झळाळणाऱ्या कोटी ज्योती, हीच तर दिवाळीची खरी ओळख. अंधकाराला उजळवून टाकणाऱ्या या ज्योतींमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं सामथ्र्य असतं. अर्थातच दिवाळीच्या शॉपिंगमध्ये पणत्या, दिवे यांचं स्थान अगदी अढळ आहे. दरवर्षी काय नवीन घेणार, असं म्हणत आपण दरवर्षी viv24 काही ना काही नवीन बघतोच आणि ते घेण्याचा मोहही होतोच. पूर्वी दिवाळीपूर्वी कुंभारवाडय़ात जाऊन मातीच्या पणत्या घेण्याची पद्धत होती. तिथून आणलेल्या पणत्या आधी पाण्यात भिजवून ठेवाव्या लागतात. मग त्या उन्हात कडकडीत वाळवायच्या आणि मगच वापरायच्या.
अजूनही काही हौशी मुलीकुंभारवाडय़ात चक्कर मारतात. तिथल्या मातीच्या पणत्या खरेदी करतात त्या घरी येऊन सजवण्यासाठी. हल्ली अशा डिझायनर पणत्या लावण्याचा ट्रेण्ड आहे. या मातीच्या पणत्यांना रंगीबेरंगी रंगात रंगवलं जातं; त्याला आरसे, मोती आणि कुंदननं सजवलं जातं. अशा रेडीमेड डिझायनर पणत्याही बाजारात मिळतात; पण त्या घरी रंगवण्याची गंमत काही औरच असते. या पणत्यांमध्ये दीपमाळ, झुंबर, समई आणि पंचारतीच्या डिझाईनच्या पणत्यांना मागणी आहे.

हँगिंग दिया आणि मॅजिक लँप
डिझायनर पणत्यांमध्ये सध्या ‘हँगिंग दिया’ हा नवीन प्रकार दिसतो आहे. मातीच्या झुंबरासारखा हा प्रकार हवं तर पणतीवर झाकून मोठय़ा रांगोळीच्या मधोमध ठेवून त्याची शोभा वाढवू शकतो.
किंवा सरळ वरती टांगून त्याचं झुंबर होऊ शकतो. दोनशे-अडीचशे रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत याच्या किमती आहेत. दुसरा प्रकार दिसतो आहे वेगवेगळ्या आकारांच्या पणत्यांचा. फुलं-पानांच्या आकाराच्या पणत्या, पंचारतीच्या स्वरूपातल्या पणत्या गेली काही र्वष बाजारात आहेत; पण यंदा या आकारांमध्ये अनेक नवे भौमितिक आकार बघायला मिळत आहेत. याशिवाय मासा, कासव, पक्षी, एवढंच नाही तर बेडकाच्या आकारातही मातीचे दिवे यंदा दिसू लागले आहेत. यातले अनेक दिवे दुकानदार ‘मॅजिकल दिया’ म्हणून विकतात. म्हणजे मातीच्या दिव्याच्या बेसला तेल viv25घालण्यासाठी एक छिद्र असतं आणि वात लावायला वरच्या बाजूला वेगळं छिद्र दिलेलं असतं. दिवा उलटा करून पहिले त्यामध्ये तेल ओतायचं आणि मग तो सरळ करून वात घालायची. आश्चर्य म्हणजे पणतीची रचना अशी केलेली असते की, दिवा सरळ केल्यावर छिद्रातून तेल अजिबात गळत नाही. वातीला वरच्या बाजूला मात्र तेल मिळतं. बराच काळ चालणारा हा ‘मॅजिकल दिया’ त्यामुळे अनेकांचं लक्ष वेधून घेतोय. हे झालं पारंपरिक मातीच्या पणत्यांबद्दलचं; पण हल्ली दिवाळीनिमित्त एकमेकांना भेट म्हणून आकर्षक मेणबत्त्या, मेणपणत्या देण्याचीही पद्धत रूढ होत आहे.

डिझायनर कँडल्स

दिवाळीत खरं तर परंपरेने तेलाच्या पणत्या लावायची प्रथा; पण आता वापरायला सोप्या मेणपणत्या त्यांची जागा घेऊ लागल्या आहेत. मोठय़ा रांगोळ्यांमध्ये सजवायला आणि दीपोत्सवांमध्ये हमखास अशा मेणपणत्या दिसतात. पण तरुणाईला खरं वेड लावलंय डिझायनर कँडल्सनी. वेगवेगळ्या आकारांच्या आणि डिझाईन्सच्या या रंगीबेरंगी मेणबत्त्या खरं तर भारताबाहेरही प्रसिद्ध आहेत. युरोप-अमेरिकेत किंवा दुबईसारख्या शॉपिंग डेस्टिनेशन्समध्येही गिफ्ट सेक्शनमध्ये गेलात तर फेस्टिव्ह कलेक्शनच्या बॅनरच्या खाली या डिझायनर कँडल्स हमखास दिसतात. आकर्षक पॅकेजिंग हे या डिझायनर कँडल्सचं वैशिष्टय़. काचेच्या आकर्षक बाटल्यांमध्ये रंगीत मेण ओतून केलेल्या कँडल्स तर लक्षवेधी दिसतात. या कँडल्समध्ये सुगंधी द्राव टाकून सेंटेड कँडल्सही तयार करण्यात येतात. याशिवाय फ्लोटिंग कँडल्स, टी लाइट्स, हँगिंग कँडल्स असेही प्रकार लोकप्रिय होत आहेत. बोरोसिल कंपनीनं बोरोसिलिकेट प्रकारची काच वापरून आकर्षक दिवे बाजारात आणले आहेत. ही काच तापत नाही. त्यामुळे जास्त वेळ दिवा असला तरी काचेला हात लागून भाजण्याचा संभव नसतो. मॉलमधल्या ‘होम डेकॉर’ भागात चक्कर मारली तर असे किती तरी नवीन दिव्यांचे प्रकार दिसतील.