vn26साइज झीरो फिगरविषयी दीर्घकाळापासून वाद आणि चर्चा सुरू आहे. आपले आरोग्य उत्तम आहे हे दाखविण्याचा हा पर्याय योग्य नाही हे आता कळून चुकले आहे. सभोवतालचा असलेल्या दबावामुळे ताणतणावात वाढ झाली आहेच. त्यात अनेकींचा कल साइज झीरो करण्याकडे वाढत आहे. पण असं साइझ झीरोच्या मागे लागण्यापेक्षा वजन घटविण्यासाठी, बारीक होण्यासाठी शास्त्रीय पद्धतींचा वापर करण्याची गरज आहे. फॅट लॉस करण्यासाठी पुढे योग्य तंत्र दिले आहे.
फॅट लॉसच्या टिप्स
* कधीही जेवण चुकवू नका!
* रोज व्यायाम करा!
* प्रोटिन्सचे प्रमाण अधिक ठेवून थर्मोजेनिक इफेक्ट वाढवता येईल. यासाठी सप्लिमेंट्सची गरज भासू शकते.
* व्यायामामुळे तुमच्या शरीरातील स्नायूंचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. स्नायू कॅलरी जाळतात, याचा अर्थ तुम्ही जितके पौंड स्नायू कमावता तितक्या जास्त कॅलरी नष्ट करता आणि त्यामुळे फॅट कमी होण्याचे प्रमाण वाढते.
* कॅलरी ग्रहणात एकाएकी घट करू नका!
* दिवसाच्या कॅलरी ग्रहणात फॅटच्या प्रमाणात २५ टक्क्यांपर्यंत घट करा!
* भूक भागविण्यासाठी फायबर आणि कॉम्प्लेक्स काबरेहायड्रेट्स असलेल्या पदार्थाचा आहारात समावेश करा!
* प्रक्रिया केलेल्या पदार्थामध्ये क्षार आणि फॅट मोठय़ा प्रमाणावर असते, त्यामुळे हे पदार्थ टाळा!
* ताजे पदार्थ खा!
* अन्न तळू नका किंवा तेलाचा किंवा स्निग्धपदार्थाचा वापर अन्न तयार करताना करू नका! त्याऐवजी बेकिंग, ब्रॉइल किंवा मायक्रोवेव्हचा वापर करा!
* पॅकबंद खाद्यपदार्थ विकत घेताना प्रति १०० कॅलरीमागे २ ग्रॅमपेक्षा कमी फॅट आहे, हे पाहा!
* फॅटरहित अन्नपदार्थाचे सेवन करा!
* लो फॅट प्रोटिन पदार्थ खा!
* शरीराला आवश्यक असलेली प्रोटिन्सची गरज भागविण्यासाठी लो फॅट प्रोटिन्सच्या सप्लिमेंट्स घ्या.
* रात्री भूक भागवण्यासाठी अंडय़ाचा पांढरा भाग खा!
* रोज बाहेरचे खाऊ नका! फास्ट फूड खाणे टाळा! अशा खाद्यपदार्थामध्ये फॅट, क्षार आणि कॅलरी मोठय़ा प्रमाणावर असतात.
* भरपूर पालेभाज्या खा!
फॅट लॉस कार्यक्रमाची सुरुवात
एखाद्याच्या फॅट लॉसचे प्रमाण त्याची अनुवंशिकता, शरीराची ढब, चयापचय, आहार आणि त्याचा व्यायाम ठरवतो. एक्टोमॉर्फस (नसíगकपणे बारीक असलेल्या व्यक्ती) शरीरातील फॅट झटकन कमी करू शकतात, पण त्यांना मसल्स कमावण्यात अडचण येते. मिझोमॉर्फसना शरीरातील फॅट कमी करण्यात यश मिळू शकते तर मसल्स मास लवकर वाढवता येते. एन्डोमॉर्फस, यांच्या शरीरात फॅट जास्त असते. पण कमी फॅट असलेला आहार, एरोबिक्स आणि इतर व्यायाम, फॅट कमी करण्याच्या टिप्स आदींचा अवलंब केला तर ते वजन सहज कमी करू शकतात. एन्डोमॉर्फस त्यांच्या आहारातील कॅलरीमध्ये प्रोटिन्सचे प्रमाण २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढवून फायदा मिळवू शकतात.
काहीजण शरीरातील ग्लायकोजन कमी करून साठवलेले फॅट वापरण्यासाठी शरीराला उद्युक्त करणारे जम्प स्टार्ट पद्धती स्वीकारतात. फॅट लॉसच्या पहिल्याच आठवडय़ात काबरेहायड्रेट्स कमी करा. कमी कॅलरी असलेल्या भाज्या खा आणि प्रोटिन्स योग्य प्रमाणात घ्या. यामुळे तुमच्या स्नायूतील ग्लायकोजनचे प्रमाण कमी होऊन वॉटर वेट कमी होईल. यामुळे साठवलेले फॅट जाळण्यास मदत होईल. पहिल्या आठवडय़ात जम्प स्टार्ट डाएट स्वीकारल्यानंतर हळूहळू पुढील ३ आठवडय़ांत काबरेहायड्रेट्स घेण्यास सुरुवात करा. फॅट लॉस करीत असलेल्या व्यक्तीने आठवडय़ातून एकदा आपल्या शरीराच्या संरचनेत काही बदल झाले आहेत का हे तपासून पाहणे गरजेचे आहे, जेणेकरून बॉडी मास कमी न होता चयापचयातील प्रमाण घटणार नाही.
काही वेळा आहारामुळे वजन कमी करण्यात फायदा होत नाही, अशा वेळी गिमिक्स किंवा फॅड डाएटचा वापर केला जातो.
अनेक डाएट फॅड का अपयशी ठरतात?
जर शरीरातील फॅट कमी करण्याकडे लक्ष देऊन मेहनत घ्यायचे ठरविले तर फॅट कमी करण्यात फारशी अडचण येत नाही. पण, ज्या प्रकारे वजन कमी करण्याचे प्रयत्न होतात त्यामध्ये दोष असू शकतो. फॅट लॉस, मसल्स लॉस आणि वॉटर वेट लॉस हे वजन घटविण्याचे गिमिक असू शकतात. या पद्धतींचा अवलंब करून झपाटय़ाने वजन घटवून तुम्हाला हवे तसे शरीर घडवून मिळवू शकते. सहजगत्या हव्या त्या प्रमाणात वजन घटवून चांगले दिसण्याकडे अनेकांचा कल असतो. फॅट गायब करण्यासाठी एखाद्या जादुई गोळी किंवा पदार्थाचीच गरज आहे. अशा प्रकारच्या पद्धती तुमचे वजन कमी करू शकतात, पण नुकत्याच उघडकीस आलेल्या अहवालांतून असे दिसले आहे की अशा पद्धतींचा वापर करून वजन कमी करण्यात ३० टक्केही यश मिळत नाही. कारण या पद्धतींमध्ये दैनंदिन जीवनातील अन्नाचा समावेश होत नाही. तसेच तर्काधारित व्यायामही यात सुचवला जात नाही. यामुळे शरीराची हानी होऊन चयापचयातील दरात घट होते. जेव्हा एखाद्याच्या शरीरातील बॉडी मास कमी होते तेव्हा शरीरातील फॅट कमी होत नाही. अशा प्रकारचे वजन कमी करण्याचे गिमिक टाळा. र्सवकष पद्धतींचा अवलंब करून, तुम्हाला खरोखरचा फिटनेस देईल अशा पद्धती आत्मसात करा ज्या आयुष्यभर साथ देतील.
जान्हवी चितलिया – viva.loksatta@gmail.com
(लेखिका फिटनेस न्यूट्रिशिनिस्ट  आणि  वेट मॅनेजमेंट एक्स्पर्ट आहेत.)