मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- 'एलबीटी' संदर्भात व्यापा-यांची बैठक
- सीमा तपासणी नाक्यांमुळे राज्याच्या महसूल उत्पन्नात वाढ होणार- मुख्यमंत्री
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
मीता सावरकर
मुंबईत साधारण डिसेंबर-जानेवारीत थंडीची लाट असते. त्यानुसार खाणे-पिणे ठेवायलाच हवे, इतर वेळी काय खावे, किती खावे याचे कोष्टक पाळणारी मी थंडीत मात्र बेभान राहते. 'मस्त जिओ, मस्त खावो' असा स्वच्छंदी बाणा जपते. पण मी पूर्ण शाकाहारी आहे, फळे व सॅलड यावर हात मारतच असते, पण शेजारच्या पंजाबी कुटुंबियांकडून मी सरसो का साग व मक्की की रोटी या गोष्टी शिकून घेतल्या. त्या थंडीत 'द बेस्ट'. या दिवसात उंदियो भरपूर खावा, मजा येते. खूप भूक लागणारा असा हा सिझन आहे. शरीरातही उष्णता असतेच, ती पोटातून शांत करावी. थंडीतच येणाऱ्या संक्रातीमुळे गुळाची पोळी, तीळ हे पदार्थ असतात. दररोज संध्याकाळनंतर मिरी घातलेले टोमॅटो वा पालक यांचे सूप घ्यावे.
मनीषा केळकर
थंडी माझा अत्यंत आवडता मोसम आहे. अगदी 'मौसम, मौसम लव्हली मौसम' असं खुशाल म्हणावे अशी माझी थंडीशी जवळीक असल्याने स्वेटरपासून ड्रायफ्रूट खाण्यापर्यंत 'बहोत कुछ' मी त्यात एन्जॉय करते. थंडीच्या दिवसांत खाल्लेले मग वर्षभर शरीर सांभाळते-चालवते. म्हणूनच तर या मौसमात पौष्टिक खाण्याला मी भरपूर पसंती देते. त्यात नेमकं काय खाते हे वेगळं सांगायची गरज नाही. तरी जास्त भर सर्व प्रकारची ड्रायफूट व मासे यावर असतो. थंडीतच संक्रातसारखा 'गोड बोला' सण येतो. तेव्हा त्यात तिळगूळ खाणे येते, माझी आई खूप चांगले तिळगूळ बनवते व ते थंडीत खूपच फलदायी ठरतात. थंडीतील एक खास आठवण, सांगायला हवीच, पुष्कर जोगच्या 'मिशन पॉसिबल'च्या मोहक गाण्यासाठी आम्ही लडाखला होतो, अरे बापरे मायनस टेम्परेचर आणि त्यात मी सकाळी पाच वाजता उठून जॉगिंगही केलं. गार गार बोचऱ्या वाऱ्यात व्यायाम करणे प्रचंड थ्रील असते, पण या व्यायामाला पूरक असेच खाणे-पिणे मी कायम ठेवते, हे जास्त महत्त्वाचे. तेव्हा काहींची तब्येत बिघडली असता आईने दिलेल्या खास थंडीतील औषधांवर त्यांची पोटे बरी झाली. म्हणून मी आवर्जून सांगते, थंडीत तुम्ही काहीही खाऊ शकता, ते आवर्जून खा, म्हणजे संपूर्ण वर्ष अगदी छान जाईल.
गौरी नलावडे
थंडीत मी खूप खूप पाणी पिण्याची हौस-मौज कायम ठेवते, खर तर सगळ्यांनीच थंडीत भरपूर पाणी पिण्याची सवय लावून घ्यावी. याचे कारण, थंडीत आपली त्वचा सुकते व ती खराब दिसते. शरीरात खूप पाणी असले की असा कोणताही त्रास होत नाही. त्याबरोबरीने फळांचे रसदेखील खूप घ्यावेत. फळे ऐवीतेवी पौष्टिक असतात. थंडीत ती जास्त उपयुक्त ठरतात. थंडीत दहीदेखील खावे, तब्येतीला ते खूप चांगले असते, पण त्याचे घशाला काही इन्फेशन होऊ न देण्याची काळजीही घ्यायला हवी. थंडीत उष्ण पदार्थ जास्त खा असा मी सल्ला देईन. विशेषत: जंजीर, खजूर, बदाम अवश्य खा. माझी आई तर मला शूटिंगला जाताना आवर्जून खजुराचे लाडू देते, थंडीत ते मस्ट ठरतात. शूटिंगला जाताना मी बास्केटमध्ये भरपूर फळे व रस ठेवते व दर दोन तासांनी त्याचा खूप आस्वाद घेते. इतर मौसमात स्त्रियांना न झेपणारा पपया थंडीत मात्र खावा. तो खूप उष्ण असला तरी एक प्रकारचे टॉनिक द्यायचे काम करतो.
दीपाली सय्यद
'संभा'च्या सेटवर झालेल्या अपघातामुळे मला किमान वर्षभर पथ्य सांभाळायचे आहे, त्यामुळे थंडीतही जिभेवर ताबा हवाच. तरी खास करून दुपारी ताक व नारळपाणी याला पसंती, दिवसभरात शक्य तेव्हा गरम दूध हे माझे थंडीतले आवडते पदार्थ! खरं तर थंडीत चहा उत्तम, पण मी तो कमी केलाय. याचीच दुसरी बाजू म्हणजे आईकडून येणारे मेथी व डिंकाचे लाडू मी खूप खावून थंडीतला आहार समतोल करते. पुणे व नाशिक अशा कडाक्याची थंडी असलेल्या भागात मराठीचे चित्रीकरण असताना थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न वाढवावा लागतो. थंडीत त्वचेची काळजी घेताना क्रीम, कोल्ड क्रीम याचा आठवणीने वापर करते. थंडीत मांसाहार हितकारक असला तरी मला सध्या तो व्यर्ज आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















