणि पुरुषांना खास वेगळी वागणूक मिळावी ही इच्छा करतो.
पण म्हणतात ना, ‘तुम्ही जी इच्छा करता, मागता त्याबद्दल फार जागरूक राहा, कारण कोणास माहिती ती इच्छा पूर्ण होईल.’
आणि किरणची मागणी पूर्ण होते. दुसऱ्या दिवशी तो उठतो तर हळूहळू त्याच्या लक्षात येत जातं की त्याची मागणी, प्रार्थना मान्य झाली आहे.
‘‘लडम्का है, अपने औकात में रहे!’’
‘‘आजसे तुम्हारा काम वाम सब बंद, बाहर घुमना बंद. अब बस तुम्हारी शादी होगी. और वो भी मैं जिस लडम्की के साथ बोलुंगी उसीसे..’’ असे बोलण्यांचा भडिमार किरणवर होऊ लागतो.
बसमध्ये ‘फक्त पुरुषांसाठी’ जागा आरक्षित असतात. ‘मेन्स युनिव्हर्सटिी’ दिसते.
मॅक्डोनाल्डच्या जागी मॅकडॉना होते. सगळं जग स्त्री-प्रधान झालेलं असतं.
आणि किरणला या जगाचेही तोटे, पुरुषांचे आणि स्त्रियांचे प्रश्न, अडचणी कळू लागतात. त्याला आता हे जग नकोसं वाटू लागतं. हळूहळू तो याच जगात रुळतो. कारण आता सुटका नसते.
शेवटी एकदा रात्री उशिरा एकटय़ा ‘पुरुषाला’ पाहून शोषण, विनयभंग करणाऱ्या समाजकंटक मुली त्याला त्रास देतात. पोलिसातही त्याला दाद मिळत नाही. तिथेही त्याचं शोषण केलं जातं. तेव्हा त्या एकटय़ा पुरुषाला रिया चक्रवर्ती वाचवते. तेव्हा किरण तिला सांगतो की, या सर्व प्रकाराला तोच जबाबदार आहे. हे दृश्य आणि रिया चक्रवर्तीचे संवाद खूप अप्रतिम आहेत.
या वेळी ती किरणला जग आधीसारखं व्हावं म्हणून पुन्हा प्रार्थना करायला सांगते. आणि तो करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो. त्याला जाणवतं की, तो एका स्वप्नातून जागा झालाय.
या मालिकेचा शेवट केलाय तो अप्रतिम. पूर्ण पकी पूर्ण गुण जातात ते लेखकाला आणि दिगदर्शक विक्रम गुप्ताला. या शेवटामुळे ही वेब सीरिज उच्च दर्जा गाठते. िहदीमध्ये खूप चांगल्या वेब सीरिज तयार होताहेत. ‘मेन्स वर्ल्ड’ ही त्यातील सर्वोत्तम पकी एक.
युनायटेड नेशन्सने ‘ग्लोबल गोल्स’ ही संकल्पना ‘सुटेबल डेवलपमेंट’ हे ध्येय समोर ठेवून पुरस्कारित केली आहे. यात पाच गोल्स आहेत त्यातील एक, लैंगिक भेदभाव दूर करून स्त्री-पुरुषांना समसमान वागणूक व संधी उपलब्ध करून देणे हे होय. यशराज फिल्म्सने या ‘गोल’ला पाठिंबा दर्शवत ग्लोबल गोल्स या संस्थेसोबत मिळून चार भागांची ‘मेन्स वर्ल्ड’ या वेब सीरिजची निर्मिती केली आहे.
वाय फिल्म्सची सीरिज असल्याने यातील कास्टिंग चांगलं आहेच. प्रमुख भूमिका गौरव पांडे या अभिनेत्याची आहे. आणि त्याने संपूर्ण न्याय आपल्या भूमिकेला दिला आहे. शिवाय यात परिणिती चोप्रा, कल्की कोचलिन, भूमी पेडणेकर, रिया चक्रवर्ती या प्रमुख िहदी चित्रपट अभिनेत्रींनीही काम केलंय.
त्यामुळेही या सीरिजचा दर्जा वधारला आहे.
या प्रकारच्या विषयावर इंग्रजी, मराठी, िहदी चित्रपट आले आहेतच. पण इतका तरल भाव दर्शवणारी, खोल प्रभाव पाडणारी, विचार करायला लावणारी, प्रसंगी अंगावर शहारे आणणारी कलाकृती हीच प्रथम असावी. आहेच. वरवर विनोदी आवरण पण मुळीच उथळ नसलेली ही कलाकृती आहे. कुठलेही उपदेश न देता नेमक्या गोष्टीवर भाष्य करणारी, मनोरंजन करीत मनाला अस्वस्थ करणारी ही कलाकृती. सामाजिक संदेश देतानाही एकसुरी, शब्दबंबाळ नसलेली ही नेट सिरीज, स्त्रियांच्या अडचणीचे, भावविश्वाचे, व्यथेचे तंतोतंत दर्शन आणि अनुभव देणारी ही कलाकृती ‘मस्ट वॉच’ आहे.
‘ये दुनिया हम औरतों की होकर भी हमारी नहीं है! बाप की बापता सबको दिखायी देती है लेकिन माँ की ममता किसी को नहीं. इमोशनल हो जाये तो सब कहते है बाप की कसम. माँ की कसम कोई नहीं कहता!’
‘फादर इंडिया सुपर हिट हुई लेकिन मदर इंडिया कभी फिल्म बन हीं नहीं सकती..’ हे संवाद बदलेल्या स्त्री-प्रधान जगातील एका स्त्री-पात्राचे आहेत. यातून आपल्या मुळातच एकंदर मानसिकतेवर लेखकाने प्रकाश टाकला आहे. अत्यंत गांभीर्याने या विनोदी वेब सीरिजची निर्मिती केली गेली आहे हे प्रत्येक नेटिसोड बघताना जाणवतं. चारही भाग अप्रतिम जमले आहेत.
What if women treated men the way men treat women
It is the story of walking a mile, in their shoe, in that world.
ही टॅग लाइन असलेली ‘मेन्स वर्ल्ड’ ही वेब सीरिज या विमेन्स डेनिमित्त समस्त स्त्री-पुरुषांनी नक्की बघावीच अशी आहे.

First Published on March 8, 2017 12:42 pm

Web Title: mens world web series