देशभरातल्या फॅशन विश्वाचे लक्ष असलेला लॅक्मे फॅशन वीक समर- रिसॉर्ट २०१५ नुकताच मुंबईच्या पॅलेडियम हॉटेलमध्ये साजरा झाला. नेहमीप्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक तारे यंदाही रॅम्पवर झळकले. अनेक डिझायनर्सच्या शो स्टॉपर सेलेब्रिटी होत्या.  कित्येकदा डिझायनर्स आपल्या कलेक्शनला साजेशा अशा बॉलीवूड चेहऱ्याला रॅम्पवर आपलं कलेक्शन सादर करण्यासाठी आमंत्रित करतात. यंदाच्या फॅशन वीकमध्ये श्रद्धा कपूर, नर्गिस फाक्री, करिश्मा कपूर, कल्की कोच्लिन, इलियाना डिक्रूझ, शाहिद कपूर, अर्जुन कपूर अशा विविध तारेतारकांनी शो स्टॉपर म्हणून हजेरी लावली होती. ग्रँड फिनालेची शो स्टॉपर लॅक्मेची ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसीडर करीना कपूर होती.
ग्रँड फिनालेला डिझायनर अनामिका खन्नासाठी रॅम्प वॉक करताना करीनाचा भरीव नक्षीकाम केलेला क्रॉप टॉप आणि ब्लॅक धोती लक्ष वेधून घेत होती. त्यावर सफेद दुपट्टा आणि मरून लिपस्टिक ‘फिनाले’च्या शो स्टॉपरचा लुक पूर्ण करत होतं. श्रद्धा कपूर दोन वेळा शो स्टॉपर म्हणून हजर होती. डिझायनर ध्रुव कपूरच्या शोमध्ये ब्लॅक स्ट्रेट फिट गाऊनमध्ये ती दिसली आणि ‘मिस बेनेथ’ ब्रॅण्डसाठीही तिने रॅम्पवॉक केला. अक्षरा हसनचा हा पहिलाचा रॅम्प वॉक होता. त्यात तिला गाऊन आणि ज्वेलरी सांभाळताना आलेला अवघडलेपणा तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून आला.
या वेळी लॅक्मे फॅशन वीकमध्ये फॅशन शोच्या थीम लक्षवेधी ठरल्या. स्त्री-पुरुष समानतेचे संदेश डिझाईन्समधून देण्यात आले.

vd01(डावीकडून) १. कल्की कोच्लिन सिम्पल व्हाइट ड्रेसमध्ये स्मार्ट दिसली. २. चित्रांगदाचा लेअर स्कर्ट लुकअतिरिक्त ज्वेलरीपुढे फिका पडला. ३. नर्गिस फाक्री डिझायनर लाल लहेंग्यामध्ये तर ४. सोहा अली खान सिम्पल प्रिंटेड स्कर्टमध्ये आकर्षक दिसत होती.  ५. ग्रँड फिनालेची शो स्टॉपर करीना कपूर होती. ६. दिया मिर्झाने राखाडी रंगाची साधी, पण सुंदर खादीची साडी नेसून सर्वाच्या नजरा वेधल्या.