‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायाचा आठवावा प्रताप’ – खरं तर समर्थ रामदासांनी रचलेले हे शब्द आजच्या पिढीनं ते शब्दश: अंगीकारल्याचं दिसतं. तरुण मुलांच्या अ‍ॅक्सेसरीजचा विचार केला, तर त्यात निर्विवादपणे शिवरायांच्या रूपाचा प्रभाव सध्या दिसतोय. आता पावसाला सुरुवात झाल्यावर सह्य़ाद्रीत ट्रेकिंगला जाणाऱ्या तरुणाईलाही उधाण आलंय आणि त्यासोबत शिवरायांबद्दलच्या आदराचं प्रतीक म्हणून तरुणाई शिवरायांची राजमुद्रा गळ्यात किंवा अंगठीच्या रूपाने बोटात मिरवू लागली आहे. गड-किल्ले आणि त्यांच्या रूपाने मिळालेला ऐतिहासिक- सांस्कृतिक वारसा याबाबत आजच्या तरुणाईमध्ये जागरूकता निर्माण झाली आणि त्यांच्या संवर्धनासाठी त्यांची पावले उठू लागली. त्यापाठोपाठ शिवरायांच्या नावाचे पेण्डंट, त्यांच्या प्रतिमा गळ्यात घालून मिरवण्याचाही ट्रेण्ड आला आहे. त्यातही राजमुद्रा आघाडीवर आहे. राजमुद्रा म्हणजे जणू शिवरायांच्या प्रति असणाऱ्या आदराचं आणि प्रेमाचं प्रतीक. म्हणूनच ते विविध स्वरूपांत मुलांच्या अंगाखांद्यांवर दिसू लागलं आहे. विविध बोटांमध्ये दिसणाऱ्या अंगठीवर ‘प्रतिपच्चन्द्रलेखेव..’चे कोरीव शब्द हल्ली सर्रास दिसतात. अंगठीप्रमाणेच रुद्राक्षाच्या माळेत किंवा काळ्या माळेतही राजमुद्रा विराजमान झालेली दिसते. हे असं काही गळ्यात घालून भाळी चंद्रकोर लावणारे तरणे ट्रेकर यामुळे एक रांगडा लुक आल्याचं सांगतात.
शिवाजी महाराजांच्या नावाशी, त्यांच्या रूपाशी निगडित काही गोष्टी शोधत असताना फेसबुकवर SM Creatives चं एक पेज नजरेस आलं. राजमुद्रेपासून प्रेरणा घेऊन बनवलेल्या क्रिएटिव्ह गोष्टी यावर दिसल्या. पुण्यातील शैलेश मोलक नावाचा एक तरुण हा ट्रेण्ड रुजवण्याचा प्रयत्न करतोय. महाराजांचा फोटो असलेलं मोबाइल स्टिकर, की-चेन, टी-शर्ट्स अशा अनेक वस्तू तो बनवून देतो. शिवा राजमुद्रेचं पेण्डण्ट, फ्रेम अशा अनेक गोष्टींतून शिवप्रेम जागवण्याचा त्याचा प्रयत्न दिसतो. अशी आणखीही काही कलाकार महाराजांच्या प्रतिमेतून प्रेरणा घेत वस्तू तयार करीत आहेत.
याला ट्रेण्ड म्हटलं म्हणून काही जणांची नाकं मुरडली जाणार असली, तरी या अशा वेगळ्या पद्धतीच्या क्रिएटिव्हिटीमुळे मराठमोळी संस्कृती राज्याबाहेर पोहोचतेय. एक वेगळी फॅशन मुलांमध्ये रूढ होते आहे, हे नक्की!
14

Dubai Floods Tesla boat-mode? Dubai hit by two years' worth of rain in a single day
Dubai Flood: दुबईच्या महापुरातही टेस्ला गाडीनं केली कमाल; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 
scorching heat
उन्हाच्या झळांनी हापूस आंबा काळवंडला; डाळिंब, द्राक्ष, भाजीपाल्यावर परिणाम
Gold Silver Price
Gold-Silver Price on 23 March 2024: होळीच्या पूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात घसरण, खरेदी करण्याआधी पाहा आजचे दर