प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट अमित दिवेकर आजपासून तुमच्या स्टायलिंगविषयीच्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. ‘NIFT’मधून फॅशनचं प्रशिक्षण घेतलेल्या अमित यांनी देशविदेशात अनेक फॅशन शोज्साठी आणि इव्हेंट्ससाठी डिझायिनग केलं आहे. हॉलिवूड सेलेब्रिटींसाठीही त्यांनी डिझायनिंग केलंय. ‘हॅपी जर्नी’सारख्या मराठी चित्रपटाची वेशभूषा त्यांनी केली आहे. पॉपस्टार शकिरा तसंच हॉलीवूड अभिनेत्री केट ब्लँकेट यांच्या रेड कार्पेट लुकसाठी डिझाइन करण्याची संधीदेखील त्यांना मिळाली होती. अमीत यांना विचारण्याचे फॅशनविषयीचे प्रश्न viva@expressindia.com या मेलवर पाठवा.
हाय! मी मधुरा. मी २२ वर्षांची असून गव्हाळ वर्णाची आहे. माझी उंची ५ फूट ४ इंच आणि वजन ५२ किलो आहे. मी आयटी कंपनीत नोकरी करते. कंपनीत विशिष्ट ड्रेसकोड नसल्याने, सामान्यत: मी ऑफिसमध्ये सेमीफॉर्मल्स वापरते. मला शोभून दिसतील असे काही स्टायलिश आणि डीसेंट फॉर्मल वेअरचे पर्याय आपण सुचवू शकाल का?
हाय मधुरा,
फार चांगला प्रश्न आहे तुझा. खरं सांगायचं तर, आपल्यापैकी प्रत्येकालाच, ऑफिसमध्ये स्मार्टही दिसायचं असतं आणि सोबरही. तेव्हा यासाठी विचारपूर्वकच ड्रेसिंग निवडायला हवं. तू दिलेल्या वर्णनावरून समजतंय की, तू छान उंच आहेस, वजनही ओके आहे. बरं, स्किन कॉम्प्लेक्शन म्हणशील तर, तुझ्यासारख्या गव्हाळ वर्णाला जवळजवळ सर्वच रंग सूट करतात. सो तू खूपच लकी आहेस या बाबतीत नाही का? आता फॉर्मल वेअरमधल्या ऑप्शन्सबद्दल बोलायचं तर, आपल्याकडच्या उष्ण, दमट हवामानामुळे, आपल्याला बरेच फॉर्मल वेअरचे प्रकार घालताच येत नाहीत. म्हणजे हेच बघ ना, ब्लेझर आपोआप बाद होतं. कपडय़ांचं लेअरिंग (जसे थ्रीपीस किंवा टूपीस सूट, जॅकेट, कोट वगैरे) असल्या पर्यायांचा आपण फार कमी वापर करतो. मला विचारशील तर तुझ्यासाठी, सुती किंवा लिनन मटेरियलचे शर्ट्स हा उत्तम ऑप्शन आहे. हे कपडे आरामदायीही असतातच, शिवाय एलीगन्ट लुकही मिळवून देतात. ट्राऊझर्स आणि असे शर्ट हे बेस्ट पॉसिबल फॉर्मल वेअर कॉम्बो आहे.
कपडय़ांच्या रंगांबद्दल सांगायचं तर पांढरा, मंद गुलाबी, हलका निळा, खाकी, बेज, ग्रे हे मंद रंग आणि गडद रंगांमध्ये नेव्ही ब्लू, मरून या रंगसंगतीतले कपडे तुला शोभून दिसतील; पण फॉर्मल वेअरच्या फिटिंगची विशेष काळजी घ्यायला हवी. शर्ट्स किंवा टॉप्स, ढगळ असण्यापेक्षा, अंगासरशी बसणारे हवेत. शिवाय शर्ट किंवा टॉप्सच्या स्लीव्हज आवडीप्रमाणे हाफ किंवा थ्रीफोर्थ नाहीतर फुल ठेवायला हरकत नाही. तसंच फॉर्मल पँट किंवा ट्राऊझरसुद्धा अंगासरशी बसणारीच हवी. यामुळे तुझा शेलाटा बांधा, उंची उठून दिसेल. आणखी एक पर्याय म्हणजे, ट्राऊझरऐवजी तू फिटेड, फॉर्मल स्कर्ट्सही ट्राय करू शकतेस. हे कॉम्बिनेशनही ग्रेसफुल दिसेल. गरज वाटलीच तर नाजूकसा बेल्टही वापरता येईल.
पादत्राणांचा विचार करायचा तर, महत्त्वाची गोष्ट म्हणजे या फॉर्मलवेअरसाठी टाचा झाकल्या जातील असे शूज वापरणं चांगलं. क्लोज्ड हील्स शूज उत्तम. हील्स किंवा फ्लॅट्स दोन्ही ट्राय करायला हरकत नाही. हा फॉर्मल लुक परिपूर्ण होण्यासाठी आटोपशीर आकाराची लेदर बॅग मात्र घ्यायला विसरू नकोस. सो मधुरा, इतक्या टिप्स मिळाल्यावर, तुला स्टायलिंगचं समाधानही  मिळेल आणि स्टायलिश लुक तर नक्कीच मिळेल. सो यू आर रेडी टू गो.
अमित दिवेकर
अनुवाद – गीता सोनी

Kharge on narendra modi
“मोदींनी तरुणांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले”, मल्लिकार्जुन खरगेंचे पंतप्रधानांवर गंभीर आरोप; काय म्हणाले?
Somalias Pirates Stock Market in Harardhere
वित्तरंजन : भांडवली बाजारच; पण कुणाचा?
Why stress test of mutual fund is important
तुमच्या म्युच्युअल फंडाची स्ट्रेस टेस्ट काय सांगते? म्युच्युअल फंडाची स्ट्रेस टेस्ट महत्त्वाची का?
Prime Minister Narendra Modi
उच्चशिक्षितांना पंतप्रधान मोदींची भुरळ? इकॉनॉमिस्टचा लेख