vv10एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. कॉलेज प्रेझेंटेशनमध्ये, इंटरव्ह्य़ूमध्ये किंवा हायफाय पार्टीमध्ये इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा कॉलम..

अगदी अलीकडे एक मस्त पोस्ट वाचनात आली. ‘प्रतिक्रिया तर मी पण एक नंबर देऊ शकतो, पण स्पेलिंगचं अज्ञान आड येतं’. असं होतं ना कधी कधी, की फेसबुकवर किंवा अन्यत्र कुठं झक्कास एखादी पोस्ट वाचल्यावर फडफडीत इंग्रजीत प्रतिक्रिया द्यावीशी वाटते. पण स्पेलिंग चुकेल या भीतीने Nice, Great  यावर समाधान मानावं लागतं. स्पेलिंग चुकायची जशी भीती वाटते ना, अगदी तश्शीच भीती वाटते उच्चाराची. पार्टीजमधला असाच एकदम डेंजरस शब्द म्हणजे (Cuisine) कुझिन.
या शब्दाचं स्पेलिंगच असं आहे की, त्या  गुंडाळलेल्या नुडल्स सुटल्यावर कशा लांबच लांब होत जातात तसेच या शब्दाच्या उच्चाराची भेंडोळी पण हैराण करतात. पहिलंच Cui येतं. त्यामुळे ‘क्यूझिन’, ‘कुझीन’ की ‘सुझिन’ की आणि काही? पुढे sine  सिन की जीन की झिन की झाईन की झिने? ही भेंडोळी पार चक्रावून टाकतात आणि त्यामुळेच क्यूसिन, क्युझाईन, क्युसीन, क्यूझिन, कुसिने असे या शब्दाचे अनेक अवतार पृथ्वीतलावर अवतरले आहेत.
पण मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की, या शब्दाबद्दल चक्क गोऱ्या सायबाचं म्हणजे ब्रिटिशांचं आणि अमेरिकन खवय्यांचं एकमत आहे. दोन्हीकडे इंग्रजांच्या आणि अमेरिकनांच्या इंग्रजीत या शब्दाचा उच्चार अगदी सेम टू सेम आहे- कुझिन. फक्त अमेरिकन उच्चारात झी दीर्घ करून त्याला अधिक रेंगाळायला लावलंय. काही असो या शब्दाच्या बाबतीत दोन वेगळे उच्चार लक्षात ठेवायचा ताप नाही हे सगळ्यात महत्त्वाचं.
आता कुझिनबद्दल इतकं लिहिल्यावर त्याच्या अर्थाकडे थोडं वळायला हरकत नाही. खवय्यांना वेगळं सांगणे न लगे. इटालियन कुझिनपासून आपल्या मालवणी कुझिनपर्यंत सगळ्या पदार्थाचा आस्वाद त्यांनी एव्हाना नक्की चाखून झाला असेल. तोसुद्धा उच्चारांच्या भानगडीत न पडता. कुझिन म्हणजे अत्यंत छान पद्धतीने सव्‍‌र्ह होणारं जेवण. मग उडिपी हॉटेलात मागवलेली थाळी म्हणजे कुझिन का? नो बॉस! एलिगंट अ‍ॅटमॉस्फिअर, तरंगायला लावणारं संगीत, चकचकीत डायिनग हॉल असा थोडा हायफाय मामला कुझिनच्या वातावरणनिर्मितीसाठी लागतो. शिवाय त्यापेक्षा महत्त्वाचा अर्थ म्हणजे विशिष्ट प्रांत, विशिष्ट प्रदेशाच्या खासियतीसह तयार होणारं. कुझिन म्हणजे असं जेवण, ज्याचा अस्सलपणा कायम असतो व ते आकर्षक रूपात खवय्यांपुढे मांडलं जातं. मूळचा हा लॅटिन शब्द फ्रेंचांकडून व्हाया ब्रिटिश आपल्याकडे आला.
चला तर मग, आता उच्चाराचा टोटल गोंधळ निस्तरला ना? तो भाई, पार्टीवार्टी जाके बिनधास्त बोल देना Have you tried italian कुझिन of this place? जरूर ट्राय करना!
रश्मी वारंग -viva.loksatta@gmail.com
   

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Loksatta editorial Today marks the 40th anniversary of India successful Siachen Digvijaya campaign Operation Meghdoot
अग्रलेख: सियाचीनचा सांगावा..
How to improve Cibil score tips to increase
‘सिबिल’ स्कोअर कसा सुधाराल?
insta facebook shaheed word ban
इन्स्टाग्राम, फेसबुकवर शहीद शब्द लिहिण्यावर बंदी? का झाला असा निर्णय?