‘व्हिवा लाउंज’ला उपस्थित प्रेक्षकांपैकी अनेकांना आपल्या ‘स्टाइल आयकॉन’शी बोलायची संधी मिळाली.  कुणाला तिचा स्पष्टवक्तेपणा भावला तर कुणाला तिचा सरळ स्वभाव! पडद्यावरच्या सई ताम्हणकरचे प्रत्यक्षातले विचार ऐकायची आणि तिच्या आत्मविश्वासाचे रहस्य जाणून घ्यायची संधी या दिलखुलास गप्पांमुळे मिळाली, अशीच बहुतेकांची भावना होती.  v10
(शब्दांकन : कोमल आचरेकर, लीना दातार)

v12आधी माझ्या मनात इतरांसारखीच सईची बोल्ड अभिनेत्री अशीच प्रतिमा होती. पण तिच्या बोलण्यातून तीही कुठल्याही सामान्य मुलीइतकीच जवळची वाटली. तिचा आत्मविश्वास तिला इतरांपेक्षा वेगळं करतो असं मला वाटतं. ‘व्हिवा’ला मनापासून धन्यवाद द्यायचेत. आज व्हिवा लाउंजमुळे मी माझ्या आवडत्या अभिनेत्रीला जवळून पाहू शकले.
-सृष्टी सावंत

मोठय़ा पडद्यावर दिसणारी, सेलेब्रिटी असणारी सई अॅक्च्युअल लाइफमध्ये कशी असेल याबद्दल उत्v13सुकता होतीच. पण तिला पाहून, भेटून आनंद झाला. मनमिळावू आणि स्ट्रेट फॉरवर्ड वाटली. एक सेलेब्रिटी म्हणून तिचं तसं असणं खूप भावतं, पण ती चारचौघींसारखी कॉमनगर्ल आहे त्यामुळे ती खूप खरी वाटली. एक रोल मॉडेल म्हणून मी तिला पाहते.
-रुची खडताळे

v14सई ही माझी मराठीतली फेवरेट हिरॉईन आहे. तिची पर्सनॅलिटी खूपच स्ट्राँग आहे. तिचा ड्रेसिंग सेन्स नेहमीप्रमाणेच भावला. तिचं बोलणं खूप एनकरेजिंग ठरलं. त्यामुळे अभिनय क्षेत्रातल्या करिअरबद्दलच्या गैरसमजुती दूर झाल्या. हा खूप मस्त अनुभव होता.
-क्षितिजा सावंत

 

v16मला कार्यक्रम खूप छान वाटला. सईने अनुभव शेअर केले त्यातून तिचा धाडसीपणा दिसून आला. या झगमगत्या दुनियेत अभिनयाच्या क्षेत्रात काम करायला एक मुलगी म्हणून पालक पाठवायला कचरतात, पण मुलींनी ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात करिअर घडवावं नि पालकांनाही ते पटवून द्यावं की, आपण काम करू शकतो. एकप्रकारचा आत्मविश्वास तिच्या बोलण्यातून मिळाला.
-दीपिका देशमुख

व्हिवा लाउंजमधल्या सईबरोबरच्या गप्पा खूप छान वाटल्या. सई आधी अभिनेत्री म्हणून आवडत होतीच. v15आजच्या गप्पांनंतर एक व्यक्ती म्हणूनही आवडली. मला विचारांनी सईसारखं व्हायला आवडेल.
ऋतुजा म्हात्रे

 

v17सई ताम्हणकर खऱ्या अर्थाने चतुरस्र अभिनेत्री वाटते. अभिनयाइतकंच दिसण्यालाही ती महत्त्व देते. तिचा प्रामाणिकपणा, बिनधास्त स्वभाव या गोष्टी भावल्या. एक स्वतंत्र स्त्री म्हणून ती खूप आवडली. माझ्या अनेक मैत्रिणींना सईसारखं असावं, दिसावं असं वाटतं ही गोष्ट नक्कीच स्तुत्य आहे.
-मनीष साळगावकर