एकीकडे मुलींच्या फॅशनमध्ये पॉवर ड्रेसिंगसारखे एलिमेंट्स अ‍ॅड होत असताना दुसरीकडे मुलांच्या फॅशनमध्ये मात्र पानाफुलांची डिझाइन्स आणि थोडे फेमिनाइन कलर अ‍ॅड व्हायला लागले आहेत की काय? पुढच्या आठवडय़ात सुरू होणाऱ्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा प्रथमच फक्त मेन्सवेअर कलेक्शन सादर करणार आहे. तेदेखील हाच फ्यूचर ट्रेण्ड अधोरेखित करणारे असेल.येत्या बुधवारी (२६ ऑगस्टला) होणाऱ्या या फॅशन शोकडे तमाम फॅशनप्रेमींचं लक्ष आहे. कारण मनीषसाठी रणबीर कपूर रॅम्पवर शो स्टॉपर म्हणून उतरणार आहे. आजपर्यंत मनीषने आनेक बॉलीवूड अभिनेत्यांचे कपडे डिझाइन केले आहेत. गेली २५ र्वष तो या क्षेत्रात काम करतोय. पण लॅक्मे फॅशन वीकमध्ये पहिल्यांदाच तो फक्त मेन्सवेअर कलेक्शन घेऊन येत आहे. यानिमित्त व्हिवा ने थेट मनीषशी संवाद साधला.हे वर्ष माझ्यासाठी खास आहे. कारण मनीष मल्होत्रा या माझ्या लेबललादेखील यंदा दहा र्वष होत आहे.’यंदाच्या कलेक्शनविषयी बोलताना मनीष म्हणाला, ब्लेझर, स्वेटर, बंद गळा असलेले कुत्रे, जॅकेट, शेरवानी असं सगळं पाहायला मिळणार आहे. मी मुद्दाम एमराल्ड ग्रीन या रंगाचा यंदा जास्त वापर केलाय. हा रंग डिसेंट आहे त्यामुळे तो एखाद्याचं व्यक्तिमत्त्व अधिक उठून दिसण्यात मदत करतो. मला नेहमीच काहीतरी वेगळं करायला आवडतं. त्यामुळे मी यंदा डिझाइन्समध्ये बोटॅनिकल मोटिफ्स जास्त वापरली आहेत.’मनीषच्या कलेक्शनमध्ये यंदा पानाफुलांची नक्षी आणि हिरवा रंग याबरोबर रणबीर कपूर हे वैशिष्टय़ असेल तर.. यंदा हा फॅशन शो मुंबईच्या मेहबूब स्टुडिओत होणार आहे. या गाजलेल्या स्टुडिओमध्ये पहिल्यांदाच यानिमित्ताने फॅशन शो होतो आहे.