हेअर स्टायिलग ही काही ‘हर किसी के बस की बात’ नाहीये. एखादीच्या चेहऱ्याच्या फीचर्समधले दोष सफाईदारपणे झाकून तिची एखादी बट सोडून किंवा वेणी घालून तिचं व्यक्तिमत्त्व खुलवणं हे हेअर स्टायलिस्टच्या हाती असतं, असं आपल्याला वाटतं. फिमा दी विल्सच्या हेअर केअर एक्स्पर्ट आणि सेलेब्रेटी हेअर स्टायलिस्ट सपना भावनानी यांनी हेअर स्टायिलगविषयीच्या दिलेल्या या काही टिप्स.
एखादी व्यक्ती कशी दिसते, यावर अर्थातच तिची हेअरस्टाइल अवलंबून असते. हेअरकट करताना बहुतांश वेळा त्या व्यक्तीच्या चेहऱ्याचं आकारमान नि रचना लक्षात घ्यावी लागते. बरेच स्टॅण्डर्ड मानले जाणारे मिक्स अ‍ॅण्ड मॅच हेअरकट हे चिकबोन्स आणि नाकाची ठेवण अशा एरवी क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टी लक्षात ठेवून करावे लागतात. एखादीला एकदम सूट झालेली हेअरस्टाइल दुसरीच्या चेहऱ्याचा विचार न करता केली गेली तर तिच्या हेअरस्टाइलमुळे तिची पर्सनॅलिटी घडण्याऐवजी बिघडण्याचीच शक्यता अधिक असते. आणखी एक कायम लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे आपला लूक छान दिसण्यासाठी आपण कोणतीही हेअरस्टाइल करत असलो तरीही आपले केस हेल्दी, स्ट्राँग नि फाटे फुटलेले नसावेत. त्यासाठी केसांच्या योग्य पोषणासाठी उपयुक्त अशा श्ॉम्पू आणि कंडिशनरचा वापर एक दिवसाआड करायला हवा.
चेहरा नि हेअरस्टाइल
चेहरा गोलाकार असेल तरी घाबरायचं कारण नाही. लांबसडक केस आणि त्यांच्या लेअर्समुळे तुमचा चेहरा मोहक दिसेल. लेअर्समुळे चेहऱ्याचा गोलवा कमी होईल. मात्र हे लांब केस स्ट्राँग नि दाट हवे. त्यामुळे शॉर्ट हेअरस्टाइल करणं टाळाच. त्यामुळे चेहरा अधिक गोल दिसू शकेल. अ‍ॅण्टी हेअर फॉल सेरम  वापरल्यानं केस चमकदार नि बळकट होतील.
बदामाकृती चेहऱ्यात डोके रुंद असल्याने ते चटकन नजरेत भरतं. त्यासाठी शॉर्ट नि लाँग हेअरकटची ट्रीक वापरायला हवी. टोटल डॅमेज केअर श्ॉम्पू आणि कंडिशनर वापरल्याने केस सुंदर दिसू शकतील. या हेअरस्टाइलमुळे डोक्यापेक्षा चेहरा नि डोळ्यांकडे लक्ष वेधलं जाईल.
आयताकृती चेहऱ्यावर बँग्ज हवेत. थोडय़ा कपाळावर आलेल्या नि एका बाजूला घेतलेल्या केसांमुळे चेहरा थोडा लहान दिसतो. त्यानं भव्य कपाळ कव्हर होतं. त्यासाठी ब्लंट बँग्ज, लाँग, साइडस्वेप्ट बँग्जची निवड करता येईल. हनुवटीपर्यंतचा कटही चांगला दिसेल. कारण त्यामुळे रुंदीचा आभास निर्माण होईल नि चेहऱ्याच्या लांबीवरचं लक्ष विचलित होईल. सतत एक्सपरिमेंटस् करणं हा नवीन मंत्र आहे. केसांना रंग लावलात तर कलर्ड हेअर बँग्ज छान दिसतील. हेअर कलर नि स्टाइल मेंटेन करण्याकरिता कलर डॅमेज रिपेअर सेरमचा वापर करा.  अंडाकृती चेहरा एकदम व्हर्सटाईल मानला जातो. त्यात चिकबोनजवळ, ओठ किंवा हनुवटीपर्यंत केसांचे लेअर्स ठेवता येतात. त्यानुसार त्या त्या हेअरकटची बॉटमलाइन आपल्याला हवं ते फिचर हायलाइट करू शकते.  
हेअर केअर मंत्र
केसांची काळजी घेण्याचा बेसिक मंत्र आहे समतोल आहार, चांगला श्ॉम्पू-कंडिशनर वापरणं आणि योग्य तऱ्हेनं केसांची निगा राखणं. स्काल्प स्वच्छ असणं मस्ट आहे. काही स्पेशल श्ॉम्पूच्या वापरामुळे केसांच्या समस्या दूर होऊन होतात. केस गळण्याच्या मोठय़ा समस्येवर अण्टी हेअर फॉल श्ॉम्पू, कंडिशनरचा वापर उपयुक्त ठरून बदाम तेलाच्या वापरानं केसांना पोषण मिळतं नि ते गळण्याचं प्रमाण कमी होतं. केसांच्या त्वचेवर वाढतं प्रदूषण, घातक रसायनं आणि यूव्ही किरणांचा दुष्परिणाम होऊ शकतो. ते टाळण्यासाठी डॅमेज कंट्रोल श्ॉम्पू नि कंडिशनरचा वापर करावा.
केस निस्तेज का होतात?
पोषक आहाराच्या कमतरेतेमुळे आणि वाढतं प्रदूषण-रासायनिक ट्रीटमेंट यांची परिणती केस निस्तेज होण्यात होते. हे टाळण्यासाठी पोषक आहार आणि केसांच्या पोषणाकडे नीट लक्ष देत योग्य श्ॉम्पूची निवड करणंही अत्यावश्यक असतं. प्रोटिन्स, आयर्न नि व्हिटॅमिन्सच्या साहाय्यानं केस हेल्दी नि सुंदर राखता येतील.

केसांची निगा कशी राखावी?
प्रखर सूर्यप्रकाश, वाढतं प्रदूषण नि उष्णता यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडून त्याचा परिणाम केसांवरही होऊ शकतो. अशा डॅमेज करणाऱ्या गोष्टींपासून केसांचं रक्षण करावं. त्यासाठी नियमितपणे श्ॉम्पू नि कंडिशनरचा वापर करावा. केस धुतल्यावर त्यावर सेरम लावावं.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Video Rice Papad Marathi Recipe In Cooker Becomes Four Times After Frying Khichiya Papad Dough Making Papad Khar At Home
कुकरच्या एका शिट्टीत बनवा तांदळाच्या पिठाचे चौपट फुलणारे पापड, लाटायची गरजच नाही, बघा सोपा Video
Kerala doctors remove 4 cm-long cockroach from man’s lungs
धक्कादायक! व्यक्तीच्या फुफ्फुसातून बाहेर काढले चक्क झुरळ, केरळच्या डॉक्टरांनी केली ८ तासांची वैद्यकीय प्रक्रिया
Yash Mittal Murder Noida
व्यावसायिकाच्या मुलाची चार मित्रांकडून हत्या; वडिलांकडून मागितली सहा कोटींची खंडणी

डॅमेज झालेल्या केसांचं करायचं काय?
डॅमेज झालेल्या केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यासाठी केसांना विशेष पोषण द्यावं लागतं. ते पोषक आहार आणि नावीन्यपूर्ण हेअर केअर प्रॉडक्टचा उपयोग करावा. केसांची निगा राखताना श्ॉम्पू, कंडिशनर्स, सेरम आदी साधनांच्या साहाय्यानं केसांची काळजी घ्यावी.

हेअरकट केव्हा करावा, केस दुभंगण्यावर उपाय काय?
हेअरकट किंवा ट्रिमिंग हे दर ३-४ महिन्यांनी करावं. दुभंगलेल्या केसांविषयी अनेक गरसमजुती आहेत. केसांच्या मुळांशी कोरडेपणा येणं, दुभंगणं, अनसíगक वाटणं हे सगळं केसांचं नीट पोषण न झाल्यानं होतं. केस सतत श्ॉम्पू करणं, वाटेल तसे विंचरणं आणि केसांविषयीचा निष्काळजीपणा केस दुभंगण्याला कारणीभूत ठरू शकतो. शिवाय कोरडे हवामान, सोसाटय़ाच्या वाऱ्याचाही केसांवर दुष्परिणाम होऊ शकतो.

 शेडिंग नि केसांच्या गळतीविषयी
हेअर स्टायलिस्ट रोज साधारणपणे ५०-१०० केसांना शेड करतात. सामान्यत: या शेड केलेल्या केसांना नवीन केस रिप्लेस करतात आणि ते वाढतात. केस गळतीमागचं नेमकं कारण अनेकदा कळू शकत नाही. काही वेळा ताणामुळेही केस गळू शकतात. पण चांगलं आरोग्य असणाऱ्या व्यक्तीचे केसही चांगले असतात. समतोल आहार आणि केसांची योग्य प्रकारे निगा राखल्यानं केसांची काळजी घेता येऊ शकते.

हेअर कलर लावताना काय काळजी घ्यावी?
केसांना रंग लावणं ही एक रासायनिक प्रक्रिया असल्यानं ते करताना केसांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी योग्य कलर केअर श्ॉम्पू, कंडिशनरचा वापर करावा. त्यांसह बदाम तेलाच्या वापरामुळे रंगवलेल्या केसांची काळजी घेता येते. रंग लावल्यावर केसांची खूप काळजी घ्यावी लागते. घरीच रंग लावताना योग्य ती काळजी न घेतल्यास केस निस्तेज होणं, कोरडे होणं, दुभंगणं अशा गोष्टी घडू शकतात.

सगळ्यांना समान श्ॉम्पू नि कंडिशनर का चालत नाहीत?
प्रत्येकाच्या केसांचा पोत वेगळा असतो. अशा भिन्न भिन्न प्रकारच्या केसांच्या रिक्वायरमेंटस् वेगळ्या असतात. केस कोरडे, तेलकट, कुरळे, निस्तेज, डॅमेज, रंगीत आणि किती तरी प्रकारचे असतात. म्हणून त्यांची काळजी घेण्याची पद्धत, त्यांची ट्रीटमेंट विशिष्ट प्रकारची असते. आपल्या केसांचा प्रकार ओळखून त्यांना सूट होणारा श्ॉम्पू वापरायला हवा. तोच प्रकार कंडिशनरच्या बाबतीत करावा. कंडिशनरमुळे केस मऊसूत, चमकदार राहतात. केसांच्या मुळांशी तेल लावल्यानं ते डॅमेज होत नाहीत. या पद्धतीनं सरळ केसांची निगा राखता येते. फक्त योग्य प्रॉडक्टची निवड करणं गरजेचं आहे. केमिकल ट्रीटमेंट करण्यात आलेल्या केसांची काळजी वेगळ्या पद्धतीनं तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घ्यावी लागते.

केमिकल वापरून सरळ केलेल्या केसांविषयी
केमिकल वापरून सरळ केलेल्या केसांची अतिशय काळजी घ्यावी लागते. केमिकल्स वापरून केस सरळ  करून घेणाऱ्यांना या केसांना खूप जपावं लागतं. त्यासाठी योग्य प्रकारे केसांची निगा राखणं नि वेळोवेळी हेअर एक्स्पर्टचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

ड्राय फ्लकी स्काल्पची समस्या दूर होऊ शकते?
स्काल्प कोरडा होऊन त्याचे पातळ पापुद्रे निघू शकतात. थंडीच्या दिवसात तीव्र रासायनिक हेअर प्रॉडक्टस् वापरणं, अ‍ॅण्टी डॅण्डरफ श्ॉम्पूचा भडिमार करणं यामुळे त्वचेवर परिणाम होऊन ती कोरडी होते. त्यासाठी योग्य श्ॉम्पूची निवड करणं नि केस कोरडे पडू न देणं आवश्यक आहे.

केसांच्या पोषणासाठी आवश्यक घटक कोणते?
केसांना मिळणाऱ्या योग्य पोषणामुळे ते न गळता उलट स्ट्राँग, जाड आणि तजेलदार होतात. समतोल आणि योग्य प्रमाणातल्या पोषक घटकांनी, चांगल्या दर्जाच्या हेअर केअर प्रॉडक्टस्नी केसांची चांगली वाढ होऊन त्यांची निगा राखता येऊ शकते. प्रोटिनयुक्त आहार घेण्यानं फायदा होऊ शकतो. मासे, धान्य, हिरव्या भाज्या, पालेभाज्या आणि फळांचा समावेश आहारात करणं महत्त्वाचं आहे. केसांच्या चांगल्या वाढीसाठी आणखीही काही घटकांची गरज असते. मात्र त्यांचा समावेश रोजच्या आहारात न करता ते पूरक म्हणूनच घ्यावं. त्यामुळे केसांना योग्य ती पोषक द्रव्यं मिळतात आणि ते डॅमेज होत नाहीत.

हटके स्टाइल
हॉलीवूड नि बॉलीवूडमध्ये अनेक स्टार्स सध्या वेणी घालून वावरताना दिसतील. हो वेणीच.. पण ती आपल्यासारखी काकूबाई स्टाइल नव्हे, तर एकदम हटके स्टाइल.. या स्टाइलला Sex Kitten Braid असं म्हटलं जातं. सध्या अशा प्रकारची हेअर स्टाइल करण्याचा आणि ती मिरवण्याचा ट्रेण्ड जगभर आहे. खांद्याएवढे किंवा त्याहून अधिक लांब केस असणाऱ्या मुलींना ही स्टाइल सॉलिड सूट होते. केस अगदी सरळसोट असतील तर त्यांना कìलग आयर्नच्या साहाय्यानं थोडंसं का होईना कुरळे केल्यासारखं करा.
या लूकची लोकप्रियता लक्षात घेता ही हेअर स्टाइल करण्यासाठी त्यात मास्टरी असावी, असं वाटलं तर नवल नाही, पण फिमा दी विल्सचं हेअर स्मूिदग सेरम वापरून हे काम सोप्पं होऊन जाईल. हेअर स्टायलिस्ट सपना म्हणतात की, आपण कितीही घाईत असलो, तरीही हा कॅज्युअल तरीही दिमाखदार लूक झटकन करू शकतो.
या लूकमध्ये केसांचा पोत महत्त्वाचा ठरतो. कारण केसांच्या पोतावरच या हेअर स्टाइलचा लूक ठरतो. टोटल डॅमेज हेअर सेरमचा वापर करून किंवा कलर हेअरसाठी कलर डॅमेज सेरमचा वापर करून हा लूक आणता येईल. केसांची अप्पर लेव्हल मऊ हवी आणि मग वेणी घालण्यासाठी हेअर स्प्रेचा वापर केला जातो.

स्टायलिश वेणी
* कंडिशिनग स्प्रे किंवा टोटल डॅमेज सेरम प्रत्येक केसाला लावा. त्यामुळे केस चमकदार होतील. मग साइड पार्ट करा. सगळे केस एका बाजूला घेऊन एक लो पोनिटेल घाला. त्यांना मानेपाशी बेस मिळेल असं बघा.
* फिशटेल वेणी घालताना पोनिटेलचे चक्क दोन भाग करा. एक भाग धरून ठेवा नि दुसऱ्या भागातल्या बाहेरच्या बाजूचे थोडे केस नि आधी हातात धरून ठेवलेले केस एकत्र करून पेड घ्या. मग पुन्हा दोन्ही भागांतले केस घेऊन आणखी पेड घ्या नि मग नेहमीसारखी वेणी घालून तिला इलॅस्टिक बॅण्डही लावा.
* या वेणीला भारी फिल येण्यासाठी वेणी घातली आहे, त्या भागातले केस हळुवार हातानं थोडेसे हलवा म्हणजे एक मेसी लूक येऊन ते केस थोडेसे खांद्यापर्यंत येतील.
* एवढं सगळं झाल्यावर आपली हेअरस्टाइल तय्यार. हो, पण ती तशी ठेवण्यासाठी हेअर स्प्रेचा वापर आठवणीनं करा. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेणी घालायच्या आधी केस विंचरून वगरे अजिबात घेऊ नका. म्हणजे या स्टाइलचा मेसी लूक तस्साच राहू शकेल. सेरम लावताना बोटांनीच केसांतला गुंता सोडवा नि मग वेणी घाला. ही स्टायलिश वेणी घालून मत्रिणींत मिरवून घ्या नि मोठय़ांकडून कौतुकही करून घ्या.