गणेशोत्सव म्हणजे मिरवणुका, ढोल, गर्दी आणि उत्साह!! पण इतक्या माणसांच्या गर्दीतही एकटय़ा-दुकटय़ा मुलीला मिरवणुका बघायला जाताना सुरक्षित वाटत नाही. आज ढोल-पथकांपासून सगळीकडे मुली आघाडीवर आहेत. पण तरी रात्रभर मिरवणुका पाहण्यासाठी मुलींनी घराबाहेर पडायचं ठरवलं तर समस्त पालकवर्ग चिंताग्रस्त होतो. कारण इव्ह टीजिंग- गर्दीचा फायदा घेत होणारी छेडछाड.
पंजाबहून पुण्यात आलेल्या प्रीतमला पुण्यातल्या गणपतीचं कोण कौतुक!! हॉस्टेलच्या मत्रिणींसोबत गेल्या वर्षी लक्ष्मीरोडवर विसर्जन मिरवणूक पाहायला गेली. पण प्रचंड गर्दीमुळे त्यांची चुकामूक झाली. त्यात मराठी बोलता येत नसल्याने अजूनच पंचाईत.गोंधळलेल्या अवस्थेत असताना काय करायचं ते न सुचल्याने ती वाट दिसेल तशी चालत राहिली आणि तितक्यात काही टपोरी मुलांच्या ग्रुपने तिचा पाठलाग करत छेडायला सुरुवात केली. ती प्रचंड घाबरली. एकटी असल्याने तिला प्रतिकार करता येत नव्हता आणि रस्ते माहीत नसल्याने पळून जाणंही शक्य नव्हतं! सुदैवाने एक पोलीसमित्र भेटला आणि पुढे काही आणखी वाईट अनुभव आला नाही. पण प्रीतमनं तेव्हापासून गणपतीच्या गर्दीचा धसकाच घेतलाय.
मानसी, अगदी अस्सल पुण्याची मुलगी, ‘सगळे रस्ते वगैरे माहिती असूनसुद्धा गर्दीचा फायदा घेऊन असं घाण वागणाऱ्यांचा त्रास मलाही झालाय. वाईट नजरा आणि अश्लील शेरेबाजी हे तर अनेकवेळा अनुभवलंय.’
आणखी एक मुलगी नाव न घेण्याच्या अटीवर सांगत होती.. ‘मी मुंबईची. गर्दीची तशी सवयच असते आम्हा मुंबईकरांना. पण कधी कधी गर्दीत असे वाईट अनुभव येतात की, अगदी नको वाटतं. रेल्वेच्या पुलावर ट्रेन आल्यानंतर होणाऱ्या गर्दीत मला एक वाईट अनुभव आला होता. नकोसा स्पर्श करून तो माणूस थांबला नाही तर पुढे अचकट विचकट बोललादेखील. मी त्याला सुनावण्याचा प्रयत्न केला, पण त्याने बेशरमपणाची हद्द गाठली आणि मग मला कळलं, त्याच्याबरोबर आणखी तिघं-चौघं होते तेव्हा. मी खरंच घाबरले मग आणि शेवटी मान खाली घालून निघून गेले.’
हे वाचताना आपल्यापकी प्रत्येकालाच आलेले असे अनुभव ताजे झाले असतील. बऱ्याचदा शहराची माहिती असूनही, कायदे-कानू माहिती असूनही, आई-वडिलांच्या सतत संपर्कात असूनही आपण घाबरून जातो. वाईट नजरा, शिट्टय़ा, विचित्र कॉमेंटस आणि नको वाटणारे स्पर्श कोणत्याही मुलीला नवे नाहीत. हे बहुतेक सगळ्या मुलींच्या बाबतीत घडतं. गणपती मिरवणुकीच्या गर्दीतदेखील ‘इव्ह टीजिंग’सारखे प्रकार राजरोस घडतात. ढोल वाजवणाऱ्या मुलींपासून ते मिरवणूक पाहायला आलेल्या मुलींपर्यंत सगळ्यांनाच असे वाईट अनुभव येतात. आसपास एवढी माणसं असूनदेखील बेशरमपणे असे चाळे करणाऱ्यांना काहीच वाटत नाही. अंमळनेरहून पुण्यात शिकायला आलेल्या प्राचीच्या मते, ‘लोक गर्दीला घाबरत नाहीत. उलट गर्दीत कोणाला काय कळतंय असं समजून चान्स मारतात आणि मुलीसुद्धा घाबरून किंवा कशाला प्रकरण वाढवायचं म्हणून गप्प बसतात.’

खरं तर अशा गर्दीच्या ठिकाणी आपल्या मदतीसाठी सदैव पोलीस असतातच. परंतु आपल्यापैकी कितीजणी या गोष्टींविरुद्ध दाद मागतात? कित्येक ठिकाणी मुली तक्रारी करण्यासाठी पुढेच येत नाहीत. कारण उगाच आणखी लोक पाहतील किंवा इश्यू कशाला करायचा? अशा विचारानं गप्प बसतात. या विचारांमुळे तक्रारी नोंदवल्या जाण्याचं प्रमाणच कमी आहे.
गर्दीच्या ठिकाणी ‘चान्स मारणारे’ लोक जरी असले तरी ‘मुली आहेत त्यामुळे त्रास होणारच’ किंवा ‘गर्दीत इतकं तर चालतंच’ या मुलींच्या अ‍ॅटिटय़ुडमुळेच अशा लोकांचं फावतं. स्वत:ला मॉडर्न म्हणवून घेणाऱ्या आजच्या जमान्याच्या मुलीसुद्धा असे खोटे-त्रासदायक ‘स्टीरिओटाइप’ सांभाळताना दिसतात. अशा गर्दीत काही मुली पुढे येऊन आवाज उठवतात-तक्रारी नोंदवतात तर काही अनोळखी लोक प्रसंगी मुलींना मदत करतातही. परंतु या सगळ्याचं प्रमाण नगण्य आहे!
गणपती हा खरं तर सार्वजनिक उत्सव आहे. परंतु खरंच समाजातील सर्वच जण याचा समान आनंद घेऊ शकतात का? मुलींबद्दल समाजाच्या मनात एक ‘सॉफ्ट कॉर्नर’ असतोच, परंतु फक्त त्यानं काय साधणार? या गरप्रकारांबद्दल आवाज उठवणं गरजेचं आहे. किमान चुकीच्या गोष्टी होतायेत हे सांगण्याची हिंमत तरी आपण करायलाच हवी!!  