पावसाळा संपल्यावर येणारा ऋतू म्हणजे हिवाळा. गुलाबी थंडीची चाहुल लागताच आपण वॉर्डरोबमधुन अगदी शेवटच्या कप्प्यात टाकलेले गरम कपडे घालण्यासाठी बाहेर काढतो. खाण्यातही आपल्याला गरमागरम सूप किंवा क्रिस्पी, चमचमीत खावंसं वाटु लागतं. पण यासर्वात एक गोष्ट मात्र आपण विसरतो ती म्हणजे स्किन केअर. गुलाबी थंडीचं स्वागत करताना ग्रुमिंगही करायला नको का, या ग्रुमिंगमुळे थंडीची मजा अधिकच लुटता येऊ शकते.

थंडीत त्वचेची काळजी कशी घ्याल?
* थंडीच्या सिझनमध्ये त्वचा अधिक कोरडी पडते, त्यामुळे खास थंडीत तुमच्या त्वचेला सुट होईल अशी क्रिम किंवा लोशन लावावे. जेणेकरून तुमची त्वचा ऑफ्ट राहु शकेल.
* अंघोळ करताना पाण्यात थोडे तेलाचे थेंब टाकावेत. जेणेकरून त्वचा कोरडी पडणार  नाही.
* शक्यतो या दिवसामध्ये लोकरीचे कपडे किंवा त्यासारखं मटेरिअल असणारे कपडे
वापरावेत. म्हणजे त्वचा कोरडी पडणार नाही.
* हाताची त्वचा कोरडी पडु नये म्हणुन क्रिम किंवा लोशन लावुन त्यावर ग्लोज घालावेत.
* हिवाळ्यात शक्यतो भिजलेले सॉक्स वापरु नयेत. यामुळे सर्दी होण्याची शक्यता असते.
* तुमचे पाय कोरडे पडु नयेत म्हणुन फुट लोशन्स किंवा क्रिम लावावी.
* थंडीत पेडीक्युअर किंवा मेनीक्युअर करणं हे केव्हाही बेस्ट.
* मुख्य म्हणजे थंडीत स्पा आणि फेशियल ट्रिटमेंट घेतल्यास आपली त्वचा अधिक
तजेलदार होते.
* आजच्या घडीला अनेक स्पामध्ये खास थंडीच्या सिझनमध्ये त्वचेला सूट होतील असे मसाज ऑइल्स वापरले जातात.
* थंडीत अनेकदा आपण खुप कडक गरम पाण्याने अंघोळ करतो. हा आपला गैरसमज आहे हे आपल्याला माहित नसल्याने आपण ही चूक करत असतो. थंडीत
खूप कडक पाण्याने अंघोळ केल्यामुळे त्वचा अधिक ड्राय होण्याची शक्यता असते.
* थंडीत बॉडीला स्क्रब करणं हे केव्हाही उत्तम. परंतु स्क्रबरचा वापर वरचेवर करु नये.
* साबणाने त्वचा अधिक ड्राय होण्याची शक्यता असते. तेव्हा साबणापेक्षा लिक्विड सोप्स वापरणं हे केव्हाही हितावह.
* थंडीच्या दिवसात रात्री झोपताना क्लिझिंग मिल्कने चेहरा स्वच्छ करावा.
* ड्राय स्किनसाठी अलीकडे बाजारात काही औषधाच्या गोळ्याही मिळु लागलेल्या
आहेत. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या गोळ्या घेणं उत्तम.
* पाय खुप फुटत असतील तर कोमट पाण्यात रोझ वॉटर घालुन त्यात पाय थोडा वेळ
ठेवावे.
* थंडीत हात खुप ड्राय पडत असतील तर अगदी घरच्या घरी करावयाचा उपाय म्हणजे
टॉमेटोचा ज्युस हाताला लावावा.
* थंडीच्या दिवसात मसाज घेणं हे सर्वात उत्तम.
* हाताची काळजी घेण्यासाठी लिंबाचा रस हाताला लावणं हे केव्हाही श्रेयस्कर.
* बाहेर जाताना पर्समध्ये बॉडी लोशन किंवा क्रिम न विसरता ठेवावी.
* अनेक पार्लरमध्ये फ्रुट ज्युसने मसाज केला जातो. या मसाजची व्यवस्थित माहिती घेऊनच हा करण्यासाठी जावे.
* थंडीत केसांची काळजी कशी घ्याल
* थंडीत केस खुप ड्राय आणि निस्तेज होतात. केसांना तेल लावताना ते कोमट करुनच लावावे.
* रोज रात्री झोपताना हलक्या हाताने तेल लावुन मसाज करावा.
* वेळ असल्यास केसांना वाफ द्यावी.
* केसांना शक्यतो या दिवसात कंडीशनर लावुनच बाहेर पडावे.
* केसांचा कंगवा स्वच्छ ठेवावा आणि बाहेर जाताना पर्समध्ये कंगवा आणि जेल ठेवावे.
* ओले केस घेऊन बाहेर जाऊ नये. त्यामुळे केस गळण्याचा अधिक संभव असतो.
* रोज केस धुवू नयेत. यामुळे केसाची नैसर्गिक चमक नाहीशी होते.
* खुप गरम पाणी डोक्यावरुन घेऊ नये. यामुळे केसांना हानी पोहोचण्याची शक्यता अधिक असते.
ओठांची काळजी
* लोणी लावुन ओठांना मसाज करावा.
* लिप लोशन किंवा लिप बाम लावुनच बाहेर पडावे.
* लिप बाम्समध्ये अलीकडे खुप विविध फ्डेवर्स उपलब्ध आहेत त्यांचा वापर करावा.
* आहारात स्निग्ध पदार्थाचा समावेश थंडीच्या दिवसात अधिक करावा.
* थंडीच्या दिवसात मॉइश्चराइजर टिकून राहतील अशा लिपस्टीक्स बाजारात उपलब्ध
आहेत त्याच वापराव्यात.
* ओठांवर पपईची पेस्ट लावुन ठेवावी किंवा साय लावावी. यामुळे ओठ मऊ होतात.
* मॅट शेडस्च्या लिपस्टिक लावुन त्यावर लिप ग्लॉस लावावे.

Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू