कुठल्याही हॉटेलात जा..
मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्याला स्टार्टर्स दिसतात. स्टार्टर्सचे लहानांसह मोठय़ांना आकर्षण असते. असेच स्टार्टर्सचे पदार्थ घरच्या घरी केल्यास रोजच्या दिवसाची सुरुवात नक्कीच वेगळी होईल….
फिश इन ब्लॅक बिन सॉस
साहित्य : फिशचे तुकडे (रावस), सिमला मिरची चिरलेली,  चिरलेली कांदा पात, चिरलेले आलं – १ चमचा, चिरलेले लसूण- ३ ते ४ चमचे, चिरलेली हिरवी मिरची – १ चमचा, सोया सॉस – १ चमचा, व्हाइट पेपर पावडर – चिमूटभर, साखर – चिमूटभर, तळण्यासाठी – तेल, सिझनिंग क्युब्स, ब्लॅक बिन सॉस – १ चमचा, मीठ – चवीनुसार
कोटिंगसाठी साहित्य : मदा, कॉर्नफ्लॉवर, पाणी, मीठ, व्हाइट पेपर पावडर- चिमूटभर
कृती : कोटिंगसाठी दिलेले साहित्य एकत्र करून त्यात फिशचे तुकडे घालून ते भजीसारखे डीप फ्राय करून घ्यावे. एका कढईमध्ये २ चमचे तेल टाकून गरम करून त्यात सिमला मिरची, आलं, लसूण, हिरवी मिरची, सोया सॉस, साखर, सिझनिंग क्युब्स ब्लॅक बिन सॉस, मीठ टाकून परतवून घ्यावे. नंतर त्यामध्ये थोडं पाणी टाका.  तयार मिश्रणात फिशची भजी टाका. थोडय़ा पाण्यामध्ये कॉर्नफ्लॉवर मिक्स करून ते तयार मिश्रणात घालून त्याला टॉस करून वरून कांदापातने गार्निश करून गरमागरम सव्‍‌र्ह करा.
टीप- ब्लॅक बिन सॉसची बॉटल बाजारात मिळते. सॉस उपलब्ध नसल्यास थोडीशी काळीमिरी पूड टाका. ब्लॅक बिनचा स्वाद येणार नाही. पण रेसिपी छान होईल.

सॉल्ट अ‍ॅण्ड पेपर क्रिस्पी व्हेज बॉल्स
साहित्य : बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेला गाजर, बारीक चिरलेली फरसबी, बारीक चिरलेले लसूण, चिरलेले आलं, चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, मदा, कॉर्नफ्लॉवर, मीठ, ब्लॅक पेपर क्रश, सिझनिंग क्युब्स – २ पीस, साखर – चिमूटभर, सोया सॉस – २ चमचे, चिली सॉस- १ चमचा, पाणी आवश्यकतेनुसार, तळण्यासाठी तेल.
कृती : प्रथम एका बाऊलमध्ये कोबी, गाजर, फरसबी, सिझनिंग क्युब्स, आलं, लसूण, हिरवी मिरची सर्व एकत्र करून त्यामधील पाणी काढून टाका. नंतर त्यात मदा, कॉर्नफ्लॉवर, मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. तयार मिश्रणाचे छोटे बॉल्स बनवून डीप फ्राय करून घ्या. एका कढईमध्ये २ चमचे तेल टाकून त्यामध्ये आलं, लसूण, मिरची घालून नीट परतून घेणे. त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून त्यात सोया सॉस, चिली सॉस, ब्लॅक पेपर क्रश, मीठ, साखर घालून फ्राय केलेले बॉल्स त्यामध्ये घालावे. थोडय़ा पाण्यामध्ये कॉर्नफ्लॉवर मिक्स करून ते तयार मिश्रणात घालून त्याला टॉस करून वरून कांदापातीने गार्निश करून सव्‍‌र्ह करा.

व्हेजिटेबल्स अ‍ॅण्ड टोफू स्प्रिंग रोल
साहित्य : सारण :- उभ्या बारीक चिरलेल्या भाज्या : कोबी, गाजर, सिमला, कांदापात प्रत्येकी, मीठ – चवीनुसार, साखर – चवीनुसार, व्हाइटपेपर- चिमूटभर, सोया सॉस, चिली सॉस -२ चमचे, मदा पाण्यात घोळवून पातळ पेस्ट करावी.  
तळण्यासाठी तेल, सिझनिंग क्युब्स, टोफू लांबट कापलेले.
स्प्रिंग रोलच्या पट्टय़ासाठी साहित्य व कृती : मदा – २ वाटय़ा, मीठ , पाणी – आवश्यकतेनुसार.  हे मिश्रण घट्टसर भिजवून घ्या. नॉनस्टिक पॅनमध्ये पातळसर मिश्रण टाकून त्याचे पॅन केक बनवून घ्या.
कृती : एका पॅनमध्ये २ चमचे तेल गरम करून घ्या. त्यामध्ये कोबी, गाजर, सिमला, कांदापात, सोया सॉस, चिली सॉस घालून नीट परतून घ्या. नंतर त्यामध्ये मीठ, व्हाइटपेपर, सीझनिंग क्युब्स घालावे. त्यानंतर टोफू घालून मिश्रण नीट परतवून घ्या. त्यानंतर ते थंड करावे. आता तयार सारण मद्याच्या पॅनकेक्समध्ये घालून त्याचे रोल्स तयार करा. मद्याच्या पेस्टने त्याच्या कडा चिकटवून तेलामध्ये डीप फ्राय करून त्याचे दोन ते तीन पीस करून टोमॅटो सॉसबरोबर गरमागरम सव्‍‌र्ह करा.
टीप : सोया पनीरला टोफू असे म्हणतात.  टोफू नसेल तर पनीर घालावे.

क्रिस्पी चिकन हाँगकाँग
साहित्य :  चिकनचे तुकडे – ७ ते ८, लाल मिरची पेस्ट – ३ चमचे, बारीक चिरलेला लसूण – २ ते ३ चमचे, चिरलेले आलं- १ चमचा, चिरलेला कांदा, चिरलेली हिरवी  मिरची, तेल, चिरलेली कांदा पात, चिरलेली सिमला मिरची, मीठ -चवीनुसार, व्हाइट पेपर पावडर – चिमूटभर, चिली सॉस – १ चमचा, सोया सॉस – १ चमचा, साखर
कोटिंगसाठी साहित्य : मदा, कॉर्नफ्लॉवर, पाणी, सीझनिंग क्युब्स, मीठ – चवीनुसार
कृती : कोटिंगसाठी दिलेले साहित्य एकत्र करून त्यात चिकन घालून ते भजीप्रमाणे डीप फ्राय करून घ्यावे. एका कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून त्यात आलं, लसूण, हिरवी मिरची, कांदा घालून व्यवस्थित परतवून घ्यावे. परतवून झाल्यानंतर त्यात थोडं पाणी टाका.
नंतर त्यामध्ये मीठ, लाल मिरची पेस्ट, व्हाइट पेपर पावडर, चिली सॉस, सोया सॉस टाका. नंतर मॅगी क्युब्स टाका. तयार मिश्रणात चिकनची भजी टाका. थोडय़ा पाण्यामध्ये कॉर्नफ्लॉवर मिक्स करून ते तयार मिश्रणात घालून त्याला टॉस करून वरून कांदा पातीने गार्निश करून सव्‍‌र्ह करा.
संपादन सहाय्य : प्रभा कुडके ’ डिझाइन : संदेश पाटील