‘ट्रॅव्हल लाइट’ हा फंडा आपल्याला माहिती असतो, पण प्रत्यक्षात बॅगा वाढतातच. मिक्स अ‍ॅण्ड मॅचची युक्ती वापरली तर कमी जागेत भरपूर पर्याय बरोबर नेता येतील. त्यासाठीच काही महत्त्वाच्या टिप्स..

मे महिना.. त्यात बाहेर आग ओकणारा सूर्य. कॉलेजला सुट्टी मिळाली आहे, रिझल्ट्स लागूनही बरेच दिवस झालेत आता. म्हणजे घरातले ‘सत्कारसमारंभ’ पण उरकले आहेत. अशा वेळी डोक्यात एकच विचार असतो.. ट्रीपचा प्लॅन. किती दिवस कॉफीशॉपमध्ये केवळ एसी आणि वायफायसाठी ठाण मांडून बसणार? बाहेर पडायला हवंच ना! ट्रीप किंवा आउटडोअर अ‍ॅक्टिव्हिटीजचे प्लॅन्स होतात आणि त्याची तयारी सुरू होते. ट्रीपचा विषय आला म्हणजे कपडय़ांचं पॅकिंग आलंच. दरवेळी आपण मनात म्हणतोही, ‘मी यावेळी ट्रीपसाठी कमीतकमी कपडे नेणार’. पण ट्रीपच्या दिवशी आपल्याच दोन-तीन बॅग्स कशा झाल्या हा प्रश्न पडतो. तरी मनात ‘अरे तो लाल टॉप घ्यायचा राहिलाच’ हे चालू असतंच. ट्रीपला जाताना कमीतकमी आणि गरजेपुरत्या सामानासोबत प्रवास करणे सोयीचेही असते, आपल्याला ठाऊक असतं पण जमत नाही. त्याबद्दल आज थोडं बोलू या.
पॅकिंग करताना तुमची बॅग समोर असू द्या. तुमच्या बॅगेच्या आकारानुसार कपडय़ांचे नियोजन करणं गरजेचं आहे. नाहीतर शेवटच्या क्षणी नवी बॅग घ्यावी लागते किंवा आईच्या बॅगेत कपडे घुसविण्यासाठी तिला विनवण्या कराव्या लागतात. ‘गो सिंपल’ हा मंत्र ट्रीपचं पॅकिंग करताना कसोशीनं पाळा. वजनाला हलके, सुटसुटीत कपडे बॅगेत असू दे. विशेषत: खास ट्रीपसाठी ऐनवेळेची खरेदी टाळा. त्यांच्या फिटिंगबद्दल फसगत होण्याची शक्यता असते. नवीन शूज घेतले तर चावण्याची शक्यता असते. ट्रीपभर त्याचा त्रास सतावू शकतो. त्यामुळे ट्रीपला नेण्याचे कपडे, शूज किमान महिनाभर वापरलेले असू दे. पण तरी हे कपडे अति जुने नसतील याचीही काळजी घ्या. ‘शॉर्ट बीचवर घालून नंतर टाकून दिली तरी चालेल’, असा विचार करून जुने टीशर्ट पॅक कराल आणि ऐन वेळी कपडे उसवले तर फसगत होईल.
ट्रीपचं पॅकिंग करताना कमी कपडे वेगवेगळ्या पद्धतीने कसे वापरता येतील, याचं नियोजन करा. मिक्स अ‍ॅण्ड मॅचचा फंडा इथे कामाला येईल. शक्यतो कडक इस्त्रीची गरज असणारे कपडे ट्रीपसाठी वापरणे टाळा. कारण चुरगळल्यावर ते तुम्हाला परत वापरता येणार नाहीत. तुम्ही फिरायला जाणार आहात त्या जागेची पूर्ण माहिती असू दे. विशेषत: तिकडच्या तापमानाची. टूर कंपनीसोबत जाणार असाल तर त्यांच्याकडे मागच्या वर्षीच्या किंवा आधीच्या बॅचचे फोटो असतात. त्यात लोकांनी काय कपडे घातलेत यावरून तुमच्या पॅकिंगचा अंदाज घेता येईल. एकटय़ाने प्रवास करणार असाल तर तुमच्या हॉटेलमध्ये वातावरणाची चौकशी करून घ्या. थंड प्रदेशात जॅकेट्स, उन्हासाठी कॅप, स्कार्फ हवंच. ट्रीपला ज्वेलरी नेणं टाळाच. सोन्याचे दागिने हरवण्याची भीती असते. दिवसभर प्रवासादरम्यान दागिने टोचत राहतात त्यामुळे तुमचे स्टेटमेंट नेकपीस, ब्रेसलेट तिथे घालायची संधी मिळणार नाहीत. काही छोटय़ा, पण महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवल्या तर तुमचं पॅकिंग सहज, सुटसुटीत होईल.

Bank Holiday in May 2024 in Marath
१ मे शिवाय कोणत्या दिवशी बँकेचं काम होणार नाही? अक्षय्य तृतीयेला बँक बंद असणार का? पाहा सुट्ट्यांची यादी
how to make fish egg omelette Fish egg recipe in marathi
झटपट नाश्त्यासाठी बनवा “माशाच्या अंड्याचे ऑमलेट” लहान मुलंही खातील आवडीने
enforcement directorate contact with apple to check kejriwal s mobile
केजरीवाल यांचा मोबाइल तपासण्यासाठी ‘अ‍ॅपल’शी संपर्क; मद्यधोरण गैरव्यवहारप्रकरणी ईडीचे पुढचे पाऊल  
Use coco peat to flower your home garden
घरातील बाग फुलवण्यासाठी वापरा कोकोपीट, घरच्या घरी कसे तयार करावे कोकोपीट

* थंड ठिकाणी जाताना शक्यतो स्वेटर, जॅकेट अशा जाड कपडय़ांऐवजी लेअरिंगला प्राधान्य द्या. गंजी किंवा टी-शर्टवर एखादा शर्ट त्यावर श्रग असे प्रयोग करता येतील. हेच कपडे वेगवेगळ्या कॉम्बिनेशनने वापरता येतील. दर वेळी नवीन घातल्यासारखंही वाटेल.
* कपडय़ांचे रंग, प्रिंट्स कोणते हवे, याबद्दल कोणतेच नियम नाहीत. पण शक्यतो न्यूट्रल शेडचे कपडे घेतल्यास कॉम्बिनेशन्स करणं सोपं जातं. फंकी प्रिंट्सपेक्षा सटल प्रिंट्स निवडा. विशेषत: वेगळ्या देशात जाताना कपडय़ांवरील प्रिंट्स, कॅच लाइन आक्रमक नसतील याची काळजी घ्या. त्या देशाच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीला साजेसे कपडे असू दे.
* ट्रीपला स्कर्ट, पलाझो ऐवजी ट्रॅकपँट, जीन्स, केप्री हे जास्त उपयोगी येतात. कारण पँट्स तुम्ही जास्तीतजास्त दिवस वापरू शकता. स्कर्ट तितक्या सहजतेने पुन्हा वापरता येणार नाही. तसेच पँट्सवर तुम्हाला कॉम्बिनेशन्सचा फारसा विचार करावा लागत नाही.
* हॉट पँट्स, क्रॉप टॉप, श्रग, शॉर्ट केप्री, शॉर्ट कॉटन पँट, फिटेड टॉप हे तुमच्या बॅगेतले राखीव भिडू आहेत. कठीण समयी कामी येतात आणि वजन, जागा अगदी कमी व्यापतात.
* स्लीव्हलेस स्वेटर, झिपर असलेल्या शॉर्ट जी चेन लाऊन लांब ट्राउझर्सही करता येते, रिव्हर्सेबल श्रग किंवा जॅकेट असे कपडय़ांचे प्रकार वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येतीत. ते कलेक्शनमध्ये असतील तर ट्रीपसाठी अवश्य घ्या.
* कॉलेजला जाताना आपल्याला रोज वेगवेगळ्या चपला, शूज घालायची सवय असते. पण ट्रीपला हे टाळा. एकतर शूज वजनाने जड असतात. त्यामुळे बॅगेत भरण्यापेक्षा ते घालून बॅगेत एखाद-दोन हलक्या चपलांचे जोड ठेवा. बाहेर घालायच्या चपला हॉटेलच्या रूमवर वापरायला हरकत नसते. त्यामुळे त्यासाठी जादाचा जोड घ्यायची गरज नाही.
* समुद्रकिनारी, वॉटरपार्कला एक प्रकार सर्रास दिसतो. पाण्यात भिजल्यावर कपडे अंगाला चिटकतात. त्यात फिकट, पारदर्शी कपडे ओले झाल्यावर अधिकच वाईट दिसतात. तसेच इलॅस्टिकच्या पँट्स लूझ होतात. बॉक्सर्स शॉर्ट दिसतात, कुर्ता- लेगिंग कसा कुठे वळतो हे दिसत नाही. क्रॉप टॉपची बिकिनी होते. हे प्रकार तुम्हालाच नाही, तर तुमच्या सहप्रवाशांनाही अवघडून टाकतात. त्यामुळे अशा ठिकाणी वापरायच्या कपडय़ांबाबत जागरूक असणे गरजेचे आहे.
* सगळ्या समुद्रकिनाऱ्यांवर स्वीमिंग कॉस्च्युम्स किंवा बिकिनी घालू शकत नाही. पण डेनिम हॉट पँट्स, केप्रीज, सायकलिंग टाइट्स, ट्रॅकपँट पाण्यात जाताना नक्कीच वापरू शकता. शक्यतो गडद रंगाचे कपडे या प्रसंगी वापरा.