इ कॉमर्स क्षेत्रातील उद्योजिका, एम टीव्हीची डायरेक्टर, सेलेब्रिटी मॅनेजर, फॅशन जर्नालिस्ट असे तिच्या करिअरचे अनेक आयाम आहेत. करिअरमधल्या या प्रत्येक टप्प्यावर मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर आज ही करिअर वुमन ‘सेलेब्रिटी ब्रॅण्ड वुमन’ झाली आहे. तिचं नाव आहे - प्रीता सुखटणकर.या ब्रॅण्ड वुमनला भेटण्याची, तिच्याशी संवाद साधायची संधी व्हिवा लाउंजच्या निमित्ताने येत्या मंगळवारी मिळणार आहे. प्रीता सुखटणकर ‘द लेबल कॉर्प’ या कंपनीची संचालिका आहे. या तरुण उद्योजिकेने करिअरच्या सुरुवातीला फॅशनविषयक साप्ताहिकात काम केलं. त्यानंतर एम टीव्हीसाठी कार्यक्रम संहिता लिहिता लिहिता ती डायरेक्टर बनली आणि त्यानंतर सुरू झाला सेलेब्रिटी मॅनेजमेंटमधला प्रवास. नव्या उद्योगाचा गंध याच कामातून लागला. भारतात सेलेब्रिटी ब्रँडिंगचा व्यवसाय पहिल्यांदा सुरू करण्याचं श्रेय प्रीताला जातं. ‘द लेबल कॉर्प’अंतर्गत बिपाशा बसू, सुझ्ॉन रोशन-खान आणि मलाइका अरोरा खान यांचे ब्रॅण्ड प्रीताने सुरू केले आहेत. या व्हर्सटाईल करिअर वुमनला प्रत्यक्ष भेटायची संधी मंगळवारी मिळणार आहे. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर प्रवेश मिळेल.कधी : मंगळवार, २२ जुलैकुठे : स्वा. सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, दादर, मुंबईवेळ : दुपारी ३.३०