ब्राझीलीयन खाद्यसंस्कृतीच्या दर्शनानंतर आता आपण गूढरम्य अशा इजिप्तच्या सफरीवर निघालोय. हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा असणाऱ्या या देशाची खाद्यसंस्कृतीसुद्धा अनोखी आहे.इजिप्तचा प्रदेश म्हणजे खूप मोठया वाळवंटाचा प्रदेश. हा प्राचीन देश नाइल नदीशिवाय कदाचित विकसित होऊच शकला नसता! हजारो वर्षांपासून या नदीने इजिप्शियन माणसाला फळं, भाज्या, धनधान्य, पाणी, अशा सगळ्या जीवनावश्यक गोष्टींची साथ दिली आहे. म्हणूनच या नदीचा उल्लेख वेगवेगळया जुन्या  शिल्पांत, शिलालेखांमध्ये पण आढळतो. नाइल नदीबरोबरच प्रकर्षांनं प्राचीन इजिप्तविषयीच्या पुरातन ठेव्यांमध्ये दिसून येते ती तिथली खाद्यसंस्कृती. इजिप्शियन माणसाचं खाण्यावरचं प्रेम इथल्या वेगवेगळया भित्तिचित्रांमधून दिसतं. काही चित्रांमध्ये तर त्या वेळच्या आवडत्या डिशेशच्या कृती आणि त्यांच्या त्या वेळच्या मेजवान्या यांचं चित्रण देवळांच्या आणि कबरींच्या िभतीवर चितारलेले आहेत.
खरं सांगायचं तर, इजिप्शियन खानपान इटालियन खाण्याइतकं वैविध्यपूर्ण किंवा फ्रेंचांसारखं फाइन नसेल कदाचित, पण ते शेजारच्या अरेबिक खाण्याइतकं जड पण नाहीय. फळं, भाज्या, डाळी, बिन्स, मासे, काही प्रमाणात मांस यांच्या मदतीने बनलेलं, तिथल्या हवामानाला अनुकूल असं, इंटरेिस्टग क्यूझाइन आहे असं मी म्हणेन.
कैरोचे पिरॅमिड्स आणि तिथलं भव्य म्युझियम पाहिल्यावर मी थक्कच झालो होतो आणि नजरेसमोर तीच भव्यता असताना आणि भरपूर पायपीट झाल्यानंतर मी जवळच्या एका कॅफेमध्ये गेलो आणि चहा ऑर्डर केला. इजिप्शियन वेटरनी मला प्रश्न विचारला, ‘सादा या झियादा?’ टूर गाइडनी खुलासा केला, ‘तो विचारतोय,- साखरेचा की बिनसाखरेचा?’ तेव्हा लक्षात आलं आणि मी त्याला उत्तर दिलं ‘झियादा’. तो पुदिन्याचा चहा इतका रिफ्रेिशग होता की सगळा थकवा दोन मिनिटांत गायब झाला.

फूल (इजिप्शियन बिन्स)
साहित्य : उकळून घेतलेला राजमा- २ वाटय़ा (इजिप्तमध्ये फावा बिन्स वापरतात. त्या पावटय़ासारख्या असतात.) लसूण पाकळ्या (ठेचलेल्या)- २-३, िलबाचा रस- अर्धा टी स्पून,  ऑलिव्ह ऑइल- ३ टेबल स्पून,  मीठ,  काळीमिरी पूड- चवीनुसार, टोमॅटो (चिरलेला)- ३, जिरे पूड- अर्धा टी स्पून, पुदिना चिरलेला- २ टी स्पून,  लाल मिरची पूड- अर्धा टी स्पून, लाल ढोबळी मिरची- १.
सोबत सव्‍‌र्ह करायला- पीता ब्रेड किंवा कोणताही उपलब्ध असलेला ब्रेड.
कृती : तेल गरम करून त्यात लसूण परतून घ्या. मग उरलेलं साहित्य- बिन्स, राजमासह टाकून व्यवस्थित घोटून घ्या. साधारणपणे १० मिनिटं शिजवा. खूप जास्त स्मॅश करू नका. जरा भरड असायला हवं. पीता ब्रेडसोबत किंवा ब्रेड टोस्टबरोबर गरमागरम सव्‍‌र्ह करा. ही डिश साधारणपणे इजिप्तमध्ये ब्रेकफास्टसाठी खाल्ली जाते.

इजिप्शियन स्पायसी किंग प्रॉन्स
साहित्य : ऑलिव्ह ऑइल – ८ टेबल स्पून, लसूण पाकळ्या  (ठेचलेल्या)- ८-१०,  पॅपरिका पावडर (किंवा लाल तिखट)- १ टी स्पून, जिरे- अर्धा टी स्पून, सुंठ- १ टी स्पून, काळीमिरी पूड- २ टी स्पून, िझगे (सोलून साफ केलेले)- २०० ग्रॅम, पार्सले किंवा कोिथबीर- २ टी स्पून,  पुदिना- २ टी स्पून, मीठ- स्वादानुसार    
कृती : कढईत तेल गरम करून त्यात लसूण, जिरे, तिखट टाकून थोडे परतून घ्या. आता त्यात झिंगे, काळीमिरी, मीठ टाकून त्याला नीट मिक्स करून थोडा वेळ परता. आता त्यावर चिरलेली पार्सले, कोिथबीर, पुदिना टाकून नीट मिक्स करून सव्‍‌र्ह करा.

आजची  सजावट : चॉकलेट गार्निशिंग  
हॉटेलमध्ये असतं तसं सॅलड कावर्ि्हग आपल्यालाही करता आलं तर.. असं नेहमी वाटतं. ते वाटतं तितकं अवघड मुळीच नाहीय. हा कोपरा खास त्यासाठीच..
साहित्य : चॉकलेट ब्लॉक/चिप्स्, बटर पेपर, बटर
कृती : डबल बॉयलरमध्ये चॉकलेट आणि बटर वितळून घ्या आणि बटर पेपरचा कोन बनवून किंवा स्क्वीझ बॉटलमध्ये टाका.
मग चित्रात दाखविल्याप्रमाणे वेगवेगळी डिझाइन्स बनवा आणि सेट करायला फ्रिजमध्ये ठेवा.
मग ही डिझाइन्स गार्निशिंगसाठी वापरा.
टीप : नेहमी चॉकलेटचे गार्निशिंग फ्रिजमध्ये ठेवा, बाहेर ठेवल्याने चॉकलेटची कुठलीही सजावट वितळेल.