स्वातंत्र्याचा सर्वात जास्त आनंद आम्हाला सोशल साइट्सवर घेता येतो, कारण तिथे ना कसली बंदी असते ना कसली भीती! पण एखादी गोष्ट शेअर केल्यानंतर त्याचे काय परिणाम होतील हा विचार आम्हा तरुणाईनी केला तरच आमचं हे स्वातंत्र्य कायमचं बंधनाशिवाय राहणार याची जाणीव आता व्हायला लागली आहे.

‘व्हॉट्स ऑन युवर माइंड’ या फेसबुकच्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय आमचा दिवस काही सुरू होत नाही. ‘मी आज नवीन पर्स घेतली.. (फििलग हॅप्पी)’ पासून ‘अमुक-अमुक देशात काहीतरी घडलं!’ पर्यंतचे विविध प्रकारचे स्टेटस अपडेट जवळ-जवळ प्रत्येक मिनटाला कोणी ना कोणी करतच असतं. त्यामुळे आम्ही अर्थातच मोठय़ांच्या भाषेत ‘आजची तरुण पिढी’ सोशल साइट अॅडिक्ट आहोत आणि ते खरंही आहे.
फेसबुक, ट्विटरसारख्या साइट्समुळे व्हच्र्युअली आम्ही खूप सोशल आहोत. मनात एखादा विचार आला की, तो सगळ्यांसोबत शेअर करण्याचं आम्हा तरुणाईचं हक्काचं ठिकाण म्हणजे या सोशल नेटवìकग साइट्स. स्वातंत्र्याचा सर्वात जास्त आनंद आम्हाला सोशल साइट्सवर घेता येतो, कारण तिथे ना कसली बंदी असते ना कसली भीती! एखादी गोष्ट आवडली तर त्याबद्दल आम्ही खूप चांगलं लिहितो, ते लाइक करतो, पण जर एखादी गोष्ट आवडली नाही तर त्याचा तेवढाच कदाचित जास्तच निषेधही करतो. संविधानानी दिलेल्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचा खरा उपयोग तर आम्ही करतो व्हाया सोशल नेटवìकग.
तरीही काही घटनांमुळे ‘उगाच भलतं काही शेअर किंवा लाइक करू नकोस हा.. नंतर प्रॉब्लेम नकोत!’ असा एक घरच्यांचा सूर यायला लागलाय. पण आमचे स्वतचे विचार खुलेपणाने मांडण्याचा हा आमचा हक्काचा कट्टा आहे.’ मला हे पोस्ट करायचंय आणि ते मी करणार.’ अशी काहीशी आमची विचारसरणी झाली आहे, कारण आमच्यासाठी स्वातंत्र्याचा अर्थ ‘हवं ते करणं’ असा आहे कदाचित. अर्थात, आमच्या या दृष्टिकोनामुळे कधी कधी झोलसुद्धा होतात. एखाद्या मित्र किवा मत्रिणीच्या फोटोवर विचार न करता मजेत केलेल्या कमेंट्समुळे तो मित्र किवा मत्रीण हर्ट होते, कधी-कधी शेअर केलेल्या एखाद्या पोस्टमुळे काहींच्या भावना दुखावल्या जातात तर कधी कधी दंगे, जाळपोळ यासारखे सीरियस इश्यूसुद्धा होण्याची शक्यता असते. सोशल नेटवर्किंगमुळे काही देशांत क्रांती झाल्याची, तर काही ठिकाणी अनागोंदी माजल्याची उदाहरणं आता दिसायला लागली आहेत.
असं असलं तरी दुसरीकडे मात्र काही गोष्टी, घटना शेअर केल्यामुळे सोशल अवेअरनेस वाढतो. सो, आमचं सोशल नेटवìकगवरचं स्वातंत्र्य उपभोगणं चुकीचं अजिबात नाहीये. फक्त गरज आहे ती थोडा विचार करण्याची. ‘आपण एखादी गोष्ट शेअर केल्यानंतर त्याचे काय परिणाम होतील’ हा विचार आम्हा तरुणाईनी केला तर आमचं हे स्वातंत्र्य कायमच कोणत्याही बंधनाशिवाय अबाधित राहील.