योगोपचार ही प्राचीन भारतीय परंपरा असली तरीही सध्याच्या जमान्यात याचं ‘फिटनेस रुटीन拀 होताना त्यात अनेक बदल केलेले दिसतात. पॉवर योगा हा योगसाधनेचा एक आधुनिक अवतार सध्या ट्रेंडमध्ये आहे. त्याविषयी आणि योगाच्या नव्या काही प्रकारांविषयी.

आजच्या स्ट्रेसफुल वातावरणात वावरत असतानाची स्ट्रेन्थ वाढविणे खूप गरजेचे झाले आहे. प्रदूषणामुळे वाढलेल्या अनारोग्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची आवश्यकता आहे. पुन्हा प्रमाणबद्ध शरीर, शरीरातील कोलेस्टेरॉल आणि चरबी कमी करणे हेदेखील उद्देश आहेतच. या सगळ्याचा एकत्रित परिणाम देणारे, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याचा उपाय सुचवणारे काही पर्याय आपल्याकडे आहेत. त्यापैकी एक म्हणजे योगोपचार. म्हणूनच ‘योगा-क्लासेस拀चे महत्त्व हल्ली वाढले आहे.
योगसाधना ही प्राचीन भारतीय संस्कृतीचा भाग होती. ती आपल्याकडे परंपरेने आली आहे. तरीही आता काळानुसार  योगाच्या जुन्या रूपाला नवीन झळाळी देण्याचे काम अमेरिकेने  केले आहे. बेरील बेण्डर बर्च आणि ब्रायन केस्ट यांनी पारंपरिक योगामध्ये इंटेन्स लेव्हल आणि फ्लोइंग स्टाईल आणून नावीन्य आणलं. कॅलरी बर्निग, वेट लॉस, मसल एक्झरसाइज अशी उद्दिष्टे ठेवून येणारेही यामुळे या योग प्रकाराकडे वळले. यातूनच ‘पॉवर योगा拀चा उदय झाला. पॉवर योगा प्रकार हल्ली ‘जिम  योगा拀 म्हणूनही ओळखला जातो.
वजन कमी करणे हा पॉवर योगाचा महत्त्वाचा उपयोग आहे. त्याचप्रमाणे हा योगा फिजिकली फिट असणाऱ्यांनीच करावा,  असे तज्ज्ञांकडून सुचविले जाते. पॉवर योगा शिकविण्याचा  प्रकार प्रत्येक ट्रेनरप्रमाणे बदलत असतो. बाहेरील देशात अतिशय प्रसिद्ध असणारे पॉवर योगा आता भारतातही जम बसवत  आहेत. अनेक सेलिब्रिटीज, बॉलीवूड कलाकार, स्पोर्ट्स पर्सन्स, अ‍ॅथलीट्स आज डाएट आणि जििमगपेक्षा या पॉवर योगाचा  आनंद घेत आहेत. पॉवर योगामध्ये नाव तेच, पण आसन  करण्याची पद्धत वेगळी असलेली दिसते.
‘बिक्रम योगा’ हा आणखी एक योगाचा आधुनिक एक प्रकार  आहे. अमेरिकास्थित बिक्रम चौधरी याने १९७० च्या दशकात पारंपरिक हठयोगाला नवीन रूप देऊन हा प्रकार सुरू केला.  ४० अंश सेल्सिअस तापमान असलेल्या बंद खोलीमध्ये ९० मिनिटांत २६ आसनं हे ‘बिक्रम योगा’चं स्वरूप आहे. गरम खोलीत हा योग प्रकार करत असल्याने हा ‘हॉट योगा拀 या नावानेही ओळखला जातो. शरीरातील विषारी द्रव्ये घामाद्वारे बाहेर टाकण्याचे तत्त्व या प्रकारात वापरले जाते. तसेच अगदी  प्राचीन असलेले सूर्यनमस्कारही पॉवर योगाने ‘डीमोल्ड’ केले  आहेत. नव्याने ते आपल्यासमोर ठेवले आहेत. पारंपरिक योगसाधनेत ज्याप्रमाणे १२ सूर्यनमस्कारांचे बंधन घातले जाते,  तसे पॉवर योगामध्ये नाही. गरजेनुसार पॉवर योगामध्ये ६०-७० सूर्यनमस्कार घातले जातात. पॉवर योगाचे नावीन्यपूर्ण सूर्यनमस्कार घालण्याचा सल्ला अनेक सेलिब्रिटी ट्रेनर देतात. अनेक सिनेकलाकार आपल्या ट्रेनर्सनी सांगितल्याप्रमाणे एका वेळी ६० ते ७० सूर्यनमस्कार दररोज घालत आहेत.
योगाला आधुनिक रूप देण्याचा प्रकार भारतातही झाला आहे, होत आहे. ‘अष्टांग विन्यास योग拀 नावाचा प्रकार यात आघाडीवर आहे. ‘क्लासिकल इंडिअन योगा म्हणून हा प्रकार  ओळखला जातो. श्वासावर नियंत्रण ठेवत केलेला हा प्रकार आहे. ‘फ्री ब्रेिथग विद साऊंड याला यात खूप महत्त्व आहे. श्वास घेण्याची आणि रोखून ठेवण्याची क्षमता वाढवत  वेगवेगळी आसने यामध्ये केली जातात.
अनेक ठिकाणी पारंपरिक योगोपचारही शिकवले जातात. योगाचार्य अय्यंगार यांनी प्रसिद्ध केलेली योगसाधना अय्यंगार योगा म्हणून आता प्रसिद्ध झाली आहे. यामधली काही आसने आणि व्यायाम प्रकार गरोदर स्त्रियाही करू शकतात. अपघात किंवा काही इजा झालेली असेल, तर त्यातून बाहेर पडण्यासाठीदेखील यातील काही प्रकार सुचवले जातात. ‘अस्तयोगा हा मनाच्या शांतीवर भर देणारा आहे.  ताण घालवण्यासाठी हा योगाचा प्रकार अतिशय  उपयुक्त आहे. वर्तमानात ताणमुक्त जीवन कसं जगावं हे  सांगणारा हा योगा आहे.
‘लाफ्टर योगा’ हा प्रकारही हल्ली नावारूपाला आला आहे.  वृद्धांपासून ते तरुणांपर्यंत सगळेच हा फॉलो करताना दिसत  आहेत. २० मिनिटे  स्ट्रेचिंग, बॉडी मूव्हमेंट करून हा योगा केला जातो. खुल्या हवेत  जोरजोरात हसत केल्या जाणाऱ्या या योगोपचारांमुळे प्रसन्नता  मिळते.
पॉवर योगा किंवा योगोपचाराचा कोणताही इंटेन्स कोर्स हा फिट लोकांनीच करावा, अशी सूचना केली जाते. पॉवर योगामध्ये ध्यानधारणा किंवा श्वसननियंत्रण यापेक्षा फिजिकल  स्ट्रेन्थवर भर दिला जातो. ब्रेक न घेता सातत्याने व्यायाम यात अपेक्षित असतो. त्यामुळे पॉवर योगाचा आनंद घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यायला विसरू  नका.

Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)