सुटीतल्या उद्योगांमध्ये गेम खेळायला एकमेकांकडे जाणं, प्ले स्टेशन्सवर रमणं ही कॉमन गोष्ट झालीय. प्ले स्टेशन्समधलं अप टू डेट वातावरण, हायटेक माहौल तरुणाईला भुरळ घालतोय. दुसरीकडे अगदी घरातही पदोपदी ही गेमिंगची क्रेझ जाणवतेय. बोलता बोलता एखादा मित्र अचानक ‘अरे.. अ‍ॅटॅक करण्याची वेळ झाली’ असं म्हणत मोबाइलमध्ये डोकं घालतो तर दुसरी चॅटिंग करता करता ‘आलेच जरा स्ट्रॉबेरी काढून’ असं म्हणून गायब होते. या नव्या गेमिंग लाइफस्टाइलविषयी..

सुटीतल्या उद्योगांमध्ये गेम खेळायला एकमेकांकडे जाणं, प्ले स्टेशन्सवर रमणं ही कॉमन गोष्ट झालीय. प्ले स्टेशन्समधलं अप टू डेट वातावरण, हायटेक माहौल तरुणाईला भुरळ घालतोय. दुसरीकडे अगदी घरातही पदोपदी ही गेमिंगची क्रेझ जाणवतेय. बोलता बोलता एखादा मित्र अचानक ‘अरे.. अ‍ॅटॅक करण्याची वेळ झाली’ असं म्हणत मोबाइलमध्ये डोकं घालतो तर दुसरी चॅटिंग करता करता ‘आलेच जरा स्ट्रॉबेरी काढून’ असं म्हणून गायब होते. या नव्या गेमिंग लाइफस्टाइलविषयी..
आधीच्या पिढीला टीव्ही गेम, व्हिडीओ गेम्सनी वेड लावलं होतं. आत्ता किशोरवयात असणाऱ्या पिढीला ऑनलाइन गेमिंगनं वेडं केलंय. मोबाइलवर किंवा टॅब, पीसी, लॅपटॉपवर गेम्स सगळेच खेळतात, पण गेमवेडी तरुणाई खऱ्या अर्थाने रमते ऑनलाइन गेमिंगमध्ये आणि अर्थात प्ले स्टेशनवर.
आता गेमिंगच्या दुनियेशी संबंध नसणाऱ्यांना हे कुठलं नवं स्थानक वगैरे बेसिक प्रश्न पडू शकतात. पण प्ले स्टेशन्स आणि एक्सबॉक्स ही आजच्या गेमाडय़ा मुलांसाठी तीर्थस्थानं आहेत. ऑनलाइन गेम खेळणाऱ्या मुलांना खेळाचं साहित्य आणि वातावरण दोन्ही आयडियल हवं असतं आणि तेच ही प्लेस्टेशन्स मिळवून देतात. म्हणजे गॅलरीत क्रिकेट खेळणारेही असतात पण प्रॉपर क्रिकेट पीचवर ग्लोव्हज, पॅड्स, स्टम्प्स आणि ब्रँडेड बॅट-बॉलसह क्रिकेट खेळण्याची मजा काही और असते ना.. तसंच आहे हे.
viva23घरातल्या घरात एक्सबॉक्स किंवा प्ले स्टेशनची आयुध घेऊन खेळता येतं. पण बाहेरही खास युवकांची गरज लक्षात घेऊन अत्याधुनिक गेमिंग स्टेशन्स बनवलेली आढळतात. तिथे जाऊन गेम्स खेळण्याची विशिष्ट पद्धत असते. ते खास बनवलेल्या जॉयस्टिकने खेळले जातात. प्लेस्टेशनचं वातावरण अगदी प्रोफेशनल असतं. लाइक माइंडेड लोक आजूबाजूला सापडतात. भलंमोठं स्क्रीन, परफेक्ट लाइट आणि आरामदायी खुच्र्या. तिथे बसून एनएफएस जीटीए अशा प्रकारचे गेम्स खेळण्याची मजाच न्यारी. म्हणूनच आज घरोघरी कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि फोनोफोनी इंटरनेट असूनही प्लेस्टेशन्सची चांगली कमाई होते.
याबाबत तरुणांशी बोलल्यावर असं लक्षात आलं की, प्लेस्टेशन्समध्ये गेलं की, स्पेशलाइज्ड हाय ग्राफिक्समध्ये गेम खेळता येतो. ती सुविधा आणि मजा घरच्या घरी खेळण्यात नक्कीच नाही. मार्केटमध्ये नवीन गेम्स आल्यावर ते पहिले प्लेस्टेशनमध्ये येतात. या कारणांमुळे तरुणाईसाठी ऑनलाइन गेमिंग ‘थग ऑफ प्राईड’ बनलं आहे.
ऑनलाइन गेमिंगबरोबरच सध्या फँटसी लीगची तरुणाईमध्ये क्रेझ दिसतेय. गेमचं मूळ खऱ्या मैदानी खेळामध्ये दडलंय. सध्या सीझन आहे ‘आयपीएल’चा आणि त्यामुळे फँटसी लीग फॉर्मात आहे. ही चक्क एक स्कोर सिस्टीम असते. तुम्ही एक लीग तयार करायची किंवा लीगचा भाग व्हायचं आणि रोज खेळाडूच्या प्रेडिक्शन्सनुसार गेम ठरवायचा. या फँटसी लीगचा जन्म फुटबॉलमुळे झाला पण आता वाढत्या क्रिकेटच्या वेडामुळे हे क्रिकेटमध्येही आले आहे. या लीग आयसीसीच्या ऑफिशिअल साइटवरही पाहायला मिळतात. यंदाच्या आयपीएल २०१५ ला अशा तब्बल ४४ लीग आहेत. मुंबईचा तरुण अमित वझे सांगतो, ‘आम्ही गेली ३ वर्ष फँटसी लीग चालवतोय. आम्हीच आमची लीग डिझाइन केली.’  या लीगमध्ये कल्याणपासून ते कोल्हापूर आणि पुण्याचीही मुलं आहेत. या सगळ्यांची प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी खूप छान मत्री झाली आहे. ‘आमचा एक मित्र योगेश रानडे याने फँटसी लीगचं अँड्रॉइड अ‍ॅप बनवलं आहे’, असंही अमितनं सांगितलं.
वैष्णवी वैद्य -viva.loksatta@gmail.com