‘मेक इन इंडिया’चे अपरिहार्य असे पुढचे पाऊल म्हणजे ‘स्किलिंग इंडिया’. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशात कौशल्य विकसित करण्यावर फारसा भर दिला जात नाही, असे चित्र आहे. ते बदलण्याची गरज ‘स्किलिंग इंडिया’शी संबंधित मुंबईत नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी मांडली.

आपल्या पंतप्रधानांनी ‘मेक इन इंडिया’च्या वाटचालीत एक मोलाचे पाऊल उचलत ‘स्किलिंग इंडिया’चा (कुशल भारत) नारा दिला खरा,  परंतु या घोषणेपेक्षाही त्याची पूर्तता करणे हे शिवधनुष्य पेलण्याइतकेच मोठे कार्य आहे.

New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
BJP using social media influencers for election campaign Lok Sabha elections 2024
निवडणूक प्रचारात इन्फ्लूएन्सर्सची एंट्री; भाजपाची काय आहे क्लृप्ती?
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?
cashew farmer marathi news, konkan farmer marathi news
काजू वायदे : कोकणातील उत्पादकांना वरदान

स्किलिंग इंडियाची खरोखर गरज काय, याचा विचार केला तर असं लक्षात येतं की कौशल्यपूर्ण कारागीर मिळवणे ही कोणत्याही उद्योजकासाठी खूप मोलाची बाब असते, बऱ्याचदा उत्तम कारागिरांअभावी अनेक उद्योग नामशेष झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. ज्या प्रमाणात सध्या भारतीय बाजारपेठ आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी खुली होत जाईल तसतशी अधिकाधिक कौशल्यपूर्ण कारागिरांची आवश्यकता वाढत जाणार आहे. आपल्याकडे नेमका याच गोष्टीकडे कानाडोळा केला गेला आणि त्याचे परिणाम स्वरूप आपल्याकडे काम करायला एकाहून एक सरस असे इंजिनीयर आणि मॅनेजर भरपूर आहेत; पण कुशल कारागिरांची वानवा आहे. हीच गरज ओळखून महाराष्ट्र सरकारनेदेखील कौशल्य विकासाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. तीन जून रोजी ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई’ तर्फे सर्व उद्योजकांसाठी एक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ज्याद्वारे सरकारचे स्किलिंग इंडियाचे प्रयत्न आणि त्याला आवश्यक असणारी उद्योजकांची साथ हा दुवा जोडता येऊ शकेल. या मुद्दय़ाबाबत महाराष्ट्राचे औद्योगिक आणि कौशल्य विकास अधिकारी दीपक कुमार म्हणाले की  येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात ४५ लाख लोकांना कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत सहभागी करून त्यांचा विकास करणे हे उद्दिष्टय़ ठेवून राज्य सरकार कार्य करत आहे. हा मुद्दा मांडताना त्यांनी भारताची तुलना कोरियासारख्या देशांशी केली.  कोरियात जवळपास ९६ टक्के लोकांना काही ना काही कौशल्य अवगत आहे तर भारतात तीच संख्या अवघी चार टक्केआहे, यावरून आपल्याला कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत किती प्रगतीची आवश्यकता आहे याची जाणीव उपस्थित मोठमोठय़ा उद्योजकांना करून दिली.

दीपक कुमार यांनी सांगितलेली ही आकडेवारी कितीही बोलकी वाटली तरी नीट विचार करताना भारत आणि कोरिया यांची लोकसंख्या विचारात घेता ही तुलना योग्य वाटत नाही, त्यासाठी चीन हे योग्य उदाहरण ठरेल, परंतु ज्याप्रमाणे भारताने उत्तम संयोजक आणि इंजिनीयर घडविण्यावर भर दिला तसाच चीनमध्ये आजवर फक्त कुशल कारागीर निर्माण करण्यावर भर देण्यात आलेला होता, त्यामुळे चीनमध्ये आता कुशल संयोजकांची वानवा भासते आहे. त्यामुळे जसे भारतात आता कौशल्य विकासावर भर दिला जातोय तसाच चीनमध्ये उत्तम संयोजक, इंजिनीयर आणि वरच्या फळीत काम करू शकणारी फळी घडविण्याकडे लक्ष दिले जात आहे. तसे पाहता भारत फार मागास नाही. फक्त आता होणारे काम हे योग्य कार्यसूत्रींवर आधारित आणि सर्व लोकसहभागातून होणे आवश्यक आहे. दीपक कुमार यांनी महाराष्ट्रातील विविध उद्योजकांना पुढाकार घेऊन या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले व त्यासाठी सरकारतर्फे पुरविण्यात येणाऱ्या विविध योजनांचीही यादी सांगितली. यात भारत फोर्जतर्फे घेण्यात आलेला पुढाकार खरोखर वाखाणण्याजोगा आहे. त्यांनी कुशल कारागीर घडविणाऱ्या आयटीआयसारख्या संस्थांपकी पुण्याजवळील आयटीआय आपल्या अधिपत्याखाली घेतली आणि  त्यासाठी आपल्या आवश्यकतेनुसार अभ्यासक्रम राबवून कुशल कारागिरांची निर्मिती केली आणि त्यांना स्वत:च रोजगार उपलब्ध करून दिला. यामुळे सरकारचे धोरण आणि कंपनीची भरभराट दोन्ही गोष्टी शक्य होऊ शकल्या. नेमकी हीच मेख ओळखून टाटा उद्योग समूहानेदेखील लोणावळ्याजवळील आयटीआय आपल्या अधिपत्याखाली घेतले आहे. शिवाय कौशल्य विकास कार्यक्रमात बरीच मोठी गुंतवणूक केल्याचे दीपक कुमार यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित असलेले गोव्याचे औद्योगिक मंत्री महादेव नाईक यांनीही प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे महत्त्व उपस्थितांना सांगितले व गोव्यामध्ये त्यांनी राबविलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमांची माहिती दिली. त्यानंतर जम्मू काश्मिरमध्ये यशस्वी झालेल्या ‘उडान’ कार्यक्रमाचे प्रमुख वागिश शर्मा व  नॅशनल एक्रिडेशन समितीचे अध्यक्ष जगमोहन भोगल यांनीही फक्त कौशल्य विकास व त्याचे प्रमाणपत्र देऊ शकणाऱ्या संस्थांपेक्षा उत्तम कार्यरत असणाऱ्या संस्थांचा आग्रह धरला. या साऱ्यांसोबतच आपल्याला आपली मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे जगप्रसिद्ध मनोविकास प्रशिक्षक सुनील पारेख यांनी सांगितले. आपल्याकडच्या लोकांच्या मानसिकतेबद्दल सांगताना वेल्डरचे उदाहरण घेता येईल. वेिल्डगचे प्रशिक्षण घेऊन एक कारागीर फार फार तर दहा हजार रुपये महिना कमावू शकतो, असा आपला समज असतो आणि म्हणूनच वेिल्डगच्या कामाला आणि कारागिराला फारसे महत्त्व दिले जात नाही; पण एक कुशल वेल्डर मोठय़ा कंपनीमध्ये काम करत असेल तर २०-२५ हजार रुपये महिना सहज कमावतो, हाच वेल्डर जर पेट्रोलियम कंपनीत काम करत असेल तर त्याचा पगार महिना ७० ते ८० हजार रुपये असतो आणि तोच कुशल वेल्डर गॅस वेल्डिंगचे काम करीत असेल तर त्याला सुमारे दीड ते दोन लाख रुपये महिना इतका पगार मिळतो. यात कोणतीही अतिशयोक्ती नाही. परंतु वेल्डर या नावानुसार त्याची प्रत आणि प्रतिष्ठा ठरविणारी आपली मानसिकता बदलली तर आणि तरच कुशल भारत उभारणीचा हा पंतप्रधानांनी घेतलेला वसा कुठेतरी सफल होताना दिसू शकतो यात नक्कीच दुमत नाही.
प्रशांत जोशी – response.lokprabha@expressindia.com