मागच्या आठवडय़ात एका हेअरस्टाइलिस्टशी बोलताना त्यानं सांगितलं, यंदा हेअरस्टाइल्समध्ये ‘मेसी लुक’ ट्रेंडमध्ये आहे. मेसी म्हणजे थोडक्यात अर्धवट िवचरलेले, थोडे विस्कटलेले केस. त्याच वाक्यावर त्याला थांबवून त्याला विचारलं, ‘‘बाबा रे, लहानपणापासून तेल लावून चापूनचोपून वेणी किंवा पोनीटेल बांधून मुलींना शाळेत पाठवणारा हा देश. (एकदा शाळेत एका मुलीने केस मोकळे सोडलेले दिसले तर वर्गशिक्षिकेने सुतळीने तिचे केस बांधल्याची आठवण अजूनही मनात कायम आहे.) साधं घराखालच्या वाण्याकडून बिस्किटं आणायला जातानाही आईची ‘आधी केसांचा अवतार नीट करा’ अशी तंबी ऐकणाऱ्या आमची काय बिशाद ऑफिस, कॉलेजला केस नीट न विंचरता जायची! आणि अशा वेळी तू सांगतोस मेस्सी लुक करा? देशभरातील आईवर्गाची करडी नजर चुकवून हा मेसी लुक ट्रेण्डमध्ये आलाच कसा?’’ यावर त्याचं म्हणणं असं की, ही पिढी त्यांच्या कामाबद्दल बरीच ‘सॉर्टेड’ आहे. त्यांचं काम, मित्र, कुटुंब, छंद याबद्दल त्यांचे विचार निश्चित आहेत. आपलं काम चोख असेल, याची त्यांना खात्री असते, त्यामुळे एखाद्यावर छाप पडण्यासाठी वरवर नीटनेटकं दिसायची फारशी गरज त्यांना पडत नाही. जरा केस विस्कटलेले असतील, शर्टाची इस्त्री नीट नसते, तर त्याचं त्यांना विशेष वाटत नाही. आता हे घरी आईला सांगितल्यावर ती काय ‘लुक’ देईल, हे डोळ्यासमोर आणत, त्याच्या म्हणण्याचा विचार करू लागले.

हल्ली कॉलेजमध्ये, आजूबाजूला अध्र्या केसांचा हाय बन आणि अध्रे मोकळे सोडलेले केस अशी हेअरस्टाइल केलेल्या मुली दिसतात. मागच्या वर्षी पावसाळ्यात मुलांनी ऑफिसमध्ये जातानाही थ्री-फोर्थ, केप्री घालायला सुरुवात केली. हा प्रकार इतका वाढला की, सध्या फॉर्मल शॉर्ट्स मुलांच्या वॉडरोबमध्ये आल्यात. फॉर्मल्स आणि शॉर्ट्स हे विरुद्धार्थी शब्द होते फॅशन जगतात, पण आता परिस्थिती बदलली आहे. एक साइझ लूझ कपडे घेणं आता सगळ्यांच्याच अंगवळणी पडलंय.

Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?
demonetisation decision taken by modi government in 2016 was illegal and wrong says justice bv nagarathna
‘निश्चलनीकरणाचे परिणाम उद्दिष्टांच्या विरोधात’, सामान्य माणसाला झालेल्या त्रासाने अस्वस्थ- न्या. नागरत्न

गेल्या दोन-तीन वर्षांत बाजारपेठांवर नजर टाकल्यास एक गोष्ट आवर्जून दिसते, की बाजारात कोणताही विशिष्ट ट्रेण्ड नसतो. एकाच वेळी ८० च्या दशकातली फॅशन असते, तर फेमिनीन फिफ्टीजसुद्धा ट्रेंडमध्ये असतो. ऑफ शोल्डरसोबतच फुल स्लीव्ह लुकही मिरवत असतो. डिझायनर्सना याबद्दल विचारल्यास ते आवर्जून सांगतात, ‘आज ग्राहक राजा आहे. तो ट्रेण्डमध्ये काय आहे यापेक्षा त्याच्यावर काय साजेसं दिसेल, हे पाहून कपडे निवडतो.’ जीन्स रोज घालणं सोयीचं नसल्याचं लक्षात आलं, की कपाटात पलॅझो दिसू लागतात; पण याच पलॅझो प्रवासात घालायला सोयीच्या नाहीत म्हणून ट्रेण्ड असूनही त्यांच्याऐवजी लेिगग्ज वापरण्यात काहीच गर वाटत नाही. एरवी डिस्को म्हणजे वेस्टर्न लुक असं समीकरण असतानाही ‘ब्रेकअप साँग’मध्ये डिस्कोत थिरकणारी अनुष्का शर्मा लाँग कुर्ता आणि जीन्स घातला म्हणून गावठी ठरत नाही. तर कुर्ता लेिगग्जमध्ये अख्खं पॅरिस फिरणाऱ्या ‘क्वीन’ कंगनाच्या विचारांचा खुलेपणा सहज स्वीकारला जातो. थोडक्यात ‘मी करतोय ते काम महत्त्वाचं की तुम्ही नेमून दिलेल्या ठोकळेबाज पेहराव पद्धतीत मी मोडणं महत्त्वाचं?’ ही विचारसरणी यामागे असते. त्यातही तुमच्या कामाचं स्वरूप, प्रवासातला वेळ, शरीरयष्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं बजेट या सगळ्याचा विचार करून लुक ठरवला जातो. त्यामुळे ब्रँडेड ड्रेसवर फॅशन स्ट्रीटवरून घेतलेलं जॅकेट आणि पायात कोल्हापुरी चप्पल घातलेली एखादी तरुणी दिसली, तर त्या आश्चर्य वाटत नाही, उलट तिच्या कल्पनाशक्तीचं कौतुक वाटतं.

अर्थात म्हणून एक दिवस ऑफिसमध्ये अजागळासारखे कपडे, विस्कटलेले केस, झोपेतून उठून आल्यासारखं तोंड घेऊन जाऊ शकत नाही. लुकमधला व्यवस्थितपणा दुर्लक्षित करता येणार नाही. अगदी मेसी हेअरस्टाइल करतानाही हेअरस्प्रे, पिना वापरून केस व्यवस्थित बांधले जातात. फॉर्मल शॉर्ट्ससुद्धा व्यवस्थित बसतील, अशाच डिझाइन केलेल्या असतात. तसंच त्यावर टी-शर्टऐवजी सेमी-फॉर्मल शर्ट घातले जातात. तुमचा परिसर, त्या ठिकाणचा पेहरावाबाबतचा शिष्टाचार, तुमचं पद याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही; पण हे शिष्टाचार आणि तुमची गरज यांचा मेळ घालत पेहरावात काही बदल नक्कीच करू शकता. त्यानेच या विस्कटलेल्या लुकचा व्यवस्थितपणा खुलवता येईल.

मेसी लुक व्यवस्थित कसा दिसेल?

  • ऑफिसमध्ये नेहमीच्या ट्राऊझर्सऐवजी गडद रंगाची वाइड लेग कॉटन पँट आणि सोबत फिकट रंगाचा शर्ट ‘टक इन’ करून घालता येईल. वाटल्यास एखादं सेमी-फॉर्मल ब्लेझर घाला. नेहमीच्या फॉर्मल्सला छान पर्याय ठरेल.
  • एखाद्या दिवशी सहज धोती पँटवर पट्रेड क्रॉप टॉप आणि त्यावर स्टोल किंवा दुपट्टा घ्या. नेहमीच्या सलवार कुर्त्यांला छान ट्विस्ट मिळेल.
  • साडीवर कधी क्रॉप टॉप किंवा बस्टीयर घातलंय? नव्या प्लेन कॉटन किंवा सिल्क साडीवर हा प्रयोग नक्की करा.
  • नेकपीस, इअरिरग किंवा एखादी फंकी बॅग सिंपल लुकलासुद्धा मस्त वेगळेपणा देतात. अगदी वेस्टर्न ड्रेसवर मोजडीनेही नावीन्य येतं. त्यामुळे असे प्रयोग जरूर करा.

 मृणाल भगत viva@expressindia.com