मुंबई विद्यापीठाच्या कलिनास्थित मराठी भाषा भवन सभागृहात नुकताच ‘मेत्ता आंतरराष्ट्रीय नाटय़महोत्सव’ झाला. या महोत्सवात वेगवेगळ्या देशातून आणि राज्यांतून आलेली एकूण पाच नाटके सादर झाली.

अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स, मुंबई विद्यापीठ, परिवर्तन फाउंडेशन, मुंबई व व्हाइस, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १८ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर या कालावधीत ‘मेत्ता आंतरराष्ट्रीय नाटय़महोत्सव’ मुंबई विद्यापीठाच्या कलिनास्थित मराठी भाषा भवन या सभागृहात पार पडला. या महोत्सवात वेगवेगळ्या देशातून आणि राज्यांतून आलेली एकूण पाच नाटके सादर झाली.

raj thackray mns latest news
अग्रलेख: मनसबदारच..
Raj Thackeray, mahayuti support
राज ठाकरे यांच्या भूमिकेत कायमच सातत्याचा अभाव
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
Review of Rohini Nilekanis book Shambharital Shahanapan on durgabai Nilekani
शंभरीतलं शहाणपण!

महोत्सवातील पहिलं नाटक होतं, स्टेजेस थिएटर, श्रीलंका आणि मिशिरिका ग्रुप, रवांडा या संस्थेचं रुवांथी दे चिकेरा लिखित, दिग्दíशत ‘डियर चिल्ड्रेन सिन्सिअरली’. नाटकाचे कथानक हे रवांडा येथील ३० लोकांच्या मुलाखती व पाहिलेल्या सत्य घटनेवर आधारित होते. नाटकात सिंहली आणि तमिळ यांच्यातील वांशिक मतभेदामुळे निर्माण झालेल्या सामाजिक तेढीचे विदारक चित्रण करण्यात आले होते. तसेच रवांडामधील जुन्या रूढी, परंपरा, समाजातील अविवेक, पोकळ आणि अविचारी लग्नपरंपरा यांचेही दर्शन या नाटकातून झाले. भेदभाव करणं ही माणसाची प्रवृत्ती आहे त्यासाठी कुठल्याही देशाच्या सीमा त्याला लागत नाहीत. विषमता अनुभवण्याचा प्रत्येक देशाचा एक काळ होता आणि तोच श्रीलंकेचा काळ कलाकारांनी आणि दिग्दर्शकाने या नाटकातून साकारण्याचा प्रयत्न केला.

‘फिजिकल थिएटर’ हे या नाटकाचं वैशिष्टय़. नाटकात संवादफेक कमी होती, पण शारीरिक हालचालींवरून थेट संवाद साधला जात होता आणि तो कमालीचा प्रभावी होता. ‘काहून बॉक्स’ हे पारंपरिक वाद्य या नाटकाचे आणखी एक आकर्षण. नाटकातील कलाकारांची ऊर्जा थक्क करणारी होती आणि ती प्रेक्षकांची मनमुराद दाद मिळवून गेली. त्यांचं एकमेकांमधला कोऑर्डीनेशन, साधा पोशाख, मोजकेच पण सूचक नेपथ्य ही या नाटकाची बलस्थाने ठरली.

33-lp-drama

‘फिजिकल थिएटर’ प्रमाणेच आणखी एक प्रकार म्हणजे ‘फोरम थिएटर’, या प्रकारात नाटकाचा दिग्दर्शक प्रेक्षकांची नाटकादरम्यान थेट संवाद साधतो. प्रेक्षकांना रंगमंचावर येऊन त्या दृश्यातील एक पात्र बनून त्या दृश्यात वैचारिक किंवा दृश्यात्मक बदल सुचवावे असे आवाहन करतो. या प्रकाराला ‘थिएटर ऑफ थे ऑप्रेस्ट’ असंही म्हणतात. या थिएटर प्रकारचे जनक अगस्टा बॉल मानले जातात. याच थिएटर प्रकाराचा वापर महोत्सवातील ‘हॅक सेकोयान’ लिखित दिग्दíशत ‘अ‍ॅट अ डेड एन्ड् इन दी ओपन सी’ या आम्रेनिया भाषेत झालेल्या नाटकाने केला.

या नाटकात आम्रेनिया व तुर्की यांच्यातील सामाजिक समस्यांचे उपरोधिक दर्शन घडते. हे एका नावेतील दोन प्रवासी एकमेकांमधील मतभेदांमुळे बोटीतही एकमेकांसाठी सीमारेषा आखून घेतात आणि या मतभेदाचा शेवट दोघांच्याही ‘मृत्यू’मध्ये होतो. तिथल्या सामाजिक परिस्थितीवर उपरोधिक भाष्य करणारे आणि नकळत आपल्या सामाजिक परिस्थितीसाठी सूचक असे हेही नाटक प्रेक्षकांनी उचलून धरले.

‘‘माणूस या जगात माणूस म्हणून का जगू शकत नाही? त्याला जगण्याकरिता जात, पात, धर्म यांचा आधार का घ्यावा लागतो?’’ असा प्रखर सवाल उपस्थित करणारा, शरणकुमार िलबाळे यांच्या आत्मकथानावर आधारित, लोकेश जैन लिखित आणि दिग्दíशत  ‘अक्करमाशी’ हा एकपात्री प्रयोग या महोत्सवात सादर झाला.

‘अक्करमाशी’ म्हणजे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेला वर्ग. या शब्दाचा वापर शिवीसारखादेखील केला जातो. मागासवर्गीय असल्यामुळे सगळ्या सोयी सुविधांपासून वंचित ठेवला गेलेला, सतत अन्याय सहन करावा लागणारा, आपल्या हक्कांसाठी सतत भांडावं लागणारा सोशिक समाज. याच समाजाचं प्रतिनिधित्व करणारा नट समाजातील माणसांच्या घृणास्पद विचारधारेचा तिरस्कार करतो आणि नाटक बघणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळवतो. नाटकाचे नेपथ्य आणि प्रोजेक्टारच्या साहाय्याने प्रोजेक्ट होणारी विविध पेंटिंग्ज या नाटकाची प्रमुख आकर्षणे होती. एकंदर विषय, अभिनय, सादरीकरण, नाटकाची भाषा आणि सूचक पेंटिंग्ज या सर्वामुळे नाटक प्रेक्षकांच्या आवडीच्या यादीत उतरले.

संपूर्ण नाटय़महोत्सात उजवे ठरलेले आणि सगळ्याच प्रेक्षकांचे मन हलवून टाकणारे नाटक म्हणजे दारिओ फोलिखित, अरिवद गौड दिग्दíशत आणि अस्मिता थिएटर ग्रुप, नवी दिल्ली या संस्थेतर्फे सादर झालेले ‘ए वुमन अलोन’. आजच्या समाजातील स्त्रियांनी रूढी परंपरांची चौकट तोडून अन्यायाविरुद्ध लढा दिला पाहिजे हा या नाटकाचा मुख्य आशय. ज्या गोष्टी समाजात सहज बोलल्या जात नाहीत त्या गोष्टी सहज या नाटकाद्वारे प्रेक्षकांसमोर आणल्या गेल्या. नाटकाची भाषा प्रौढत्वाकडे झुकणारी असली तरीही तितक्याच गांभीर्याने हाताळली गेली. नाटक ‘ब्लॅक कॉमेडी’ या प्रकारात मोडत होते. अभिनेत्री शिल्पी मारावा हिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. नाटकाच्या शेवटी टाळ्यांचा कडकडाटाने नाटय़गृह दुमदुमलं.

नाटकाची आणखी एक खासियत म्हणजे नाटक संपल्यावर नाटक चच्रेसाठी खुलं करण्यात आलं होतं आणि त्यात प्रेक्षकही आनंदाने सहभागी झाले. स्त्रीवरच्या अन्यायाला नाटक वाचा फोडत असल्याने हे नाटक इथे संपत नाही तर इथून सुरू होते, असे वक्तव्य नाटकाच्या दिग्दर्शकांनी प्रेक्षकांशी संवाद साधताना केले. नाटकाचे नेपथ्य, नाटकाची प्रकाशयोजना हे दोन्ही स्त्रीची मनोवस्था दर्शवणारे होते.

महोत्सवातील शेवटचे नाटक म्हणजे ‘मंडाला ग्रुप, नेपाळ’ या संस्थेद्वारे सादर झालेले, सुलक्षण भारती लिखित आणि दिग्दíशत ‘बोक्शिको घर’(चेटकिणीचे घर). हा नेपाळमधील समस्त स्त्री वर्गाच्या अवस्थेचे विदारक चित्रण करणारा एकपात्री प्रयोग. अभिनेत्री सरिता गिरी हिने स्त्रीला चेटकीण ठरवण्याची समाजातील प्रथा किती चुकीची आणि भीषण आहे हे तिच्या अभिनय कौशल्यातून उत्कटतेने मांडले. नाटकाचे नेपथ्य वास्तवदर्शी होते. नाटकाची प्रकाशयोजना प्रेक्षकांना एका वेगळ्याच, थरारक अनुभूतीत घेऊन जाणारी होती.

मेत्ता म्हणजे मैत्रीचे बंध. ‘मेत्ता आंतरराष्ट्रीय नाटय़महोत्सव’ नावाप्रमाणेच नाटय़प्रेमींमध्ये मत्रीचे, सलोख्याचे संबंध निर्माण करणारा ठरला.

मान्यवरांची उपस्थिती

महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागमंत्री राजकुमार बडोले, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, ज्येष्ठ नाटककार कमलाकर सोनटक्के, श्रीलंका दूतावासाच्या सरोजा सिरिसेना, ज्येष्ठ नाटककार व दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीकला हत्तंगडी, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे आणि मुंबई विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. एम्. ए. खान इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
ऋतुजा फडके – response.lokprabha@expressindia.com