मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सोलापुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी महापालिकेकडून रेल्वेला प्रस्ताव
- विधवा अपंग महिलेच्या घराला महिला सावकाराने ठोकले कुलूप
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- गैरव्यवहाराच्या भोवऱ्यात नाशिक जिल्हा बँक संचालक मंडळाच्या गटांगळ्या
- कुत्र्यांच्या मदतीने हरणांच्या शिकारीचा संशय
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास चिरडणारा ट्रक जमावाने पेटवला
- वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण नियंत्रणाचा बोजवारा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
हिवाळ्यात त्वचा मऊ, मुलायम राखण्यासाठीच्या या टिप्स सांगितल्या इव्हलिन शर्मा हिने.
गुलाबी थंडीची सर्वजण आतुरतेने वाट पाहात असतात. वाफाळलेली कॉपी, शेकोटय़ा, सकाळी ऊन खाणं.. थंडीची स्वत:ची एक मौज असते. असा हा उबदार ऋतू काही खास स्मृती घेऊन येत असला तरी त्याचे काही तोटेही आहेत. थंड वारे आणि कोरडय़ा हवामानामुळे आपली त्वचा नेहमीसारखी मऊ, मृदू, मुलायम राहात नाही. अशा वेळी त्वचेची नीट निगा राखणं अत्यंत गरजेचं असतं. आपल्या त्वचेची जोपासना नसíगक रित्याच करणं अधिक हितावह असतं.
हिवाळ्यात त्वचा मऊ, मुलायम राखण्यासाठीच्या काही टिप्स
हिवाळ्यात त्वचेला सतत मॉइश्चराइझ करत राहिलं पाहिजे, जेणेकरून शुष्क हवामानामुळे त्वचेचं होणारं नुकसान भरून निघेल. नारळाच्या गुणधर्मानी युक्त असलेली मॉइश्चरायझर्स आपल्या त्वचेसाठी खूप चांगली असतात. ही मॉइश्चरायझर्स त्वचेच्या संरक्षक घटकांचं संरक्षण करून त्वचेच्या पृष्ठभागावरून आद्र्रता निसटून देत नाहीत. त्यामुळे दिवसभर त्वचा नसíगकरित्या मृदू, मुलायम राहते.
दररोज कोमट पाण्याने आंघोळ करावी. त्यात खोबरेल तेलाचे थोडे थेंब टाकावेत. त्यामुळे त्वचेत आद्र्रता राखण्यास मदत होते आणि त्वचा दिवसभर मऊ राहते. हिवाळ्यात त्वचेला नसíगक तेलांची जास्त आवश्यकता असते. त्यामुळे त्वचेची झालेली हानी भरून निघते.
हिवाळ्यात हात आणि पायाची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं, कारण हा ऋतू त्यांचा कर्दनकाळ ठरू शकतो. हाताला तसेच पायाला दिवसातून किमान दोनदा मॉइश्चरायझर लावणं अत्यंत गरजेचं आहे. घरातली कामं करताना हातात ग्लोव्हज घालावेत.
तीव्र साबण, श्ॉम्पू आणि शॉवर जेलचा वापर टाळावा, कारण त्यामुळे त्वचेचा पोत अधिक रूक्ष होत जातो. त्याऐवजी त्वचेसाठी सुरक्षित असणाऱ्या सौम्य उत्पादनांचा वापर करावा.
त्वचेचं संवर्धन केवळ बाह्य उपायांनी करता येत नाही तर त्यासाठी चांगला आहार घेणंही आवश्यक असतं. चौरस आहार, भरपूर पाणी पिणं तसंच किलगड, खरबूज, संत्री अशी फळं खाल्ल्याने शरीरातल्या आद्र्रतेचं संतुलन राखता येतं.
उन्हाळा नसला तरी दररोज सनस्क्रिन लावावं. उन्हाळ्यातल्या तळपत्या सूर्यापेक्षा मृदू वाटणारा हिवाळ्यातला सूर्यही त्वचेची हानी करू शकतो.
हिवाळ्यात चेहऱ्याला घरगुती पॅक लावावा. तो असा बनवावा- दह्यामध्ये बदामाची पूड आणि नारळाचं दूध घालून ते एकजीव करावं. हे मिश्रण चेहऱ्याला लावावं. २० मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा. अव्हॅकॅडोमध्ये थोडे खोबरेल तेलाचे थेंब घालून त्याची पेस्ट बनवावी. आंघोळीआधी ही पेस्ट संपूर्ण शरीराला लावावी. २० मिनिटांनंतर अंग धुऊन आंघोळ करावी. या मिश्रणामुळे त्वचेला नवसंजीवनी मिळेल आणि ती नवी झाल्यासारखी वाटेल.
या हिवाळ्यात आपल्या त्वचेला बनवा सुंदर आणि ताजीतवानी.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















