फेस्टिव्ह वेअर म्हणजे पदर, दुपट्टा, स्टोल, पल्लू सांभाळत राहणं ही कन्सेप्ट मागे पडून आता अधिक सुटसुटीत फॅशन येतेय. यंदा डिझायनर्सनी त्यांच्या फेस्टिव्ह कलेक्शनमध्ये ‘इझी टू कॅरी’ डिझाईन्स  सादर केली आहेत.
एथनिक वेअर, पारंपरिक वेष, फेस्टिव्ह कलेक्शन.. नावं काहीही घेतली तरी डोळ्यापुढे येतात भरजरी साडय़ा, घेरदार अनारकली आणि भपकेबाज घागरे, झुळझुळीत लेहंगा.. या सगळ्या फॅशनमध्ये एक गोष्ट कॉमन असते ती म्हणजे अवघडलेपण. या फेस्टिव्ह वेअरमध्ये कधी कधी मोकळेपणानं वावरणं अवघड होऊन जातं. पण यंदाच्या यंदा फेस्टिव्हल सीझनमधली फॅशन इझी गोइंग आहे. सुटसुटीत आहे. तुम्ही जॉर्जेटऐवजी जर्सी फॅब्रिक वापरायला काही हरकत नाही, अनारकलीची जागा मिनी स्कर्ट घेणार आहे, दुपट्टय़ाऐवजी केप घालायला हवं, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही कदाचित. पण हे केवळ आम्हीच नाही, तर यंदा कित्येक डिझाइनर्स हेच सांगत आहेत. सणांमध्ये पल्लू, दुपट्टे सांभाळत आपण नटूनथटून छान दिसतो, पण त्यामुळे एका कोपऱ्यात बसावं लागतं. त्याऐवजी आपल्या रोजच्या वापरातील काही ‘इझी टू कॅरी’ कपडय़ांच्या वापर जर आपल्याला या सणांच्या वेळेस करता आला तर? हा विचार करून डिझायनर्सनी एक वेगळेच कलेक्शन यावेळी आणले आहे. लॅक्मे फॅशन वीकदरम्यान ते समोर आले. फॅशन वीकमधली कलेक्शन फक्त रॅम्पवरच चांगले दिसू शकतात, प्रत्यक्षात नाही असा आपला समज असतो. हे कपडे प्रत्यक्षात कसे वापरू शकतो याचा हा लेखाजोगा.
केप लेअरिंग : जर तुमच्या प्रिंटेट ट्राउझर्स तुम्हाला इतर कशापेक्षाही जास्त प्रिय असतील, तर त्यांना या फेस्टिव्हल सीझनमध्ये दूर करण्याची काही गरज नाही. केपच्या लेअरिंगनी तुम्ही त्यांना खास फेस्टिव्हल लूक देऊ शकता. पण हा केप शिफॉन, जॉर्जेट अशा शिअर फॅब्रिकचा असला पाहिजे. या केप्समुळे सिंपल क्रॉप टॉपसोबत घालू शकता आणि तुम्हाला अ‍ॅक्सेसरीज वापरायची गरजही पडणार नाही. तुमच्या प्रिंटेड ड्रेसवरसुद्धा हे केप वापरून एक छान लूक देऊ शकता. पण हे केप्सचा रंग तुमच्या ड्रेसमधील एखादा बोल्ड रंग असेल याची खातरजमा नक्की करा. एम्ब्रोयडर केप तुम्हाला प्लेन ड्रेसवर घेता येऊ शकतो.
इझी वेअर ड्रेसेस : जर्सी फॅब्रिक आणि कॅज्युअल लूक असलेले ओव्हर साइज टी-शर्ट्स, स्वेटर्स सध्याच्या सीझनमध्ये हिट असणार आहेत. या टी-शर्ट्ससोबत घागराज्, टाइट लेगिंग्स आणि दुपट्टा वापरून नेहमीच्या सलवार कमिज लूकला फाटा देऊ शकता. पण यामध्ये रंगांमध्ये जास्त प्रयोग न करता मिक्स अँड मॅचचा फॉम्युला लक्षात असू द्यात. नाहीतर तुमचा लूक पूर्णपणे चुकण्याची शक्यता आहे. मॅट कॉपर, गोल्ड शेडचा वापर तुम्ही यावेळी करू शकता. नेहमी कॉलेजला जाताना तुम्ही ओव्हरसाइज टी-शर्ट्स आणि स्कर्ट घालत असालच ना, त्याचंच पुढचं पाऊल आहे, हे असं म्हणायला हरकत नाही. मेटॅलिट शेड्समधील स्कर्ट किंवा एम्ब्रॉयडर शर्ट्सचा पर्यायही आहेच.
साडय़ांमध्ये वैविध्य : नेहमीची साडी नेसण्यापेक्षा यंदा साडी नेसण्याच्या प्रकारामध्ये थोडा बदल करून बघा. सध्या यु टय़ूबवर साडय़ा नेसण्याच्या विविध प्रकारावर व्हिडीयोज उपलब्ध आहेत. त्यातील एक पद्धत नक्कीच यंदा ट्राय करा. धोती साडी हा यातीलच एक प्रकार आहे. त्याचप्रमाणे साडी नाही, तर कमीत कमी ब्लााऊजच्या प्रकारात तर नक्कीच बदल आणू शकता. शर्ट स्टाइल ब्लाऊज वापरून पाहा किंवा नेहमीचे शॉर्ट ब्लाऊज वापरण्यापेक्षा शॉर्ट एम्ब्रॉयडर फिटेड कुर्तीज किंवा क्रॉप टॉप्सचा वापर करू शकता. या ब्लाऊजचा वापर तुम्ही लहेंगासोबत चोली म्हणून पण करू शकता. लेगिंग, क्रॉप टॉप आणि त्यावर दुपट्टासुद्धा घेऊ शकता. स्टीच्ड साडय़ा या सीझनमध्ये सत्ता गाजवतील.
अनमॅच पेअरिंग : यंदाच्या सीझनमध्ये तुमच्या ड्रेसिंगमध्ये अनमॅच पेअरिंग असणे अतिशय आवश्यक आहे. स्वेटर आणि लहेंगा, शॉर्ट घागरा, टाइट लेगिंग आणि क्रॉप टॉप, मिक्स मॅच प्रिंट्स, स्टिच दुपट्टा ही याची काही उदाहरणे आहेत. नेहमीप्रमाणे लाँग लहेंगा घालण्याऐवजी यंदा शॉर्ट लहेंगा किंवा स्कर्ट आणि त्यासोबत फिट लेगिंग ट्राय करून बघा. क्रॉप टॉपला दुपट्टा स्टिच करून घेतल्यास दुपट्टा सांभाळत बसण्याचा वेळ नक्कीच वाचू शकेल किंवा यंदा दुपट्टय़ाला रजा देऊन चक्क जॅकेटचा पर्यायसुद्धा तुम्ही निवडू शकता. एम्बॉयडर जॅकेट्स केव्हाही उत्तमच. लेस जॅकेटचा पर्यायही आहेच. पण नेहमीप्रमाणे शॉर्ट जॅकेट्स घालण्यापेक्षा लाँग जॅकेट्स निवडा. एम्ब्रोयडर शर्ट्स आणि स्कर्ट्ससुद्धा यंदा थोडा चेंज म्हणून वापरू शकता. लांब कुर्तीसोबत लेगिंग घालण्याऐवजी पलॅझो किंवा कॉटनची लूझ पँट घालू शकता.
बोल्ड ज्वेलरी : तुम्हाला जर कपडय़ांमध्ये जास्त प्रयोग करायचे नसतील, तर ज्वेलरीचा पर्याय तर आहेत ना तुमच्यासमोर. प्लेन साडी किंवा अनारकली सोबत बोल्ड ज्वेलरी वापरू शकता. पण नेहमीची कुंदन, पारंपरिक ज्वेलरीला फाटा देत इथे प्रयोग करण्यात हात आखडता घेऊ नका. ओव्हरसाइज ज्वेलरीसुद्धा तुम्ही वापरू शकता. पण अशा वेळी तुमच्या कपडय़ांमध्ये जास्त प्रयोग करण्याच्या फंदामध्ये पडू नका. किप इट सिंपल.   
ऑफ बीट रंग : नेहमीच्या ब्राइट रंगांना यंदा रजा द्या. त्याऐवजी यंदाच्या सीझनमध्ये डल आणि मॅट फिनीश रंगांचा वापर मोठय़ा प्रमाणात होणार आहे. ग्रे, नेव्ही, मेहेंदी ग्रीन, र्बगडी, कोबाल्ट ब्ल्यू, क्रोम यल्लो हे शेड्स सध्या सीझनमध्ये डिझाइनर्सचे फेव्हरेट आहेत. काळ्या आणि पांढऱ्या रंगाशिवाय तर त्यांचे पानच हलणार नाही आहे. त्यामुळे यंदा शॉपिंग करताना मनाची तयारी अशाच प्रकारे करून घ्या. सिल्क, रॉ सिल्क, टसर सिल्क या सेल्फ शाइन फॅब्रिक्सच्या वापरामुळे शेड्स डल असल्या तरी कपडय़ांचा लूक डल नसेल. डल शेड फॅब्रिक्सवर मॅटी फिनिश प्रिंट्स वापरायलासुद्धा हरकत नाही. मॅट शेड गार्मेट्सना फ्लोरोसेंट किंवा बोल्ड शेड्सचा वापर बेल्ट्स, बटन्स, कफ डिटेलिंग यांच्या माध्यमातून ‘अ‍ॅड ऑन’ म्हणून करू शकता. डल शेड्स खास करून काळा रंग सणांमध्ये वापरू नये असे म्हटले जाते, पण या रंगांमुळे मिळणारा रिच लूक तुम्ही नाकारू शकत नाहीत. त्यामुळे शकुन-अपशकुनाच्या पुढे जाऊन हे रंग वापरून पाहाच.
फूटवेअरसुद्धा साधेच
तुम्ही एकूणच लूकवर खूप प्रयोग करत असाल तर, शूज सिंपल ठेवा. जास्त हिल्स तुमच्या लूकला मारक ठरतील. या सीझनमध्ये टीपिकल फेस्टिव्ह हिल्सपेक्षा साध्या फूटवेअरचीच चलती असेल. स्निकर्सचा पर्याय वापरून पहा. सध्या फेस्टिव्हल सीझनला डोळ्यासमोर ठेवून अनेक कंपन्यांनी खास ग्लिटर्ड स्निकर्स बाजारात आणले आहेत. तुमचा रोजचा स्पोर्टी लूक आणि फेस्टिव्हल सीझनचा पारंपरिकपणा यांची एकत्र सांगड घालत हटके लूक यंदाच्या सीझनसाठी ट्राय करण्यास काहीच हरकत नाही.
थोडक्यात सांगायचे झाले तर, या सीझनमध्ये प्रयोग करण्यासाठी तुम्हाला पुरेसा स्कोप आहे. पण प्रयोग करायचे म्हणून अती करायचा हट्ट केलात तर मात्र माती होऊ शकते. त्यामुळे प्रयोग करताना देखील लूकचे भान असू द्या.
एम्बॉयडर जॅकेट्स केव्हाही उत्तमच. लेस जॅकेटचा पर्यायही आहेच. पण नेहमीप्रमाणे शॉर्ट जॅकेट्स घालण्यापेक्षा लाँग जॅकेट्स निवडा. एम्ब्रोयडर शर्ट्स आणि स्कर्ट्ससुद्धा यंदा थोडा चेंज म्हणून वापरू शकता. लांब कुर्तीसोबत लेगिंग घालण्याऐवजी पलॅझो किंवा कॉटनची लूझ पँट घालू शकता.
 फूटवेअरसुद्धा साधेच
तुम्ही एकूणच लूकवर खूप प्रयोग करत असाल तर, शूज सिंपल ठेवा. जास्त हिल्स तुमच्या लूकला मारक ठरतील. या सीझनमध्ये टीपिकल फेस्टिव्ह हिल्सपेक्षा साध्या फूटवेअरचीच चलती असेल. स्निकर्सचा पर्याय वापरून पहा. सध्या फेस्टिव्हल सीझनला डोळ्यासमोर ठेवून अनेक कंपन्यांनी खास ग्लिटर्ड स्निकर्स बाजारात आणले आहेत. तुमचा रोजचा स्पोर्टी लूक आणि फेस्टिव्हल सीझनचा पारंपरिकपणा यांची एकत्र सांगड घालत हटके लूक यंदाच्या सीझनसाठी ट्राय करण्यास काहीच हरकत नाही.
थोडक्यात सांगायचे झाले तर, या सीझनमध्ये प्रयोग करण्यासाठी तुम्हाला पुरेसा स्कोप आहे. पण प्रयोग करायचे म्हणून अती करायचा हट्ट केलात तर मात्र माती होऊ शकते. त्यामुळे प्रयोग करताना देखील लूकचे भान असू द्या.
ऑफ बीट रंग :
नेहमीच्या ब्राइट रंगांना यंदा रजा द्या. त्याऐवजी यंदाच्या सीझनमध्ये डल आणि मॅट फिनीश रंगांचा वापर मोठय़ा प्रमाणात होणार आहे. ग्रे, नेव्ही, मेहेंदी ग्रीन, र्बगडी, कोबाल्ट ब्ल्यू, क्रोम यल्लो हे शेड्स सध्या सीझनमध्ये डिझाइनर्सचे फेव्हरेट आहेत. काळ्या आणि पांढऱ्या रंगाशिवाय तर यंदा पानच हलणार नाहीय. त्यामुळे यंदा शॉपिंग करताना मनाची तयारी अशाच प्रकारे करून घ्या. सिल्क, रॉ सिल्क, टसर सिल्क या सेल्फ शाइन फॅब्रिक्सच्या वापरामुळे शेड्स डल असल्या तरी कपडय़ांचा लूक डल नसेल. डल शेड फॅब्रिक्सवर मॅटी फिनिश प्रिंट्स वापरायलासुद्धा हरकत नाही. मॅट शेड गार्मेट्सना फ्लोरोसेंट किंवा बोल्ड शेड्सचा वापर बेल्ट्स, बटन्स, कफ डिटेलिंग यांच्या माध्यमातून ‘अ‍ॅड ऑन’ म्हणून करू शकता. डल शेड्स खास करून काळा रंग सणांमध्ये वापरू नये असे म्हटले जाते, पण या रंगांमुळे मिळणारा रिच लूक तुम्ही नाकारू शकत नाहीत. त्यामुळे शकुन-अपशकुनाच्या पुढे जाऊन हे रंग वापरून पाहाच.
बोल्ड ज्वेलरी
तुम्हाला जर कपडय़ांमध्ये जास्त प्रयोग करायचे नसतील, तर ज्वेलरीचा पर्याय तर आहेच. प्लेन साडी किंवा अनारकली सोबत बोल्ड ज्वेलरी वापरू शकता. पण नेहमीची कुंदन, पारंपरिक ज्वेलरीला फाटा देत इथे प्रयोग करण्यात हात आखडता घेऊ नका. ओव्हरसाइज ज्वेलरीसुद्धा तुम्ही वापरू शकता. पण अशा वेळी तुमच्या कपडय़ांमध्ये जास्त प्रयोग करण्याच्या फंदामध्ये पडू नका. किप इट सिंपल.