एकेकाळी राजकारण आणि फॅशन यांचा ३६चा आकडा असायचा. पण राजकारणातली यंग ब्रिगेड आणि सेलिब्रिटीजमुळे आता हे चित्र हळूहळू बदलू लागलंय.

माजी मिस इंडिया गुल पनाग तिच्या पॉलिटिकल रॅलीतल्या कुर्ता-लेगिंगनं वेगळी ठरली. स्कार्फसारखी ओढणी गुंडाळून घेण्याची तिची स्टाइल लक्षात ठेवण्याजोगी आहे. ‘आप’ची उमेदवार असलेल्या गुल पनागने बुलेटवरून प्रचार करून एक वेगळं स्टेटमेंट केलं होतं.

 साडय़ांसाठी प्रियांका गांधीपासून ते शायना एन.सी.पर्यंत खूप उदाहरणं आहेत. किरण खेर, नगमा, हेमामालिनी, स्मृती इराणी यांच्या साडय़ांच्या स्टाईल्स आणि इतर महिला उमेदवारांची पांढऱ्या कुडत्याची फॅशन लक्षात घेण्यासारखी आहे.

 ‘अती तिथे माती’ याची प्रचिती घ्यायची असेल तर राखी सावंतचं नाव घ्यावं लागेल. हिरवागार ड्रेस आणि त्याच मिरची रंगाच्या अॅक्सेसरीज प्रचारासाठीसुद्धा जरा अतीच होतात.