भारतात अजूनही फेसबुकची लोकप्रियता कायम आहे. पण ट्विटरकडेही अनेक जण वळू लागलेत. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर नरेंद्र मोदींनी केलेलं भारत की विजय! अच्छे दिन आने वाले है! हे ट्विट ७० हजारांवर लोकांनी रिट्विट केलं.

गेल्या काही वर्षांपासून फेसबुक हे आपल्या अनेकांच्या आयुष्यातलं महत्त्वाचं पान झालंय. हे पान उलटू शकतं, अशी टिवटिव सध्या ऐकू येतेय. आपल्या आयुष्यातले अपडेट्स ब्रेकिंग न्यूजसारखे २४ बाय ७ द्यायचे असतात आणि आपले फोटोही पेज ३ वरच्या फोटोपेक्षा भारी असतात, हे आपल्याला फेसबुकनं शिकवलं. ट्विटरनं त्याच्या पुढे जात एखाद्या नेत्यासारखे किंवा सेलिब्रिटीसारखे आपल्यालाही फॉलोअर्स असतात हे सांगितलं. या सोशल नेटवर्किंग साइट्सनी आपलं आयुष्यच बदलून टाकलं. सामाजिक वर्तुळात होणाऱ्या घटनांवर या सोशल नेटवìकग साइटच्या माध्यमातून चर्चा रंगताना दिसतात.
आपल्या देशात फेसबुक सगळ्यात लोकप्रिय सोशल साइट आहे. ट्विटरची लोकप्रियताही वाढतेय. पण सर्वच लोकांना ट्विटर सोयीचं वाटतं असं नाही. फेसबुक पेजवरून आपल्याला माहिती आणि बातम्या, घडामोडी समजत असतात. तसंच वैयक्तिक माहिती उपलब्ध होते. कोण कुठे आहे ते समजतं. भारतात या वर्षांत सर्वात जास्त फेसबुक इंडिया गेटवरून चेक केलं गेलंय. तर २०१४ च्या निवडणुका जास्त चíचल्या गेल्या.
सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून आपल्या आवडत्या सेलिब्रिटींशी संवाद साधण्याचा ट्रेण्ड जगभर दिसतोय. ट्विटरवर सगळ्यात जास्त फॉलोइंग बिग बी अमिताभ बच्चन यांना आहे तर फेसबुकवर सल्लूमियाँनी बाजी मारलेली आहे. फॉलोअर्सची संख्या वाढण्याच्या टक्केवारीत मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर आहेत. गेल्या वर्षभरात त्यांच्या ट्विटरवरच्या फॉलोअर्सची संख्या ४६ लाखांनी वाढली आहे. त्यांचे आता ८५ लाख १६७७ फॉलोअर्स आहेत. ही वाढ ५४ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचं ट्विटरनं सांगितलंय. त्याखालोखाल आमिर खानचे फॉलोअर्स जवळपास ४० टक्क्यांनी वाढलेत. आमिरला फॉलो करणाऱ्यांची संख्या ९९ लाख २५ हजार आहे. सर्वाधिक फॉलोअर्स अमिताभ बच्चन यांना असून ती संख्या गेल्या वर्षभरात ३१ टक्क्यांनी वाढून आता १ कोटी १८ लाख ८१ हजार ३४५ वर पोहोचली आहे. भारतातलं गोल्डन ट्विट ठरलं – नरेंद्र मोदींचं इंडिया हॅज वन, भारत की विजय अच्छे दिन आने वाले है.

भारतात सर्वात जास्त फॉलोअर्स असलेली ट्विटर हँडल्स
ट्विटर अकाउंट                                    फॉलोअर्सची संख्या
१. अमिताभ बच्चन @srbachchan               – १,१८,१८,०५६
२. शाहरुख खान @imsrk                           – १,०२,४६,७५५
३. आमिर खान @aamir_khan                      – ९८,६६,४९२
४. सलमान खान @beingsalman                  – ९४,२६,९८९
५. नरेंद्र मोदी @narendramodi                   – ८४,२४,७०९
६. दीपिका पदुकोण @deepikapadukone     – ८३,४९,२७३
७. प्रियांका चोप्रा @priyankachopra             – ७९,१४,१२२
८. हृतिक रोशन @ihritik                             – ७५,७४,९६७
९. अक्षय कुमार @akshaykumar                  – ६६,८५,६५३
१०. ए आर रेहमान @arrahman                     – ५६,७४,९६७
या यादीत सचिन तेंडुलकरचं @sachin_rt या हँडलचा पंधरावा क्रमांक लागतो आणि १७ व्या क्रमांकावर पुन्हा एकदा पंतप्रधान कार्यालय @PMOIndia आहे.

vv13ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात काढला गेलेला सेल्फी सर्वाधिक रिट्विट झाला.
@TheEllenShowचं हे जगभरातलं गोल्डन ट्विट.

फेसबुक की ट्विटर?
आपापल्या गरजेनुसार प्रत्येक जण सोशल साइटचा वापर करत असतो. बरेच सेलिब्रिटीसुद्धा ट्विटर वापरणे पसंत करतात आणि त्यांचे अपडेट ठेवून त्यांचे फॅन्ससुद्धा तितक्याच प्रमाणात त्यांची दखल घेत असतात. सेलिब्रिटींची फेसबुक पेजेस लाइक करणाऱ्यांची vv12संख्या दररोज वाढते आहे. ट्विटरवरही अनेक सेलिब्रिटी अ‍ॅक्टिव्ह दिसतात.
सलमानची फॅन असणारी सायली गजरे म्हणाली की, ‘‘ट्विटरवरून सेलिब्रिटींशी थेट कनेक्ट होता येतं. त्यांच्या आयुष्यात होणाऱ्या घडामोडी आपल्याला त्यांच्या शब्दातच समजतात. तसंच सेलिब्रिटी अकाऊंटवर व्हेरिफिकेशन केलेलं असतं. त्याने फेक अकाऊंट लगेच कळतं. बहुतेक सेलिब्रिटी ट्विटरवर असतातच. सुरुवातीला अवघड वाटलं तरी सवयीने ते वापरणं सहज शक्य आहे.’’ बिना हळदणकर म्हणाली की, ‘‘आपापल्या परीने फेसबुक आणि ट्विटर दोन्ही सोशल नेटवìकग साइट्स चांगल्या आहेत. आपण ट्विटरवर आपलं स्वत:चं अकाऊंट करू शकतोच पण फॅन अकाऊंट असलं की परदेशातले पण फॉलोअर्स आपल्याला फॉलो करतात. त्यामुळे जास्त लोकांशी कनेक्ट होता येतं.’’
तबा मोहसिन म्हणाली, ‘‘फेसबुक जास्त सोयीस्कर वाटतं कारण त्यातून एखादी बातमी स्पष्टीकरणात्मकरीत्या मांडलेली असते. तसेच मनोरंजनात्मक गोष्टीसुद्धा समजतात अर्थात ते ट्विटरसुद्धा होतं पण त्या करता त्या न्यूज चॅनलला किंवा सेलिब्रिटीला फॉलो करावं लागतं. तरच त्यांचे अपडेट मिळतात.’’ तर कौशिक मोहिते म्हणाला की, ‘‘ट्विटरवर शब्द मर्यादा आहे त्यामुळे कमी शब्दांत व्यक्त होण्याचं बंधन येतं. यामुळे विचारपूर्वक आणि मोजकेच लिहावं लागतं. त्यामुळे फेसबुकच्या तुलनेत ट्विटर थोडं किचकट वाटतं.’’
सोशल नेटवìकगमुळे गोष्टी सहज सोप्या होताना दिसतात त्यात वेळोवेळी बदलही होत असतात. नवनवीन साइट्स त्यांची जागा घेत असतात आणि त्याचा वापर होत असतो. नवीन वर्षांत यात अजून काही बदल आणि फॅनची नवी समीकरणे पाहावयास मिळतील.
संकलन : कोमल आचरेकर