मेक-अप करताना काय काळजी घ्यायची, सौंदर्यप्रसाधनं कोणती वापरायची, मेक-अप बेस कसा असावा, आधी काय लावायचं, कसं लावायचं अशा अनेक शंका मनात असतात. त्यांचं समाधान करणारी लेखमालिका.
एकाच पद्धतीने आय शॅडो लावल्यास लुकमधे तोचतोपणा येतो. बऱ्याच जणी नेहमी एकाच प्रकारचे रंग आणि प्लेसमेंट्स वापरत असतात. कारण त्यांना तो प्रकार आवडत असतो किंवा तो प्रकार त्यांच्या डोळ्यांना सूट करतो, असं नाही तर आयशॅडो लावायची तेवढी एकच पद्धत माहिती असते. नवीन काही ट्राय करण्याच्या प्रयत्नात बऱ्याच चुका होतात. म्हणूनच आयशॅडोमध्ये प्रयोग करू इच्छिणाऱ्यांसाठी काही मुख्य प्रकार आज देत आहोत. आयशॅडो प्रथमच लावणाऱ्यांनी हे प्रकार एकदम ट्राय करण्याऐवजी सुरुवात नेहमीच्या पद्धतीच्या प्लेन शॅडोनं करावी.
फॅन शेप :
यालाच डिव्हायडेड इन थर्ड्स असेही म्हणतात. कारण या प्रकारात साधारणपणे पापण्यांचे तीन भागांत विभाजन केले जाते. तीन भागांत एकाच रंगाच्या तीन शेड्स वापरल्या जातात. फिकट, मध्यम आणि गडद असा क्रम असतो. डोळ्यांच्या आतील बाजूस फिकट, नंतर मध्यम आणि बाहेरील बाजूस गडद शेड वापरावी. यासाठी फ्लॅट स्टिफ ब्रशचा वापर करावा. तीनही शेड्स व्यवस्थितपणे ब्लेंड कराव्यात, जेणेकरून कुठेही स्ट्रोक दिसणार नाही. सर्व प्रकारच्या डोळ्यांच्या आकारकरिता फॅन शेप चांगला दिसतो.
स्नो ग्लोब :
या प्रकारात आणि फॅन शेपमध्ये बऱ्यापकी साधम्र्य आहे. स्नो ग्लोब शेपने डोळे गोलाकार असल्याचा आभास होतो. चित्रात दाखविल्याप्रमाणे डोळ्यांच्या आतील आणि बाहेरील भागास गडद शेड आणि मधल्या भागाला फिकट रंग वापरावा. जर तुम्हाला ड्रॅमॅटिक लुक हवा असेल तर फिकट रंगाच्या जागी शिमर वापरा आणि गडद रंगाच्या जागी मॅट शेड वापरा. जेथे एक शेड संपते आणि दुसरी चालू होते तेथे व्यवस्थित ब्लेंडिंग करण्यास विसरू नका.
स्मोकी आय :
सध्या स्मोकी आय सर्वात जास्त लोकप्रिय आहे. फॅशन शोमधेसुद्धा डोळ्यांना स्मोकी इफेक्ट दिलेला तुम्हाला दिसेल. आधी गडद रंग फ्लॅट स्टिफ ब्रशने पापणीच्या खालच्या भागावर लावावा (लोअर लीड), नंतर सॉफ्ट डोम ब्रशच्या साहाय्याने मध्यम किंवा फिकट रंगाचा आयशॅडोने स्मज करा. यामुळे सॉफ्ट लुक येण्यास मदत होईल.
कॅट आय :
कॅट आय लुक देण्यासाठी आयलाइनर किंवा आयशॅडोचा वापर करतात. सॉफ्ट लुकसाठी आयशॅडो, तर प्रॉमिनंट लुकसाठी आय लाइनर वापरावे. ज्यांचे डोळे गोल आहेत त्यांनी या पद्धतीने आय शॅडो लावल्यास डोळ्यांना बदामी आकार येईल. लोअर लॅश लाइनपासून सुरुवात करून डोळ्यांच्या बाहेरील भागापासून वरच्या दिशेने न्यावी. डोळे थोडे वरच्या दिशेने खेचावे, चित्रात दाखवल्याप्रमाणे कॅट आयचा शेप द्यावा. त्याकरिता जास्तीतजास्त गडद आय शॅडो डोळ्यांच्या बाहेरील कडांना व पखांसारख्या भागासही लावावा. नंतर पेन्सिल ब्रशने लाइन स्मज करावी.
कट क्रिस / ओपन बनाना :
या शेपसाठी आयलाइनर पेन्सिलचा वापर केला जातो. आय लाइनर पेन्सिलने क्रीस लाइन (ज्या भागावर पापणी आत जाते व भुवईचे हाड लागते) ठळक रेषा काढावी. थोडासा वरच्या दिशेने कलर ब्लेंड करावा, मात्र ठळक रेषेला धक्का लागू देऊ नये. क्रीस लाइनच्या खाली फिकट आत शॅडो लावावा, त्याच्याने क्रीस लाइन जास्त उठावदार दिसते.
क्लोज्ड बनाना :
कट क्रिस आणि क्लोस्ड बनाना लावण्याची पद्धत सारखीच असून ठळक लाइन असलेले बाहेरील टोकास गोलाकार देऊन खालच्या पापणीच्या दिशेने खेचत न्यावे.

alu in garden
निसर्गलिपी : येता बागेला बहर…
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या
Before blaming diabetes drugs understand What chemicals are used in medicines
मधुमेहावरल्या औषधांना दोष देण्याआधी समजून तरी घ्या…
Eating Chavalichi Bhaji Can Cure Thyroid
चवळीच्या भाजीने थायरॉईड बरा होतो का? वजन कमी करताना चवळी किती फायद्याची, तज्ज्ञांची स्पष्ट माहिती, वाचा