सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडीओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट
चंदेरी फुलराणी
भारताची ‘फुलराणी‘ सायना नेहवालनं ‘जागतिक बॅडिमटन स्पध्रे‘त रौप्यपदकाची कमाई केली. महिला एकेरीच्या अंतिम फेरीत सायनाला स्पेनच्या अव्वल मानांकित कॅरोलिना मरिनकडून पराभव स्वीकारावा लागला. वर्ल्ड नंबर वन कॅरोलिनानंच ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये यंदा अंतिम फेरीत सायनाला हरवलं होतं. मात्र सायनाची ही कामगिरीही ऐतिहासिक ठरलेय. कारण जागतिक विजेतेपद स्पध्रेत फायनल गाठणारी आणि रौप्यपदक मिळवणारी सायना पहिलीच भारतीय आहे. सोशल मीडियावर सायनाच्या चाहत्यांनी तिला सतत बकअप केलेलं दिसलं. त्यामुळं #CheerForSaina हा ट्रेण्ड दिसून आला. सामान्य चाहत्यांसह अनेक सेलेब्रेटींनीही ‘ट्विटर‘वर सायनाचं मनमोकळं कौतुक केलं.
.. श्रावण आला.
‘‘हासरा, नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजरा श्रावण आला‘‘ अशा काव्यपंक्ती शेअर करत किंवा मग श्रावणातील हिरवाईचे फोटोज पोस्ट करत नेटकरांनी श्रावणाचं मोठय़ा झोकात स्वागत केलं. श्रावणी शनिवार-सोमवार, नागपंचमी अशा उपास-सणांच्या शुभेच्छा दिल्या गेल्या. आजही अनेक जण ‘श्रावण पाळतात‘ किंवा तो ‘पाळणं‘ त्यांना भाग पडतं. त्याचंच प्रतििबब या ‘व्हॉट्सअ‍ॅप’ मेसेजमध्ये दिसतंय- ‘‘छोडम् देते है भोजन, जिसमें एक बाल है, फिर क्यों खाते हो अंडा, जिस में एक माँ का लाल है…! वाह रे इंसान तेरी फितरत.. लाश को हाथ लगाता है, तो नहाता है.. पर बेजुबान जीव को लाश बना के खाता हैं!.. Proud to be Vegetarian!…श्रावणात मी असचं बोलतो!‘‘
‘कट्यार’, ‘जज्बा’ नि ‘सराट
‘कट्यार काळजात घुसली‘ हे संगीत नाटक चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतंय. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीतानं आणि पंडित वसंतराव देशपांडे नि प्रकाश घांग्रेकर यांच्या स्वरांनी अजरामर केलेल्या या कलाकृतीच्या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर रिलीज झालाय. अभिनेता सुबोध भावे दिग्दíशत या चित्रपटात गायक-संगीतकार शंकर महादेवन आणि अभिनेता सचिन पिळगावकर यांच्या मुख्य भूमिका असतील.ऐश्वर्या रॉय-बच्चन नि इरफान खानच्या ‘जज्बा‘चं पोस्टर लॉन्च ट्विटरवर केलं गेलं. पाच वर्षांच्या ब्रेकनंतर जाहिराती नि फॅशन शोजनंतर आता ऐश्वर्या मोठ्या पडद्यावर झळकणारेय. संजय गुप्ता दिग्दíशत या क्राइम स्टोरीमध्ये शबाना आझमी, अतुल कुलकर्णी, अभिमन्यू सिंग, जॅकी श्रॉफ अशी स्टारकास्ट आहे.
‘फॅण्ड्री‘ या पहिल्याच चित्रपटात अनेकांची मनं जिंकून कौतुकास पात्र ठरलेल्या नागराज मंजुळेच्या पुढच्या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर रिलीज झालाय. प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांचं संगीत या चित्रपटाला लाभलंय. ‘सांगत होतो ना, जाळ अन् धूर मनून’’ अशी टॅगलाईन मिरवणाऱ्या या ‘सराट‘ चित्रपटाविषयी नेटकरांची उत्सुकता वाढू लागलेय.
जय हिंद
आपल्या स्वातंत्र्यदिनानिमित्त असंख्य नेटकरांनी पिढी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं देशप्रेम व्यक्त केलं. त्यानिमित्तानं देशप्रेमाचे मेसेजेस, फोटोज, व्हिडीओज् शेअर करण्यात आले.  बहुसंख्यांनी आपले किंवा ग्रुप्सचे डीपीज झेंडा किंवा त्याचं प्रतीक म्हणून ठेवले होते. अनेकांनी #सॅल्यूट सेल्फी शेअर केल्यानं ट्विटरवर तो टॉप ट्रेण्ड ठरला होता. ‘व्हॉट्स अ‍ॅप‘, ‘फेसबुक‘, ‘ट्विटर‘वरून देशभक्तीपर गाणी किंवा राष्ट्रगीताची धून शेअर केली जात होती. लाल किल्ल्यावरच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाची चर्चाही सोशल मीडियावर रंगलेली दिसली. ‘गुगल डुडल‘वर महात्मा गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहाचं स्मरण करण्यात आलं. लिऑन हॉग यांनी रेखाटलेले चित्र ‘डुडल‘च्या स्वरुपात सादर करण्यात आलं होतं. या पाश्र्वभूमीवर #फ्रीडम टेस्टस् लाइक असाही एक ट्रेण्ड होता. त्यात अनेकांनी आपल्या आवडीच्या व्हेज-नॉनव्हेज पदार्थाची नावं लिहिली होती. शिवाय #फ्रीडम साउंडस् लाइक आणि #कॅम्पेन4चेंज या ट्रेण्डस्मध्ये स्वातंत्र्याची, स्वातंत्र्याच्या अभिव्यक्तीची चर्चा केली गेली. या निमित्तानं काही व्हिडीओज् व्हायरल होऊन चच्रेत आले. त्यापकी एक होता मनोज वायपेयी नि रविना टंडन यांचा व्हिडीओ. या ‘जय िहद‘ व्हिडिओमध्ये स्वातंत्र्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला गेला. नेटकरांनी त्याचं स्वागत, कौतुक केलं. मात्र काहींनी परखडपणं परिस्थिती फार बदललेली नाही, असा वास्तवाचा आरसाही दाखवला. आणखी एक व्हिडीओ गाजला तो ‘शुद्ध देसी एिण्डग्ज‘चा. ‘बॉर्डर‘ चित्रपटातले फिल्मी डायलॉग्ज लक्षात घेत त्यांनी क्रिएट केली एक ‘फिल्मी बॉर्डर‘! भारत-पाकिस्तान संबंधांचा सामान्य लोक, कला नि क्रीडा क्षेत्रावर होणारा परिणाम नि त्यातून निघणारा निष्कर्ष दोन्ही बाजूंना विचार करायला लावणारा आहे.
शोले@चाळीस
‘शोले‘ चित्रपटाला चाळीस र्वष झाल्याच्या निमित्तानं नेटकरांनी जोरदार सेलिब्रेशन केलं. टीम शोलेपासून शोलेच्या प्रेमात असणाऱ्या अनेक प्रेक्षकांनी या चित्रपटाच्या आठवणी जागवल्या. त्यातले ते फेसम डायलॉग्ज, सदाबहार गाणी आणि कायम मनात घर करून राहिलेले सीन्स सोशल मीडियावर शेअर केले गेले. दुसऱ्या बाजूला ‘शोले‘ला नाकं मुरडत नावं ठेवणाऱ्या नि त्यातले दोष दाखवून देणाऱ्या पोस्टही केल्या गेल्या.
ताजमहाल ‘ट्विटर’वर
जगातील सात आश्चर्यापकी एक आग्ऱ्याचा ‘ताजमहाल‘ आता ‘ट्विटर‘वर आलाय.  उत्तर प्रदेश सरकारनं ‘ट्विटर‘वर ताजमहालचं स्वतंत्र अकाउंट सुरू केलंय. सतराव्या शतकातील ही ऐतिहासिक वास्तू असून, ‘ट्विटर‘वर स्वतचं अकाऊंट असलेली ही पहिलीच वास्तू असेल. या ‘ट्विटर‘ अकाउंट द्वारे ताजमहालची अधिकाधिक माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचू शकेल. ताजमहालचं ‘ट्विटर‘ अकाऊंट सुरू झाल्यापासून तासाभरात दोन हजारांहून अधिक त्याचे फॉलोअर्स झाले होते.
मिडिया की खामोशी
#इन पर क्यों खामोश मीडिया हा ट्रेण्ड ट्विटरवर टॉपला होता. ‘राधे मॉं‘ प्रकरणाच्या निमित्तानं विविध धर्मातील संत-महंत, साधू-बुवा, माताजी-साध्वीजी, मौलवी, फादर्स-नन, इत्यादींच्या संदर्भात ट्विटरकरांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. सगळ्याच धर्मातील अशा प्रवृत्तीच्या लोकांविषयी अनेक मतं प्रदíशत करणाऱ्या ट्विटस् केल्या गेल्या.