दिया मिर्झाच्या लग्नाची कुजबूज गेले कित्येक महिने चालू होती. १८ ऑक्टोबरला दिल्लीमध्ये पारंपरिक पद्धतीने तिचे लग्न झालं. चार दिवसाच्या या लग्नसोहळ्यामध्ये मेहंदी आणि मुख्य लग्नाच्या दिवशी दिया मिर्झाने डिझायनर रितू कुमारने खास डिझाइन केलेले आऊटफिट घातले होते. मेहंदी समारंभाच्या दिवशी तिने पिवळ्या रंगाचा चंदेरी फॅब्रिकमधील अनारकली ड्रेसची निवड केली होती. या ड्रेसबद्दल माहिती देताना डिझाइनर रितू कुमार यांनी सांगितलं, ‘दियाच्या या ड्रेस मागची संकल्पना १५व्या शतकातील आग्य्रातील संस्कृतीवरून घेतली आहे. नेकलाईनवर केलल्या गोटा एब्रॉयडरीमध्ये गोल्ड दोरी आणि तारेचा वापर केला आहे. तर फुशिया रंगाच्या दुपट्टय़ावर गोल्डमध्ये पिटा वर्क केलं आहे.’ दियाने तिच्या लग्नासाठी ‘अवधी स्टाईल’ नववधूच्या जोडय़ाला पसंती दिली. या आऊटफिटमध्ये मुघल काळाची छाप होती. या ड्रेसला कंटेम्परी लूक दिला असला तरी, झरदोसी वर्कमुळे पारंपारिक लूक कायम ठेवला आहे.’ क्रिम कलरच्या या शराराला हिरव्या रंगाच्या एब्रॉयडरीने हायलाईट केले आहे. दिया मूळची हैद्राबादची असल्यामुळे तिने आपल्या लग्नाच्या कपडय़ांमध्ये तो नवाबी लूक होता, हेही त्यांनी यावेळी नमूद केले.