vv17प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलिवूडची स्टाइल दिवा म्हणून ओळखली जाणारी मलाइका देतेय स्टाइल टिप्स खास व्हिवाच्या वाचकांसाठी.
मी पेशाने डॉक्टर असून, माझे वय २५ वष्रे, उंची ५ फूट २ इंच, वजन ६७ किलो आणि वर्ण निमगोरा आहे. माझ्या देहयष्टीला आणि व्यवसायाला शोभून दिसेल अशा स्मार्ट ड्रेसिंग स्टाइलसाठी आपण मला मार्गदर्शन करू शकाल का?
कविता.
हाय कविता,
वैद्यकीय व्यवसायातील कामाची अनियमित व्यग्रता, मानसिक ताण आणि दगदग यांतूनही तुला स्टायलिश दिसावंसं वाटत आहे, ही खरंच कौतुकाची बाब आहे. तुझ्यासाठी स्मार्ट स्टायिलगचे दोन फंडे म्हणजे कम्फर्ट आणि केअर. तुला तुझ्या कपडय़ांच्या कलेक्शनकडे पाहायला वेळ मिळणं कठीणच आहे, पण तरीही मन प्रसन्न ठेवण्यासाठी आणि स्टायलिश दिसण्यासाठी तुला थोडा वेळ द्यायलाच हवा.
तुला स्टायलिश दिसायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वत:चा बॉडीशेप माहीत असणं आणि त्याला शोभेल असं ड्रेसिंग करणं खूप आवश्यक आहे. आपला बांधा कसा आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे. (पायांची लांबी, कमरेच्या वरच्या भागाची लांबी, खांद्यांची ठेवण, कमरेची जाडी या निकषांवरून स्त्रियांमध्ये विविध प्रकारचे बॉडीशेप्स दिसून येतात.) तुझ्या बांध्याचा विचार करता, शिफ्ट ड्रेस इज अ गुड ऑप्शन. हा गुडघ्याच्या थोडय़ा वपर्यंतच्या लांबीचा वनपीस प्रकारचा ड्रेस. असा ड्रेस आरामदायी असून फारशी मेहनत न घेताही व्यक्तीला ग्रेसफुल लुक मिळवून देतो. ड्रेसच्या रंगांबद्दल म्हणशील तर कोबाल्ट ब्लू (मोरचुदी निळा) रंगातील शिफ्टड्रेसमध्ये तुझा वर्ण खुलून दिसेल, तर कोरल किंवा गुलबक्षी (गुलाबी रंगाची गडद छटा) रंगातील शिफ्ट ड्रेस कामाच्या ठिकाणी त्रासदायक न ठरता तुला स्टायलिश लुक मिळवून देतील. फुलाफुलांची किंवा अन्य कलात्मक चित्रकारी असलेले ड्रेसही स्टायिलगसाठी ग्रेट हेल्प ठरतील, फक्त त्या खाली योग्य प्रकारची पादत्राणं घालणं मात्र आवश्यक आहे.
अशा साध्या सुटसुटीत कपडय़ांवर, डॉक्टर्स कोट घालणंही तुला अजिबात त्रासदायक वाटणार नाही. आणखी एक बेसिक रंगांतील म्हणजे, पूर्ण काळा किंवा पूर्ण पांढऱ्या रंगातील किंवा अशा रंगांचं मिश्रण असलेला शिफ्टड्रेस  तुझ्या व्यवसायासाठी अगदी योग्य वाटेल आणि तुला मॉड लुक द्यायलाही मदत करील. मोस्ट
इम्पॉर्टंट म्हणजे या सर्व पोशाखांवर फ्लॅट (हिल्स नसलेली) प्रकारची पादत्राणे इज ए ग्रेट स्टायिलग. तुझ्या व्यवसायाच्या दृष्टीनं तेच सोयीचं आहे. खरं तर काळ्या रंगाचे बॅलेरिना शूज(फ्लॅट हिल्सचे शूज) किंवा फॅन्सी चपला यांचा एखाद जोड ऑफिसमध्येच ठेवलेला असणं चांगलं, न जाणो कधीही गरज लागू शकते.
तुझ्यासाठी आणखी एक उत्तम स्टाइल म्हणजे मॅक्सी ड्रेस (हा पायघोळ ड्रेस असून बहुतेकदा स्लीव्हलेस प्रकारात दिसतो.). यावर शर्ट किंवा साधासा ब्लेझर (कोट) घातला की कामाच्या ठिकाणी घालायला उत्तम आऊटफिट तयार. नेहमी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे कोणताही ड्रेस असो, योग्य अ‍ॅक्सेसरीजमुळे स्टायिलगमध्ये खूप फरक पडतो. वर सांगितलेल्या ड्रेसेस वर कानात छानसे हूप्स (कानालगत लोंबणाऱ्या रिंग वजा डूल) किंवा एखादाच खडा असलेले टॉप्स उत्तम. फार भपका नसला तरीही तुझा लुक यांमुळे परिपूर्ण दिसेल हे नक्की.
मलाइका अरोरा खान
(अनुवाद- गीता सोनी)
सौजन्य – द लेबल कॉर्प
http://www.thelabelcorp.com, http://www.theclosetlabel.com

आपल्या गर्ल्स गँगबरोबर सकाळी ब्रंचला जाणार आहात की रात्री पार्टीचा प्लॅन आहे? काय घालू, कसं दिसेल या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी स्टाइल दिवा मलाइका अरोरा-खान तुम्हाला मदत करेल. फॅशन, कपडे, हेअर, स्टाइलिंग याबाबतच्या तुमच्या शंकांना मलाइका या सदरामधून उत्तरं देईल. फॅशन आणि स्टाइलिंगविषयीचे आपले कोणतेही प्रश्न viva@expressindia.com या इमेल आयडीवर बिनधास्त पाठवा. आपलं नाव, राहण्याचं ठिकाण यांसह प्रश्न पाठवा आणि सब्जेक्ट लाइनमध्ये स्टाइलिंग बाय मलाइका असं आवर्जून लिहा.

The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
image and signature of Dr Babasaheb Ambedkar, pen, writing wonders of pune
घटनाकारांची छबी, स्वाक्षरी आता लेखणीवर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सिग्नेचर पेनच्या आवृत्तीचे अनावरण
9 year old deadlifting 75 kg viral video
भारतातील सर्वांत शक्तिशाली चिमुरडी! पाहा नऊ वर्षीय ‘धाकड’ मुलीचे शक्तिप्रदर्शन; Video पाहून व्हाल थक्क…
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?