मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
हॅलो, व्हिवाच्या मिकीज् फिटनेस फंडा या कॉलमच्या माध्यमातून आता दर शुक्रवारी आपली भेट होणार आहे. गेली कित्येक वर्षे फिटनेस या विषयाला मी वाहून घेतले असल्याने फिटनेस आणि माझा आता ऋणानुबंध निर्माण झालेला आहे. फिट राहाणं ही आता काळाची गरज झालेली आहे. शिवाय तुम्ही फिट असल्यावर प्रेझेंटेबल आपोआप दिसू लागता. त्यामुळेच फिटनेस हा विषय आता आपण थोडा सीरियसली घेऊया. खासकरून कॉलेजिअन्समध्ये फास्टफूडचे प्रमाण वाढू लागलेलं आहे. त्यामुळे नको त्या व्याधींना फारच लहान वयात सामोरं जावं लागतंय.
आता तुम्ही म्हणाल हे फिटनेसचं पुराण नको बापरे.. फिटनेस म्हणजे खूप क्लिष्ट गोष्ट आहे. हे मुख्य म्हणजे डोक्यातून काढून टाका. म्हणजे खूप गोष्टी सोप्या होतील.
फिटनेस म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुम्ही अलीकडे प्रयत्त्न करताय हे ठाऊक आहे मला. फिटनेसच्या मागे धावणारे अनेकजण पाहायला मिळतात, तरीही फिटनेस काही त्यांच्या वाटय़ाला येत नाही. फिटनेस म्हणजे तंदुरूस्ती ही एका दिवसात किंवा एका महिन्यात मिळणारी गोष्ट नाही. स्वस्थ आरोग्याची गुरूकिल्ली ही आपल्या शरीरातील अनेक गोष्टींवर अवलंबून असते. तुमचा स्टॅमिना आणि तुमचं आरोग्य या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. शिवाय तुमची रोगप्रतिकारकक्षमता किती आहे या अशा अनेक गोष्टी फिटनेसच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. तरच तुम्ही फिट आहात असे आपण म्हणूयात. पण आपल्यापैकी प्रत्येकाला काही ना काही दुखणे हे असतेच. ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांसाठी पाठदुखी ही पाचवीला पुजल्याप्रमाणे मागे लागलेली असते. प्रत्येकाच्या कामाप्रमाणे किंवा व्यापाप्रमाणे त्याचे प्रॉब्लेम्स निराळे असतात.
फिटनेस मंत्र
१. नेहमी योग्य तो व्यायाम करून उत्तम आणि संतुलित आहार घ्या.
२. योगा आणि श्वसनाचे व्यायाम हे सर्वात उत्तम. यामुळे आपल्या शरीराला खूप फायदा होतो.
३. तुम्हाला आवडेल तो व्यायाम करा. तसेच तुम्हाला जिममध्ये जाऊन व्यायाम करणं शक्य नसल्यास घरच्या घरी व्यायाम करण्याची तयारी ठेवा आणि मुख्य म्हणजे सातत्य ठेवा.
४. तुमच्या आहाराच्या सवयी ह्य़ा शरीर स्वस्थ ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे या सवयींवर र्निबध हवा.
५. अलीकडे पूरक जीवनसत्त्वे आणि त्याअनुषंगाने इतर अनेक गोष्टी घेण्याचे मोठे खूळ निर्माण झालेले आहे. त्यापेक्षा नैसर्गिक वाटांचा अवलंब करावा.
६. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करण्यावर भर द्या केवळ कुणीतरी सांगतंय म्हणून फिट राहण्यासाठी त्या मार्गावर जाऊ नका.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा


















