साडी म्हटलं की, दिसते सुंदर पण त्यात अवघडल्यासारखं होतं. अजिबात कंफर्टेबल नसलेली तरीही एलिगंट वेअर असंच तरुणींच्या लेखी साडीचं वर्णन असतं. सणासुदीच्या दिवसात, लग्नकार्यात साडी नेसून मिरवावंसं वाटतं. पण आपली आपण साडी नेसायची म्हटल्यावर नाकी नऊ  येतात. साडीत आपण पाय अडकून पडणार तर नाही ना? आपली साडी सुटणार तर नाही ना? अशा नको नको त्या शंका मनात येतात. साडीचं सौंदर्य ती कशी नेसली आहे त्यावरूनच खुलतं. कितीही महागाची, डिझायनर साडी असली आणि व्यवस्थित नेसलेली नसली तर ती अजिबात चांगली दिसत नाही. साडी नेसताना सगळ्यात महत्त्वाच्या असतात निऱ्या आणि पदर. ते जमलं तरच साडी व्यवस्थित बसते. vn16आता हाच अवघड टास्क सोपा करण्यासाठी स्टिच्ड साडी हा प्रकार रुळायला लागला आहे. अगदी परकर किंवा सलवार घालतो तशी साडी घालायची आणि ओढणी घेतो तसा पदर घ्यायचा की झालं काम! नऊवारी साडय़ा नेसवायला कठीण म्हणून त्या शिवून घेण्याचा ट्रेण्ड मध्यंतरी आला होता. आता पाचवारी साडय़ादेखील शिवून मिळायला लागल्या आहेत. मुंबई- पुण्यात अनेक बुटिकमध्ये हल्ली अशा साडय़ा शिवून मिळतात. अनेक डिझायनर स्टिच्ड साडय़ांचे अनेक प्रकार देऊ लागले आहेत. दादरच्या साडीघरसारख्या पारंपरिक दुकानांमध्येही हल्ली स्टिच्ड साडी मिळते. याशिवाय मॉलमधील बुटिक्समध्येदेखील हा पर्याय दिसून येतो. स्टिच्ड साडय़ांमध्ये आता साडीच्या डिझाइनुसार, प्रकारानुसार ती कशी नेसायची हे ठरवून त्या पद्धतीनेही शिवून घेता येते. सणावाराला सगळ्याच मुली साडी नेसतात पण चरचौघींमध्ये उठून दिसण्यासाठी थोडय़ा वेगळ्या पद्धतीने साडी ड्रेप केली तर नक्कीच फरक पडतो. कोणत्या मटेरिअलची साडी कशा पद्धतीने ड्रेप करावी याच्या काही टिप्स :

सिल्कच्या साडय़ांचे पदर खास काम केलेले असतात. या साडय़ा नेहमीच्या पद्धतीने न नेसता बाजूच्या छायाचित्रात दिसताहेत त्याप्रमाणे नेसल्या तर उठून दिसतात. यात नेहमीप्रमाणे निऱ्या काढून पदराचे शेवटचे टोक खांद्याला जोडले आहे आणि पदर व्यवस्थित सेट करून पायापर्यंत सोडला आहे. यावर रेडीमेड गोल्डन वेस्ट बेल्ट लावला की एक वेगळाच लुक मिळेल. नुकत्याच झालेल्या एका फॅशन शोमध्ये या पद्धतीने साडय़ा नेसवल्या होत्या.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती

स्टिच्ड साडीमध्ये हा प्रयोग करता येईल. वेस्टर्न पद्धतीच्या गाऊनचा याला लुक आहे. बाकी साडी नेहमीप्रमाणे शिवून घ्यायची आणि पदर मात्र कमरेपासून सोडून त्याला साडीचा फील द्यायचा. अशी साडी बनवूनच घ्यायला हवी.

मोठय़ा काठाचा पदर असलेली साडी असेल तर पदर काढताना केवळ काठच दिसेल अशा निऱ्या कराव्यात. ब्लाऊजवरून लाँग जॅकेट घातले तर या साडीला एक वेगळाच गेटअप येईल.

सिल्कची साडी वेगळ्या थोडय़ा वेगळ्या पद्धतीने नेसती येईल. या पद्धतीमध्ये निऱ्या कमी काढायच्या आणि पदर मोठा ठेवायचा. पदर डाव्या खांद्यावरून नेहमीप्रमाणे न सोडता कमरेवरूनच मागच्या बाजूला घेऊन उजव्या खांद्यावरून खाली सोडायचा. ही साडी मराठी आणि गुजराती साडीचं मस्त कॉम्बिनेशन दिसेल.

साडी थोडी सिंथेटिक मटेरिअलची असेल तर या फोटोत दिसताहेत तशा मध्यापासून निऱ्या काढला येतील. नेटचा परकर घालणं आवश्यक आहे. पदरावचं डिझाइन लक्षात घेऊन त्याला सुटेबल असा वेस्ट बेल्ट घातला तर कॉम्बिनेशन एकदम हटके दिसेल.