vv14प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलीवूडची स्टाइल दिवा म्हणून ओळखली जाणारी मलाइका देतेय स्टाइल टिप्स खास व्हिवाच्या वाचकांसाठी.

हाय, मी, पुण्याची प्राजक्ता. येत्या उन्हाळ्याच्या सुटीत मी राजस्थान सहलीला जाण्याच्या विचारात आहे. तेव्हा मी कोणत्या प्रकारचे कपडे सोबत न्यावेत याबद्दल काही टिप्स मिळतील का? मला डेनिमवेअर आणि स्कर्ट्स घालायला आवडतात.

हाय प्राजक्ता,
इट्स ग्रेट, तू ट्रिप प्लॅन करते आहेस. बोअिरग रुटीनमध्ये ट्रॅव्हल ब्रेक इज अ मस्ट िथग. यामुळे नंतर नव्या उत्साहाने काम करणे शक्य होते. राईट? आता उन्हाळ्यात राजस्थान म्हणजे अर्थातच प्रचंड उष्मा. तेव्हा या सहलीसाठी शुद्ध सुती कापडाचे, सल आणि सुटसुटीत ड्रेसेस बेस्ट. तुझ्यासाठी टँक टॉप आणि शॉर्ट हा एक उत्तम पर्याय होऊ शकेल (कमरेपर्यंतच्या उंचीचे स्लीव्हलेस टीशर्ट आणि शॉर्ट). यामुळे शरीर थोडेफार थंड vv13राहायला मदत होईल आणि आरामदायी वाटेल. तसंही तुला डेनिमवेअर आवडत असेल तर मग क्लासी, स्टायलिश लुक सहज मिळवता येईल. उदाहरणच द्यायचे झाले तर, पांढरा टीशर्ट आणि डेनिम शॉर्ट सही स्टाईल. यात बदल म्हणून कलर्ड डेनिम कापडाचाही वापर करता येईल. कलर्ड डेनिम शॉर्ट्स सोबत सलसर पांढरा किंवा ग्रे रंगाचे सुती शर्ट्स नक्की ट्राय कर. आणखी एक- रेड आणि ग्रे हे कलर कॉम्बो उन्हाचा विचार करता उत्तम आहेच आणि यात आपला लुकही ब्राइट दिसायला मदत होते.
महत्वाचे म्हणजे, रंगीबेरंगी स्काफ्र्स नक्की घेऊन जा. राजस्थानातल्या रूक्ष, कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी, केसांचे, त्वचेचे आणि शरीराचे आरोग्य सांभाळण्यासाठी, डोक्याभोवती स्काफ्र्स गुंडाळून फिरणे फार गरजेचे आहे. शिवाय स्टायलिश प्रकारे स्काफ्र्स गुंडाळलेस तर तुझ्या लुकला एक स्मार्ट टच मिळेल. तेव्हा स्काफ्र्स निवडताना वैविध्यपूर्ण िपट्र्स आणि गडद, ठळक रंग यांचा नक्की विचार कर किंवा वेगवेगळ्या हॅटही तुला ट्राय करता येतील. आजकाल बाजारात अनेक प्रकारच्या हॅट उपलब्ध असतात. गवती, कापडी, लोकरीच्या विणलेल्या, कागदी वगरे त्यांचा ड्रेसच्या बरोबरीने वापर केलास तर उन्हापासून रक्षणही होईल, शिवाय तुझा लुकही फॅशनेबल होईल आणि साधासा ड्रेसही रंगतदार दिसेल. आता ऊन म्हटल्यावर डोळ्यांसाठी गॉगल्स हवेतच. वेगवेगळ्या आकाराचे, रंगांचे गॉगल्सही तू वापरू शकतेस. अशा कलरफुल अ‍ॅक्सेसरीजमुळे मूड हॅपी, हॅपी, व्हायला मदत होते. थोडक्यात गरम हवेच्या ठिकाणी, कडक उन्हाळ्यात साधे सुती कपडे घालूनसुद्धा सुटीचा पूर्ण आनंद आणि आराम मिळवणे आपल्याला सहज शक्य होते.
आता पादत्राणांचा विचार करूया. शरीराच्या अन्य भागांप्रमाणेच पावले आणि पायाचे तळवे यांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी शूज घालणे उत्तम. ट्रेंडी ग्लॅडीएटर्स सध्या इन आहेत (पायाच्या घोटय़ापर्यंत किंवा क्वचित पोटरीपर्यंतचा भाग झाकणारे बूट). ते मजबूत असतात आणि वाळूतून चालण्यासाठी उपयोगी पडतात. स्नीकर्ससुद्धा गुड ऑप्शन. यांतील रंगीत स्नीकर्स झकास, हटके दिसतील आणि पायांना आरामही देतील. या प्रकारच्या शूजमध्ये कुठेही आणि कितीही चालणे, सहज शक्य होते. मग प्राजक्ता राजस्थानातल्या तळपत्या उन्हापासून सुरक्षित राहताना, स्टायलिश दिसण्यासाठी, गेट रेडी. हॅपी जर्नी! (अनुवाद : गीता सोनी)
सौजन्य – द लेबल कॉर्प
http://www.thelabelcorp.com, http://www.theclosetlabel.com 

आपल्या गर्ल्स गँगबरोबर सकाळी ब्रंचला जाणार आहात की रात्री पार्टीचा प्लॅन आहे? काय घालू, कसं दिसेल या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी स्टाइल दिवा मलाइका अरोरा-खान तुम्हाला मदत करेल. फॅशन, कपडे, हेअर, स्टाइलिंग याबाबतच्या तुमच्या शंकांना मलाइका या सदरामधून उत्तरं देईल. फॅशन आणि स्टाइलिंगविषयीचे आपले कोणतेही प्रश्न viva@expressindia.com या इमेल आयडीवर बिनधास्त पाठवा. आपलं नाव, राहण्याचं ठिकाण यांसह प्रश्न पाठवा आणि सब्जेक्ट लाइनमध्ये स्टाइलिंग बाय मलाइका असं आवर्जून लिहा.
मलाइका अरोरा खान