मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोल वसुलीची अधिसूचना जारी; तीस वर्षे टोल भरावा लागणार
- कोयना धरणग्रस्त करणार क्रांतिदिनी जलाशयात आंदोलन
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
वातावरणात थोडासा गारवा वाढला की, एक लक्षात येणारी गोष्ट म्हणजे मॉर्निग वॉकला रस्त्यावर अनेक चेहरे दिसू लागतात. रोजच्या व्यक्तीला हे नवे चेहरे चटकन ओळखता येतात. गजराच्या काटय़ावर उठणारे हे फिटनेस फ्रिक चेहरे सुरुवातीच्या काही दिवसांत नित्य नियमाने दिसतात. पण काही काळानंतर मात्र या चेहऱ्यांची संख्या विरळ होत जाते. उत्साह मावळतो, तसे चेहरेही धूसर होतात. - प्रतिनिधी
सौरभ: अगं क्षमा सकाळी उठवायला ये हं, पावणे सात वाजता.. यंदा काहीही झालं तरी रोज वॉकला जायचंच.
क्षमा: येते पण तू खूप वेळ लावु नकोस प्लीज. पुन्हा आपल्याला नेहा, पालवी आणि दिवेशलाही उठवायचंय. सो प्लीज डोन्ट कम लेट..
सौरभ: ओके..
प्रत्येक विभागातील व्यक्तींचा स्वतचा असा एक जॉगिंग किंवा वॉकिंग ट्रॅक असतो. कुणासाठी गार्डन, तलावाचा काठ, हिलवरचा रस्ता, तर कुणासाठी अगदी सव्र्हिस रोड अशा प्रत्येकाच्या फिटनेसच्या वाटा ठरलेल्या असतात. त्यामुळेच सकाळच्या वेळी या रस्त्यांचा नूर काही वेगळाच असतो. रोज दिसणारे चेहरे एकमेकांना ओळखू लागतात. किमान हाय, हॅलो तरी यांच्यामध्ये होत असतं. बरोबरीला कुत्रा असेल तर वॉकिंग किंवा जॉगिंग करण्याची मजा ही काही औरच असते हे ज्याचं त्यालाच कळेल. त्याच्या निमित्ताने का होईना रोज फिटनेस जपावाच लागतो.
गुलाबी थंडीची चाहूल लागल्यावर वातावरणाचा नूरच पालटतो. दाटलेल्या धुक्यात अनेक नवे फिटनेस फ्रिक चेहरे मॉर्निग वॉकच्या निमित्ताने बाहेर दिसू लागतात. अंगावर अगदी जॉगिंग सूट घालून हे चेहरे बाहेर पडतात तेव्हा सरावलेल्या फिट व्यक्तीच्या नजरेपासून हे नवे चेहरे अजिबात लपत नाहीत. या नेहमीच्या चेहऱ्यांना हे चेहरे चटकन ओळखता येतात. त्यांना हेही माहीत असतं की, सुरुवातीला दिसणारे हे चेहरे काहीच दिवस दिसणार आहेत. नव्याची नवलाई केवळ काही काळच असणार आहे आणि होतही अगदी तसंच.
सकाळी सातच्या ठोक्याला बिल्डिंगमधून सर्व मित्र-मैत्रिणींना जमा करेपर्यंत पहिल्याच दिवशी साडेसात वाजतात आणि वॉकिंगचा मूड तिथेच कमी होतो. पण असं असलं तरी, दरवर्षी थंडीच्या दिवसात काही नवे चेहरे तुम्ही रेग्युलर सकाळी बाहेर पडणारे असाल तर तुम्हालाही दिसतील. सुरुवातीला धुक्याचा आस्वाद घेत आणि कुणाच्या तोंडातून धूर येतो हे बघत नव्या चेहऱ्यांचे दोन दिवस कसे जातात हेच कळत नाही. पण नंतर मात्र पाच जणांच्या ग्रुपला अचानक ग्रहण लागल्यासारखा ग्रुप दिसू लागतो. कधी दोन, तर कधी तीन अशी संख्या रोडावू लागते. नव्या चेहऱ्यांचा उत्साह कमी होतो आणि थंडीच्या निमित्ताने जपलेला फिटनेसचा मंत्रही थंडीत गोठून जातो.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















