मी बी. ए.च्या फर्स्ट इयरला आहे. आमचा मित्र-मैत्रिणींचा एक छान ग्रुप जमलाय. हल्ली मात्र मला कधी कधी खूप ऑकवर्ड होतं त्यांच्यात. कारण पार्टीच्या वेळी ड्रिंक्स घ्यायची पद्धत सुरू झाली आहे. माझ्या काही न पिणाऱ्या मैत्रिणींनीही बीयर घ्यायला सुरुवात केली आहे. आमच्या घरी कोणी ड्रिंक्स घेत नाही. त्यामुळे मला या सगळ्याची अजिबात सवय नाही. परवा अशाच एका पार्टीत काही अनोळखी मुलं आली होती. त्यातल्या एका मुलानं मला ड्रिंक्स घे म्हणून फारच आग्रह केला. मी नाही म्हणाले तर उगीचच फ्लर्ट करायला लागला. मला काय करावं कळेना, कारण माझे सगळे नेहमीचे दोस्त काहीसे ‘अंडर-इन्फ्लुएन्स’ होते. नुकतंच कुठेतरी मी डेट रेपविषयी वाचलं होतं. तसं तर काही होणार नाही ना, अशी भीती वाटायला लागली. कशीबशी मी तिथून निघून घरी पोहोचले. आता हा ग्रुप सोडावा, असं वाटतंय मला. काय करू?
-अनिका.

हाय अनिका, पार्टी कल्चर किती अनअव्हॉयडेबल झालंय ना आजकाल? आणि मजा करण्याचे, आनंदाचे प्रसंगही किती स्ट्रेसफूल झालेत!
आता आपल्याकडेही डेटिंग, पार्टीज, नाइट-आऊट्स असं सगळं सर्रास केलं जातं आणि पार्टीसुद्धा फक्त खाणं-गप्पा अशी नव्हे तर लाऊड म्युझिक, दंगा, डान्स आणि ड्रिंक्स. बेधुंद होऊन डान्स करीत असताना आपण काय पितोय, कुणाच्या किती जवळ जातोय, कोण याचा कसा अर्थ काढेल याचं भान सुटतं. डेट-रेप हा एक असाच वेस्टर्न कल्चरमधून आपल्याकडे आलेला प्रकार. डेट-रेप म्हणजे एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून झालेला अत्याचार. काहीशा ब्रॉड टर्ममध्ये पाहिलं तर आपल्या प्रायव्हेट स्पेसवर केलेलं आक्रमण म्हणजे रेप. यात ओळखीची व्यक्ती इन्व्हॉल्व झालेली असल्यानं जरा जास्तीच धोक्याचं. यासाठी वापरली जाणारी ड्रग्ज बिनचवीची आणि बिनवासाची असल्यानं ड्रिंक्समध्ये मिसळलेली लक्षात येत नाहीत. ही ड्रग्ज घेतलेल्या व्यक्ती पूर्णपणे बेशुद्ध होत नाहीत, पण त्यांचा स्वत:वरचा कंट्रोल मात्र जातो. शिवाय या काळात काय घडलं हे त्यांना काहीही आठवत नाही. काही वेळा त्यांच्यावर केल्या गेलेल्या अत्याचारांचं फिल्िंमग केलं जातं, ज्यात ती व्यक्ती व्हॉलंटरीली सगळ्यात भाग घेतेय असं वाटतं. यातून ब्लॅकमेलिंगचा धोकाही असतो.
पार्टीला जाताना नेहमी आपली जाण्या-येण्याची ट्रान्स्पोर्टची सोय आधीच पाहून ठेवायला हवी, निघायच्या वेळी कोण कुठल्या स्थितीत असेल कोण जाणे. पोहण्यासाठी जशी ‘बडी सिस्टीम’ असते, तशा दोघी मैत्रिणींनी एकमेकींकडे अधूनमधून लक्ष ठेवायची सोय करायला हवी. ऑलरेडी कुणीतरी भरून आणलेलं सॉफ्ट ड्रिंक न स्वीकारणं, आपला ग्लास इकडे-तिकडे तसाच न ठेवणं, स्वत:ला किंवा मैत्रिणीला काही त्रास जाणवल्यास लगेच तिथून निघणं अशा काही बेसिक प्रिकॉशन्स घेतल्या तर धोका खूप कमी होतो. अनोळखी ग्रुपबरोबर फार रिमोट जागी किंवा लेट नाइट जाणं शक्यतो अव्हॉइड केलेलं बरं. आपली प्रायव्हसी जपण्याची कितीही इच्छा असली तरी घरच्यांकडे तुमच्याव्यतिरिक्त तिथला आणखी एखादा फोन नंबर देऊन ठेवणं ही आणखी एक सेफ्टी प्रिकॉशन. अगदी अनकम्फर्टेबल वाटत असेल तर अशा वेळी त्या पार्टीला जाऊ नये. कारण आपलं गट-फिलिंग अनेकदा बरोबर असतं. पार्टीतून निघायला हवं असं वाटतंय पण निघता येत नाहीये, असं झालं तर चक्क घरच्या कुणालातरी फोन करून बोलावून घेण्यात कुठलाही कमीपणा नाही. तसं केलं तर पुढच्या वेळी आई-बाबा आपल्याला पाठवणार नाहीत, अशी भीती वाटते; पण उलट त्यांना ‘आपली मुलगी वेळेत धोका ओळखून त्यावर उपाय करू शकते’ हे लक्षात आणून देण्याचं काम तुमचं. ड्रिंक्सशिवायही पार्टी एन्जॉय करता येऊ शकते हे तुला मित्रांना पटविता येतंय का हेही बघ.
पार्टीला जाण्यासाठी आणि ड्रिंक्स घेण्यासाठी जबरदस्त पीअर प्रेशर असतं हे मला माहिती आहे आनिका, पण या प्रेशरला यशस्वीपणे तोंड देता येणं ही नेसेसिटी आहे. त्याची प्रॅक्टिस आधीच करून ठेवायला हवी. काही डूज आणि डोण्ट्स पाळले आणि कधीतरीच अशा पार्टीज असल्या, तर तुला टेन्शन न घेता आणि धोक्यात न येता हे प्रसंग एन्जॉय करता येऊ शकतील, पण ते अवघड वाटत असेल आणि असे प्रसंग सारखेच येत राहिले तर दुसरा, तुला पटणारा ग्रुप नक्कीच मिळू शकेल.
The hammer shatters glass but forges steel, What trouble does to you depends upon what is in you- Old Russian proverb

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
Vasai, Fake Doctor, Wrong Surgery, Leads to Death, woman, Social Activist, marathi news, maharashtra,
वसई : बोगस डॉक्टरने घेतला महिलेचा बळी; चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे महिला ४ वर्षे अंथरूणात

विचारा तर खरं..
तरुणपणात निसर्गनियमाप्रमाणे प्रेमात पडायला होतंच. अर्थात ओघानं प्रेमभंगही आलाच. नवीन नाती, नवीन अभ्यासक्रम, नवीन जॉब आणि त्यांमधल्या गुंतागुंती. शरीराविषयी शंका, निर्णयांविषयी शंका असं खूप काही मनात सुरू असतं. खरं तर शंका खूप जेन्युईन असते पण ऐकणारा काय म्हणेल, हसेल की काय असं वाटतं. कुणाला विचारावं हेही कळत नाही. तुम्हाला वाटतंय असं काही? मग हा कॉलम आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांना वाट देण्यासाठी. इथे तुम्हाला वाटणाऱ्या शंकेला कुणी नाकं मुरडणार नाहीये की फालतू म्हणून त्या निकालात काढणार नाहीये. बिनधास्तपणे त्या शेअर करा. viva@expressindia.com या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ओपन अप असं लिहायला विसरू नका.