मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- ययाति आणि देवयानी
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
फॅशन म्हटल्यावर अनेक गोष्टी ओघाने येतात. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतला कॅरी कसे करता. पडद्यावरील तारका नानाविध कपडय़ांमध्ये आपल्याला वावरताना दिसतात. पण प्रत्यक्ष त्या कुठल्या फॅशन डिझाइनरकडून कपडे घेतात किंवा त्या शॉपिंग करतात तर कुठून, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत या फॅशन परेडमध्ये..
चित्रांगदा सिंग
तुम्ही माझा 'इन्कार' सिनेमा पाहिला? 'माया'च्या भूमिकेत मी फॅशनची प्रचंड हौस-मौज पूर्ण केली. अं.. हं.. पण तेवढे म्हणजेच माझी 'भूमिका' नाही. एका अॅड कंपनीत नोकरी ते संचालिका अशा ग्राफमध्ये मी अनेक प्रकारची वस्त्रे परिधान केलीत. शॉर्ट्स, टाइट्स, शॉर्ट सराँग, लाँग सराँग, लो नेक, बॅकलेस, लो वेस्ट जिन्स, कॅप्री ट्रान्सपरंट स्टॅगेटी.. कपडय़ांमुळे तुमची 'इमेज' बनते. गर्ल नेक्स्ट डोअर, फ्लर्टी, नॉटी, बिची, मॉर्ड, स्ट्रीट स्मार्ट, अशी ती कशीही असू शकते. पारंपरिक, आधुनिक व पाश्चात्त्य अशा सगळ्या 'स्टाइल'ची सध्या सरमिसळ झाली आहे. बदलत्या वेगवान काळाचा तो परिणाम आहे. 'तू खूप स्टाइलाइश आहेस' असे कोणी म्हटल्याने मी सुखावते. एक ड्रेस मी किती काळाने रिपिट करते याचे नेमके गणित नाही. पण कुठलाही ड्रेस घेताना मी तो कॅरी करू शकते का नाही याचं मात्र गणित मांडते. कुठल्या समारंभाला जात्येय यावर मी कपडय़ांची निवड करते. एखाद्या घरगुती समारंभाला जाताना मी मिनीज् किंवा पार्टीवेअर गाऊन न घालता पंजाबी ड्रेस घालणं अधिक पसंत करते.
सई ताम्हणकर
कपडय़ात मी 'इण्डो वेस्टर्न ड्रेस'ला प्रथम पसंती देते, जेवढय़ा प्रमाणात मी साडी उत्साहाने नेसते, तेवढीच पसंती मी लो-कट्स जीन्स, आऊटफिट यांना देते. मला वाटते, आपण कोणत्या प्रकारच्या वस्त्रात जास्त सहज वावरतो त्याला जास्त प्राधान्य द्यावे. बऱ्याचदा साडी सांभाळून धावपळ करणे मला शक्य होत नाही, म्हणूनच हलके परंतु आकर्षक वस्त्र परिधान करावे. माझ्या फॅशनेबल ड्रेसच्या बाबतीत मी नीना गुप्ताची मुलगी मसाबा हिच्याकडे जाते, ती माझे व्यक्तिमत्त्व व माझी आवड यांचा योग्य समतोल साधते. तेच तर गरजेचे असते; पण मुंबई असो वा पुणे किंवा आमचे सांगली, अमुकच ठिकाणी मी कपडे खरेदीला जाईन, असे नाही. आता उंची-दिमाखदार मॉलमध्येदेखील 'मराठी माणूस' महागडी वस्त्रे खरेदी करू शकतो. एखाद्या भूमिकेसाठी फॅशनेबल वस्त्रे खरेदी करायची असल्यास त्याची कशा पद्धतीने गरज आहे अथवा व्यक्तिरेखा खुलविण्यासाठी त्याचा कसा वापर होणार आहे, यावर दिग्दर्शकाशी आवर्जून चर्चा करते.
शिल्पा शेट्टी
'बाजीगर'पासूनच्या माझ्या २० वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीत मी फिटनेस, लूक व फॅशनेबल वस्त्रे यांना जास्तीत जास्त प्राधान्य दिले. कारण ती माझ्या ग्लॅमर क्षेत्राची 'सही' गरज होती. अगदी सुरुवातीला मी काहीशी बेढब होते, पण 'मैं खिलाडी तू अनाडी'मधील 'चुरा के दिल मेरा' गाण्याच्या चित्रीकरणापासून माझा स्वत:कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आपण आतून अर्थात मनातून सुंदर असू तर आपल्याला कोणतेही वस्त्र शोभते यावरचा माझा विश्वास मी कधीच ढळू दिला नाही. 'धडकन' चित्रपटात मला पाश्चात्त्य व देशी वस्त्रे तर झालेच, पण 'शादी का जोडा'देखील परिधान करण्याची संधी मिळाली. माझ्या वाटचालीत या चित्रपटात मी सर्वाधिक 'देखणी' दिसले असेच अनेकांचे मत पडले. आता छोटय़ा पडद्यावर मोठय़ाच प्रमाणावर मी येत असल्याने सहकुटुंबासमोर व्यवस्थित जायला हवे याचे भान मी ठेवलेय. माझ्याकडे नेमके किती कपडे आहेत हे सांगणे योग्य आहे का, ते केवढे तरी अवघड आहे.
निशा परुळेकर
माझा 'वॉर्डरोब' किती तरी प्रकारच्या साडय़ा व फॅशनेबल कपडय़ांनी भरलेला आहे. काही वेळा मॉलच्या एका फेरीत १५-२० हजारांची वस्त्रे खरेदी करणे माझ्यासाठी 'कॉमन गोष्ट' आहे. माझ्याइतकीच मी माझ्या मुलीच्या कपडय़ांच्या खरेदीला महत्त्व देते. वस्त्रांची निवड व पद्धत याबाबत मी साजिद व पूर्णिमा ओक यांचा प्रामुख्याने सल्ला घेते. माझ्या काही चित्रपटांसाठी त्यांचेच ड्रेस डिझायनिंग असते. दुकानात जा व कपडे खरेदी करा असे करण्यापेक्षा त्यामागे थोडेसे नियोजनही हवे, पण 'मराठी युवती' कपडय़ांच्या बाबतीत अजिबात 'मर्यादा' ओलांडत नाहीत, पण बदलत्या आधुनिक काळात मराठी युवतींनीही 'फॅशने'बल वस्त्रे खरेदी करायला हवीतच. मी पार्टीला जाताना इण्डो वेस्टर्नला पसंती देते, तर लाँग ड्राइव्ह अथवा इतर काही कामाला जाताना जीन्स व टॉपला प्राधान्य देते.
दीपाली पानसरे
मला पाश्चात्त्य वस्त्रांपेक्षा भारतीय वस्त्रे जरा जास्तच पसंत आहेत. विशेषत: जीन्स-टी शर्ट, सलवार-कमीज यांना प्राधान्य देते. विशेष कारण असेल तर साडी पसंत करते. वस्त्रांच्या बाबतीत मला कधीही कोणाचाही सल्ला नको असतो, त्याबाबत मी माझी 'गुरू' आहे. जसजशी मोठी होत चालले आहे तसे मला आपल्याला कोणत्या प्रकारची वस्त्रे कशी छान शोभतील याचे व्यवस्थित आकलन होत आहे. दक्षिण मुंबईत फिनिक्स मॉल व उपनगरात इन्फिटी मॉल येथे मी कपडे खरेदीला प्राधान्य देते, पार्टीला जाताना त्याची 'थीम' पाहून कपडे निवडते. अर्थात प्रत्येक मुलीला फॅशनच्या बाबतीत आपल्या मर्यादा काय आहेत व काय शोभते याची पूर्ण कल्पना असते, त्यामुळे कोणत्याही 'पुरुषा'ने तुला हे कपडे मुळीच शोभत नाहीत, असे सांगू नये. त्यापेक्षा त्यांनी मन व डोळे स्वच्छ ठेवून मुलींकडे पाहावे, त्याचीच जास्त गरज आहे. आम्ही कधी मुलांना त्यांच्या विचित्र कपडे व सवयीबद्दल जाब विचारायला जातो का? त्यांनी स्वत:च्या बहिणीपासून फॅशनेबल वस्त्राचा विचार करावा. सध्या आम्ही मुलींमध्ये जम्प सूट, शॉर्ट व लाँग फ्रॉक व टय़ुनिक यांची क्रेझ आहे. माझ्याकडे तर इतके कपडे आहेत की चार-सहा महिने तरी एक ड्रेस रिपिट होत नाही. एवीतेवी मुलींना कपडय़ांची चैन आवडते. अभिनेत्रींमध्ये विद्या बालनला उत्तम ड्रेस सेन्स आहे व म्हणूनच ती मला आवडते.
मिताली वराडकर
औरंगाबादवरून मुंबईत राहायला आले व या शहरातले स्वातंत्र्य, स्टाइल, अॅप्रोच व नवीन गोष्टींचे पटकन स्वागत करण्याची पद्धत यांच्या जणू मी प्रेमातच पडले. येथे अवघ्या पन्नास रुपयांपासून 'टॉप' मिळतात, दीडशे रुपयांत पार्टीवेअरही शक्य होतात. स्वत:ला कफर्ट वाटतील व इतरांचा रिस्पेक्ट मिळेल याचे योग्य मिश्रण करणारे पोशाख परिधान करावेत. आपल्या फॅशनबाबत आपल्यालाच आत्मविश्वास असावा, म्हणजे ते 'छान' दिसते. माझ्याकडे तर १०-१२ वर्षे जुनेही कपडे आहेत, ते उन्हाळा-हिवाळा-पावसाळा या मोसमाप्रमाणे बाहेर काढते, काही वस्त्रे शॉर्ट करते, कोणाला स्लिव्हलेज करते, कोणाला अल्टर करते. कपडय़ांच्या बाबतीत मी खूपच उत्साही आहे. मालाडचे नटराज मार्केट व वांद्रय़ाचे फॅशन स्ट्रीट येथे माझी खरेदी होते.
आदिती गोवित्रीकर
माझी मॉडेल म्हणून तब्बल सोळा वर्षांची यशस्वी व बहुरंगी कारकीर्द आहे. जाहिरातपट, रॅम्प शोज, फोटोसेशन यातून मी किती प्रकारची वस्त्रे परिधान करतेय याची खरंच गणती नाही. फॅशनचे बदलते प्रवाह मी अनुभवले. मला स्वत:ला सर्व प्रकारची वस्त्रे आवडतात. आवड, सवय व माझा पेशा यातून ते डेव्हलप झाले आहे. अनेक ड्रेस डिझायनर व फॅशन डिझायनर यांच्याशी माझा संबंध आला अथवा येतो, पण त्यातून आपणही आपल्याला नेमके काय शोभते यावर आपली 'दृष्टी' तयार करायला हवी. माझ्याकडे अगणित कपडे आहेत; प्रसंगानुसार मी त्यातले कोणते वापरायचे ते ठरविते. आपण आकर्षक दिसावे हा त्यामागचा हेतू असावा. आतापर्यंत ३०-३५ देशांतून फिरले, खरेदी केली, दुबईच्या प्रशस्त मॉलमध्ये कपडे खरेदीचा आनंद काही वेगळाच.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















